– चंदन हायगुंडे

प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप असणाऱ्या एल्गार परिषद गुन्ह्यातील आरोपी गौतम नवलखा व डॉ. आनंद तेलतुंबडेंना अखेर १४ एप्रिलला अटक झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोघे राष्ट्रीय तपास यंत्रणेसमोर शरण आले. त्यांच्या समर्थकांनी, विशेषतः तेलतुंबडेंच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्न उपस्थित करून सोशल मीडियावर दिशाभूल करणारा प्रचार केला. मुळात तेलतुंबडेंची माओवादी चळवळीशी जवळीक दाखवणारी वैचारिक मांडणी, कृती संशयास्पद आहे, आणि हे समजून घेण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांनी केलेले आरोप बाजूला ठेऊन पुढील उदाहरणं पाहू…

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
There are signs that Chief Ministers Youth Work Training Scheme is also going to be closed
मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Loksatta chaturang padsad loksatta readers response letter
पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ

माओवादी नेत्यास ‘आपल्या काळातील भगतसिंग’ म्हणणारे आनंद तेलतुंबडे आंबेडकरी कसे?

२००७ मध्ये एल्गार परिषद गुन्ह्यातील आरोपी वर्णन गोंसालवेसला त्याचा निकटवर्ती श्रीधर श्रीनिवासनसह दहशतवाद विरोधी पथकाने बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, प्रतिबंधित माओवादी संघटनेसाठी सक्रियपणे काम करणे अशा आरोपांखाली अटक केली. न्यायालयाने दोघांना दोषी ठरवून सहा वर्ष कारावासाची शिक्षा दिली. शिक्षा भोगून दोघे २०१३ मध्ये तुरुंगातून सुटले. पुढे ऑगस्ट २०१५ मध्ये श्रीधरचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

न्यायालयात आपण दोषी नाही असे सांगणाऱ्या श्रीधरच्या मृत्यनंतर मात्र भारतीय कम्युनिस्ट पार्टी – भाकपा (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेने “प्रेस स्टेटमेंट” काढून त्याच्या माओवादी कार्याबद्दल माहिती जाहीर केली. त्यातून श्रीधर प्रतिबंधित माओवादी संघटनेचा सेंट्रल कमिटी मेंबर असल्याचे व अनेक वर्ष या माओवादी चळवळीत सक्रिय असल्याचे स्पष्ट होते.

पुढे सप्टेंबर २०१६ मध्ये श्रीधरच्या मृत्यूस एक वर्ष पूर्ण होताना त्याच्या स्मरणार्थ मुंबईत कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात एल्गार परिषद गुन्ह्यातील आरोपी सुधीर ढवळे यासह हर्षाली पोतदार, अरुण फरेरा, गोंसालवेस या सर्वांचा सक्रिय सहभाग होता. या कार्यक्रमाचे वार्तांकन द इंडियन एक्सप्रेस ने केले आहे. “फ्रेंड्स ऑफ श्रीधर” आयोजित सदर कार्यक्रमात श्रीधरबद्दल लिहिलेल्या लेखांचा संग्रह असणारे “S Sridhar – Portrait of the revolutionary as a warrior intellectual” हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. यात एक लेख आनंद तेलतुंबडेंचा आहे.
या लेखानुसार श्रीधर शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आल्यावर एकेदिवशी त्याची तेलतुंबडेंसोबत भेट झाली. भेटीदरम्यान श्रीधर ने आपण पुन्हा (माओवादी) चळवळीत काम करणार असल्याचे तेलतुंबडेंना सांगितले. त्यावेळी, तेलतुंबडे लिहितात, “I stared at him, I wondered how Bhagatsingh and his comrades might have looked. Every era has its Bhagatsinghs and Sridhar like Maoists are indeed Bhagatsinghs of our times. They cannot die; they will keep coming unless the humans are liberated in real terms. Sridhar also will live on…in the hearts of millions fighting his battle…..My red salute to this dear friend.”
कोणीही बंदी घातलेल्या संघटनेत उघडपणे काम करत नाही. असे काम बेकायदेशीर असल्याने गोपनीय पद्धतीने केले जाते. आणि कोणी असे गोपनीय काम करीत असेल तर त्याबद्दल निकटवर्ती किंवा जवळचे सहकारी सोडून कोणाशी बोलणार नाही. इथे तेलतुंबडे म्हणतात कि श्रीधर पुन्हा माओवादी चळवळीत जाणार असल्याचे त्यांना सांगतो. मग तेलतुंबडे त्याचे निकटवर्ती किंवा जवळचे सहकारी आहेत का? असा प्रश्न पडतो. आणि आपण माओवादी चळवळीत पुन्हा जाणार हे सांगितल्यावर “प्रख्यात विचारवंत” तेलतुंबडे श्रीधरला तसे करण्यापासून थांबवत नाहीत. उलट, श्रीधर सारखे माओवादी आपल्या काळातील भगतसिंग असून ते कधीच मरणार नाहीत… तर मनुष्य खऱ्या अर्थाने मुक्त होईपर्यंत ते पुन्हा पुन्हा येत राहतील, असे तेलतुंबडेंना वाटते.

मग देशविरोधात युद्ध पुकारणाऱ्या प्रतिबंधित माओवादी चळवळीचे नेते जणू समस्या नसून आजच्या काळातील समस्यांवर उपाय आहेत असे आनंद तेलतुंबडेना म्हणायचे आहे का? आणि असे हे आनंद तेलतुंबडें आंबेडकरी कसे? त्याचे माओवादी चळवळीशी काय कनेक्शन आहे? हे प्रश्न मनात येतात. तेलतुंबडेंबाबत अशी बरीच उदाहरणे देता येतील.

आनंद तेलतुंबडे माओवादी हिंसाचारास “divine violence” म्हणतात

आज देशात, व्यवस्थेत भ्रष्ट्राचार, वर्गभेद, जातीभेद इत्यादी गंभीर प्रश्न निश्चितपणे आहेत. गरीब वंचितांचे शोषण, सामान्य माणसांवर अन्याय अत्याचाराचे अनेक प्रसंग घडतात. मात्र यावर लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात संघटित हिंसक उठावाचा माओवादी मार्ग उपाय नाही हे समजून घ्यावे लागेल. अनेक गरीब दलित वंचितांची पोलिसांचा खबरी ठरवून किंवा अन्य कारणास्तव निघृण हत्या करणारे, फुटीरतावादी गटांसोबत युती करून समाजाची दिशाभूल करणारे माओवादी ना भगतसिंग सारखे क्रांतिकारक आहेत ना आंबेडकरांप्रमाणे समाज सुधारक आहेत.
तरीही आनंद तेलतुंबडे मात्र भारतातील माओवादी हिंसाचारास “divine violence” म्हणजे दैवी हिंसा म्हणतात (संदर्भ: आनंद तेलतुंबडे यांचा Revolutionary Violence Versus Democracy: Narratives from India या पुस्तकातील लेख). इतकेच नव्हे तर प्रतिबंधित माओवादी संघटेनची वरिष्ठ नेता अनुराधा गांधीच्या नावाने, तिच्या स्मरणार्थ चालणाऱ्या “अनुराधा गांधी मेमोरियल कमिटी” या संस्थेचे आनंद तेलतुंबडे सदस्यपद स्वीकारतात, तेंव्हा त्यांच्यावरील संशय अधिक बळावतो.

तेलतुंबडे, नवलाखा स्वतःच आंबेडकर जयंतीला शरण आले?

८ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडे व नवलाखा याना एका आठवड्यात एल्गार परिषद प्रकरणात पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले. ही मुदत १४ एप्रिलला संपली. ठरवले असते तर दोघे संशयित आरोपी १३ एप्रिल किंवा त्याआधीही शरण येऊ शकले असते. मात्र ते १४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती रोजी शरण आले आणि मग पोलिसांनी त्यांना अटक केली.

मात्र, तेलतुंबडे हे आंबेडकर परिवाराचे सदस्य (डॉ आंबेडकरांचे नातजावई) म्हणून त्यांना आंबेडकर जयंतीला ला अटक होणे लाजिरवाणे आहे असा दिशाभूल करणारा प्रचार सुरु आहे. आनंद तेलतुंबडेंचा सख्खा भाऊ मिलिंद तेलतुंबडे प्रतिबंधित माओवादी संघटनेचा मोठा वॉन्टेड नेता आहे. परंतु तेलतुंबडे आंबेडकरी किंवा माओवादी नेत्याच्या कुटुंबाचे सदस्य आहेत म्हणून त्यांना अटक झालेली नाही, हे एल्गार परिषद प्रकरणाचा, त्यात आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारताना न्यायालयांनी दिलेल्या आदेशांचा अभ्यास केल्यास समजते.
संशयित माओवादी नवलाखा आणि तेलतुंबडेंना कायद्यासमोर “lockdown” व्हावे लागले. यानिमित्ताने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांना नमन करून आपण आपली लोकशाही व्यवस्था, समाज, न्यायव्यवस्था अधिक सक्षम, दोषमुक्त करण्याचा निर्धार करूया!

Story img Loader