Christmas and New Year Special २०२३ संपतंय, नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. ख्रिसमस पासून ते नवीन वर्षाच्या आगमनापर्यंत सुट्टीचा, सेलिब्रेशनचा माहोल असतो. या सेलिब्रेशनमध्ये एक आवर्जून आढळणारा पदार्थ म्हणजे केक. वेगवेगळ्या रंगांचा, चवीचा, आकाराचा केक ही तर खवय्यांची खास फर्माईशच असते. केक हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांच्या आनंदाचा विषय आहे. म्हणूनच नवीन वर्षाच्या आगमनाच्या निमित्ताने केक कुठून आला? या प्रश्नाचा शोध घेणे रंजक ठरावे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राचीन केक

केकचा इतिहास जाणून घेण्यासाठी केक या शब्दाच्या व्युत्पत्तीकडे जावे लागते. “केक” हा शब्द जुना नॉर्स शब्द “काका” पासून आला आहे, काका म्हणजे “फ्लॅटब्रेड”. सुरुवातीच्या कालखंडात केकचे स्वतंत्र असे अस्तित्त्व नव्हते, केक हा खरं तर आज आपण जी बिस्किटे किंवा कुकीज म्हणून खातो त्यांच्या सारखाच होता. प्राचीन काळात केक सपाट आणि कोरडे होते आणि बहुतेकदा त्यांच्यात फळे किंवा काजू घालून त्यांना चव आणली जात होती. सर्वात जुने केक प्राचीन इजिप्तमध्ये तयार केले गेले, असे मानले जाते. याच सपाट, कोरड्या केकमध्ये कालांतराने यीस्टचा वापर करून त्याला हलका आणि मऊ करण्यात आले. सुरुवातीच्या अगोड केकमध्ये नंतरच्या काळात मधाचा वापर गोडवा आणण्यासाठी केला जाऊ लागला. याशिवाय चवीसाठी सुका मेवा आणि इतर मसाले घातले जात असत. रोमन साम्राज्यातही केक तयार करण्याची प्रदीर्घ परंपरा होती. पूर्वीचे केक आज आपल्याला माहीत असलेल्या केकपेक्षा खूप वेगळे होते. ते ब्रेडसारखे अगोड होते. ग्रीक साहित्यात इ.स.पूर्व चौथ्या शतकातील मध आणि गव्हाच्या पीठाने तयार केलेल्या केकचा उल्लेख आहे. रोमन साम्राज्ययेईपर्यंत गोड केक होत नसत. रोमन लोकांनी त्यांच्या केकमध्ये मधात भिजवलेली फळे आणि सुका मेवा घालण्यास सुरुवात केली. मूलतः केकला मध्ययुगात त्याचे आधुनिक रूप मिळाले. रोमन साम्राज्यातील सर्वात लोकप्रिय फ्लेवर्सपैकी एक ऑलिव्ह ऑइल केक होता, ज्याची चव रोझमेरी आणि इतर औषधी वनस्पती घालून वाढविण्यात येत असे. आणखी एक लोकप्रिय केक म्हणजे प्लम केक, जो सुकामेवा आणि टणक फळे घालून तयार केला जात होता. याच काळात फ्रूटकेक आणि ख्रिसमस केक लोकप्रिय झाले.

अधिक वाचा: स्त्रियांचे अश्रू पुरुषांमधील आक्रमकता खरंच कमी करतात? काय सांगते नवीन वैज्ञानिक संशोधन…

साखरेचा गोड केक

मध्ययुगात साखरेच्या वापराने केकच्या रूपात परिवर्तन घडवून आणले. या कालखंडात साखर अधिक सहज उपलब्ध झाली तेव्हा केक आणखी लोकप्रिय झाला. परंतु सुरुवातीला साखर महाग होती, त्यामुळे केक नियमितपणे बेक करणे केवळ श्रीमंतांनाच परवडणारे होते. याशिवाय या काळात लोणी आणि अंडी देखील केकमध्ये प्रथमच वापरली गेली, ज्यामुळे ते पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध आणि अधिक स्वादिष्ट झाले. लग्नाचे केक विशेषतः मोठे असायचे, बहुतेक वेळा बहु-स्तरीय आणि सोन्याचे पान आणि साखर गुलाब यांसारख्या महागड्या सजावटीने सुशोभित केलेले होते. आज, अक्षरशः हजारो विविध प्रकारचे केक उपलब्ध आहेत, साध्या स्पंजकेक्सपासून ते समृद्ध चॉकलेट ते क्लासिक व्हिक्टोरिया स्पंजपर्यंत अनेक केक आपल्यावर छाप सोडण्यात यशस्वी झाले आहेत. असे असले तरी मध्ययुगात केक बरोबर इतर अनेक मध्ययुगीन पाककृती प्रत्यक्षात मध घालून तयार केल्या जात, त्यात प्रामुख्याने पाई किंवा पुडिंगसारख्या पाककृतींचा समावेश होत असे. याशिवाय ब्रेडचा वापर केकसाठी आधार म्हणून देखील केला जात असे, म्हणूनच केकच्या काही सुरुवातीच्या आवृत्त्या प्रत्यक्षात खूप दाट आणि जड होत्या. कालांतराने साखर अधिक प्रमाणात उपलब्ध आणि परवडणारी झाली, त्यामुळे सामान्य लोकांना नियमितपणे केकसारख्या गोड पदार्थांचा आनंद घेणे शक्य झाले. या कालावधीत नवीन बेकिंग तंत्र आणि घटकांचा विकास देखील झाला, जसे की यीस्ट, ज्यामुळे केक अधिक हलके, मऊसूत तयार करणे शक्य झाले.

प्राचीन केकची पाककृती

केक तयार करण्याचे साहित्य आणि पद्धती प्राचीन काळापासून लक्षणीयरीत्या विकसित झाल्या आहेत, परंतु पीठ, साखर, बटर आणि अंडी एकत्र करून गोड पदार्थ तयार करण्याची मूळ संकल्पना कायम राहिली आहे. प्राचीन इजिप्शियन केक हा रव्याचे पीठ, मध, लोणी आणि अंडी यांच्या मिश्रणाने तयार करत. हे केक इजिप्तच्या देवी-देवतांना तसेच राजेशाही आणि इतर मान्यवरांना साठी तयार करण्यात येत होते. रोमन साम्राज्यात हनी केक तयार केला जात होता. हा केक गव्हाचे पीठ, मध, ऑलिव्ह ऑइल आणि अंडी यांच्या मिश्रणाने तयार केला जातो. प्राचीन रोममध्ये ही एक लोकप्रिय मेजवानी होती आणि आजही त्याचा आनंद घेतला जातो. मध्ययुगीन मसाला केक हा मोहरीची पूड, मध, लोणी आणि दालचिनी, जायफळ आणि लवंगा यांसारख्या मसाल्यांच्या मिश्रणाने तयार केला जातो. हा केक मध्ययुगीन युरोपमध्ये लोकप्रिय होता आणि आजही अनेक लोक त्याचा आनंद घेतात. स्कॉटिश फ्रुटकेक हा ओट्स, बार्लीचे पीठ, सुका मेवा जसे मनुका आणि करंट्स, लोणी, अंडी आणि व्हिस्की किंवा ब्रँडी यांच्या मिश्रणाने केला जातो. हा केक बऱ्याचदा विवाहसोहळा आणि इतर विशेष प्रसंगांची रंगात वाढवतो. जपानी ऑरेंज केक हा तांदळाचे पीठ, संत्र्याची साल, लोणी, अंडी आणि साखर यांच्या मिश्रणाने बनवला जातो. याचा उगम चीनमध्ये झाला असे मानले जाते परंतु तो अधिक जपानमध्ये लोकप्रिय झाला.

अधिक वाचा: बिहार खरंच सीतेचे जन्मस्थान आहे का? काय सांगतात पौराणिक संदर्भ?

आधुनिक केक म्हणजे काय?

केकचे बरेच प्रकार आहेत, आधुनिक केकची व्याख्या पीठ, साखर, अंडी, लोणी किंवा तेल, बेकिंग पावडर किंवा खमीरसाठी सोडा, अनेकदा फळे, चॉकलेट किंवा काजू यांच्या मिश्रणापासून तयार केलेला गोड पदार्थ म्हणून केली जाऊ शकते. हा केक सहसा ओव्हनमध्ये बेक केला जातो. आधुनिक कालखंडात पहिला चॉकलेट केक १७६४ मध्ये डॉ. जेम्स बेकर आणि जॉन हॅनन यांनी तयार केला होता. १८२८ मध्ये, डच केमिस्ट कोएनराड जोहान्स व्हॅन हौटेन यांनी कोको बीन्सवर अल्कधर्मी क्षारांसह उपचार करण्याची प्रक्रिया विकसित केली, ज्यामुळे त्यांचा कडूपणा कमी झाला आणि ते अधिक विरघळले. या “डचिंग” प्रक्रियेमुळे कोको पावडर तयार करणे शक्य झाले, ज्यामुळे चॉकलेट केक्स आणि इतर मिठाईसाठी मार्ग मोकळा झाला. १८०० च्या दशकाच्या सुरुवातीस, ब्रिटीश बेकर्सने केक हलका आणि फ्लफीर बनवण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट (बेकिंग सोडा) आणि टार्टर (पोटॅशियम बिटाट्रेट) सारख्या रासायनिक खमीरयुक्त एजंट्स वापरण्यास सुरुवात केली. या पाककृतींना सामान्यत: “क्विक ब्रेड” असे म्हटले जाते कारण यीस्ट वाढण्याची प्रतीक्षा न करता ते पटकन तयार करता येतात. अमेरिकन बेकर्सनी १९ व्या शतकाच्या मध्यात या पद्धतींचा अवलंब केला.
अशा प्रकारे आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या केकची निर्मिती झाली.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who invented the cake how did this happen svs