मुंबईमध्ये आजवर दहशतवादी हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. मुंबईमध्ये जुलै महिन्यात २००६ आणि २०११ या वर्षी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. ११ जुलै, २००६ आणि १३ जुलै, २०११ हे दोन दिवस मुंबईकरांच्या कायम लक्षात राहण्यासारखे आहेत. २००६ च्या घटनेला १७ वर्षे झाली तर २०११ च्या घटनेला १३ वर्षे झाली तरी या बॉम्बस्फोटांचा निकाल लागलेला नाही. दोन्ही घटनांमध्ये २०० हून अधिक लोकांचा बळी गेला, तर १ हजारांहून अधिक लोक जखमी झाले. मुंबईकरांची ही जखम अजून ताजी आहे. या घटनेत निष्पापांचा बळी गेलेल्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. या दोन घटना नेमक्या काय आहेत? या घटनांचा तपास कुठेपर्यंत आला आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ती ११ मिनिटे आणि १८१ लोकांचा बळी

‘लोकल’ ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. १९९३ मध्ये याच जीवनवाहिनीला ‘लक्ष्य’ करण्यात आले होते. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर २००६ मध्ये ११ मिनिटांत ७ वेगवेगळ्या ठिकाणी लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यामध्ये १८१ लोकांचा बळी गेला, तर ८९० लोक जखमी झाले. पश्चिम उपनगरीय रेल्वेमध्ये जोगेश्वरी, माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार रोड, बोरिवली, मीरा रोड या सात ठिकाणी ११ मिनिटांत बॉम्बस्फोट झाले.

न्याय कधी ?

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी एकामागोमाग एक असे साखळी बॉम्बस्फोट घडवून मुंबईला हादरवून सोडणाऱ्या घटनेला ११ जुलै, २०२३ मध्ये १७ वर्षे पूर्ण झाली. या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा कनिष्ठ न्यायालयाने निकाल देऊन आठ वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र, याप्रकरणी पाच दोषसिद्ध आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्याची मागणी करणाऱ्या सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयात अद्याप सुनावणी सरू झालेली नाही.

मागील वर्षीही ११ जुलै रोजी सरकारची याचिका आणि आरोपींनी शिक्षेविरोधात केलेले अपील सुनावणीसाठी आले. त्यावेळी न्यायमूर्तींकडील अतिरिक्त कामांमुळे प्रकरण सुनावणीसाठी घेऊ शकत नसल्याचे खंडपीठाने म्हटले होते. या कारणास्तव तसेच युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी पाच ते सहा महिने लागणार असल्याने प्रकरणाच्या सुनावणीसाठी नवे खंडपीठ स्थापन करण्याची विनंती मुख्य न्यायमूर्तींकडे करावी, अशी सूचना खंडपीठाने केली होती. ९२ सरकारी, तर ५० बचाव पक्षाचे साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीपुरावे १६९ हून खंडांमध्ये आहेत. विशेष न्यायालयाचे निकालपत्रही दोन हजार पानांचे असल्याचे विशेष सरकारी वकिलांनी सांगितल्यावर न्यायालयाने प्रकरणासाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्याच्या विनंतीची सूचना दिली होती. परंतु, ही सूचना देऊन एक वर्ष उलटले तरी हे प्रकरण सुनावणीसाठी आले नाही. या बॉम्बस्फोटांशी संबधित खटल्यात मोक्का न्यायालयानेही नऊ वर्षांनंतर निकाल दिला होता. मोक्का न्यायालयाने १३ पैकी दोषसिद्ध पाच आरोपींना फाशीची, तर सात दोषसिद्ध आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर पाच आरोपींच्या फाशीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रकरण २०१५ मध्येच उच्च न्यायालयात दाखल झाले होते. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्याची मागणी मुख्य न्यायमूर्तींकडे करण्यात आली. ती मान्यही झाली. मात्र त्यानंतरही तीन प्रसंगी न्यायमूर्तींचा सेवाकाळ संपत आल्याच्या कारणास्तव प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही.

हेही वाचा : मिठाचा खडा टाकणारे शकुनीमामा आहेत तरी कोण ? ‘शकुनीमामा’ला नकारात्मक वलय का मिळाले ?

कोण आहेत आरोपी ?

कमाल अन्सारी, महम्मद शेख, एहेत्तेशाम सिद्दीकी, नावेद खान आणि असिफ खान यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तन्वीर अन्सारी, महम्मद शफी, शेख आलम शेख, महम्मद साजिद अन्सारी, मुझ्झमील शेख, सोहेल शेख, जमीर शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

३ ठिकाणे आणि १३/७ ची १३ मिनिटे

१३ जुलै, २०११ रोजी झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोटांना ‘१३/७’ असेही ओळखले जाते. १३ जुलै, २०११ रोजी संध्याकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी ते ७ वाजून ६ मिनिटांपर्यंत मुंबईतील झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर पश्चिम येथील कबुतरखान या तीन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. या हल्ल्यात २६ ठार तर १३१ लोक जखमी झाले. दक्षिण मुंबईच्या झवेरी बाजारातील खाऊगल्ली येथे मोटरसायकलवर पहिला बॉम्ब लावण्यात आला होता. ६ वाजून ५४ मिनिटांनी तेथे पहिला बॉम्बस्फोट झाला. चर्नी रोडवरील ऑपेरा हाऊस परिसरात प्रसाद चेंबर्स आणि पंचरत्न इमारतीच्या बाहेर एका टिफिन बॉक्समध्ये दुसरा बॉम्ब ठेवण्यात आला होता. हजारो लोक असणाऱ्या या ठिकाणी ६ वाजून ५५ मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. दादर फुलबाजार परिसरातील कबुतरखानाजवळील विजेच्या खांबावर तिसरा बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्याचा ७ वाजून ६ मिनिटांनी स्फोट झाला. ऑपेरा हाऊस येथे झालेल्या हल्ल्यात काही हिरे-सोने व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला. या बॉम्बस्फोटानंतर संप्रेषण यंत्रणेवर ताण येऊन संपर्कव्यवस्था विस्कळीत झाली होती.

हेही वाचा : राजकीय नेते ‘बडव्यां’चा उल्लेख करतात, हे ‘बडवे’ म्हणजे कोण ? काय आहे बडव्यांचा इतिहास

सरकारची मलमपट्टी

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी दुसऱ्या दिवशी मुंबईला भेट दिली आणि सैफी हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांची भेट घेतली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख आणि गंभीर जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मृतांपैकी प्रत्येकाच्या कुटुंबीयांना ५ लाख आणि जखमींना सुमारे ५० हजारांच्या मदतीची घोषणा केली.

संशयित, आरोपी आणि तपासाची सद्य:स्थिती

२०११ च्या या तिहेरी बॉम्बहल्ल्यानंतर इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इंडियन मुजाहेद्दीनचा सहसंस्थापक यासिन भटकळ याचा कदाचित यामागे हात असू शकतो.पत्रकार ज्योतिर्मय डे यांची हत्या तसेच दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या हत्येचा प्रयत्न झाल्यामुळे या स्फोटांमागे मुंबई अंडरवर्ल्डचा हात असू शकतो, अशीही शक्यता तेव्हा वर्तवण्यात आली होती. १३ जुलै हा दिवस काश्मीर शहीद दिन म्हणूनही पाळला जातो आणि काश्मिरी गटांनी हल्ले केले असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली होती.
गृह मंत्रालयाने हे बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ले म्हणून वर्गीकृत करून याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था यांच्याकडे सोपवला. या स्फोटकांमध्ये अमोनियम नायट्रेट, आयइडी स्फोटके, रिमोट डिटोनेटर्स यांचा वापर करण्यात आला होता, असे तपासात दिसून आले.
महाराष्ट्र एटीएसने कोलकाता पोलिसांकडून कोलकाता ते मुंबई आणि कोलकाता ते कानपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी मागवली होती. इंडियन मुजाहिदीनशी संबंध असलेला कोलकात्यातील व्यक्ती मागील काही दिवसांपासून बेपत्ता झाल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू झाला.
९ ऑगस्ट, २०११ रोजी, महाराष्ट्र एटीएसने झवेरी बाजार स्फोटात वापरलेली दुचाकी चोरीची असल्याचे शोधून काढले. स्फोटांच्या काही तासांपूर्वी अमित सिंग या व्यक्तीकडून दुचाकी चोरीला गेली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये लांब केस असलेली एक व्यक्ती चोरीच्या लाल रंगाच्या होंडा अ‍ॅक्टिव्हावरून गर्दीच्या ठिकाणी प्रवेश करत स्फोटाच्या ठिकाणी दुचाकी ठेवून चालत गेल्याचे दिसून आले.
२३ जानेवारी, २०१२ रोजी, मुंबई पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. नकी अहमद वासी अहमद शेख आणि नदीम अख्तर अश्फाक शेख या संशयितांना अटक केली. महाराष्ट्र एटीएसने सांगितल्यानुसार, या या हल्ल्याचा सूत्रधार यासिन भटकळ असून या हल्ल्याचे पूर्ण नियोजन त्याने केले होते. २ दुचाकी, १८ सिमकार्डस, ६ हॅंडसेट्स यांचा वापर या हल्ल्यात करण्यात आला. २५ मे, २०१२ रोजी महाराष्ट्र एटीएसने नकी अहमद, नदीम शेख, कंवर पाथ्रिजा आणि हारून नाईक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. याव्यतिरिक्त, आरोपपत्रात इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक यासिन भटकळ आणि रियाझ भटकळ, वकास इब्राहिम साद, दानिश उर्फ तारबेझ, दुबईस्थित मुझफ्फर कोलाह आणि तेहसीन अख्तर यांच्यासह सहा जणांना फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आले.
४ फेब्रुवारी, २०१४ रोजी यासिन भटकळ याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्र एटीएस पथकाने यासिन भटकळ याला या बॉम्बहल्ल्यासंदर्भात ताब्यात घेण्यात आले.

मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले. प्रत्येक हल्ल्यामधून मुंबईकर पुन्हा नव्याने उभे राहिले. परंतु, यामध्ये बळी गेलेल्या, जखमी झालेल्या निष्पापांच्या जखमा अजूनही ताज्या आहेत.