ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा भारतासह अन्य काही राष्ट्रांमध्ये मैत्री दिन म्हणजे फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. आंतराष्ट्रीय मैत्री दिन हा ३० जुलै रोजी साजरा करण्यात येतो. मैत्रीच्या अनेक कथा भारतामध्ये प्रचलित आहेत. कृष्ण-सुदामाची मैत्री ही आदर्श मैत्री समजली जाते. राजकीय मैत्री, शालेय मैत्री, कार्यालयीन मैत्री अशा विविध प्रकारची मैत्री दिसते. पण, भारतात वेगळा आणि आंतराष्ट्रीय स्तरावर वेगळा असे दोन-दोन फ्रेंडशिप डे का साजरे केले जातात, तसेच भारतामध्ये फ्रेंडशिप डेच्या आधीपासून मैत्रीची परंपरा चालत होती का, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

फ़्रेंडशिप डे हा युवा वर्गाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. मैत्रीची ओळख जपण्यासाठी फ्रेंडशिप बँड, मार्करने नाव लिहिणे, ग्रीटिंग कार्ड, गिफ्ट्स दिली जातात. मैत्री दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा केले जाते. परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावर ३० जुलै रोजी तर भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. यामागे काही कथा सांगितल्या जातात.

Border Gavaskar Trophy 2024 Ind vs AUS Schedule in Marathi
Border Gavaskar Trophy 2024 Schedule: भारतीय वेळेनुसार बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं कसं असणार वेळापत्रक? पहाटे किती वाजता सुरू होणार सामना?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
MATES scheme for indian
भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी देणार ऑस्ट्रेलिया; काय आहे ‘MATES’ योजना? याचा लाभ कसा घेता येणार?
menstrual leave mva provision
मासिक पाळीच्या रजेचा विषय पुन्हा चर्चेत; भारतात काय आहेत नियम? कोणकोणत्या राज्यांत रजेची तरतूद?
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
singles day in china
11/11: याच दिवशी का साजरा केला जातो ‘सिंगल्स डे’?
some shubh muhurat for wedding in November and December this year
दिवाळीनंतर लग्नांसाठी हे आहेत शुभ मुहूर्त…

फ्रेंडशिप डे अर्थातच पाश्चात्य संस्कृतीचा भाग आहे. पॉप कल्चरद्वारे फ्रेंडशिप बँडचे व्यापारीकरण झाले. मैत्री साजरी करण्यासाठी गिफ्ट्स, बँड्स, ग्रीटिंग यांची गरज भासू लागू लागली. कॅफेमध्ये गाण्यावर मित्रांसह नाच करणे हा या दिवसाचा एक भाग झाला. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी राष्ट्रीय स्तरावर मैत्री दिन साजरा करण्यात येऊ लागला. यासंदर्भात एक गोष्ट सांगतात की, युनायटेड नेशन्सद्वारे ‘विनी द पूह’ याला आदर्श मित्र समजले जाते. १९८८ मध्ये, यूएन जनरल असेंब्लीने पूह बीअर सहचर, निष्ठा आणि मैत्रीचा संदेश देण्याबाबत आदर्श असल्याचे घोषित करण्यात आले. तो दिवस ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार होता. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा करण्यात येतो.

हेही वाचा : ‘युनेस्को’ने शाळांमध्ये मोबाईलवर बंदी आणली, पण घरात काय ? मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांनी विचार केला का ?

आंतराष्ट्रीय आणि राष्ट्रीय असे दोन मैत्री दिवस का ?

संयुक्त राष्ट्र महासभेने दि. ३० जुलैला अधिकृत आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस म्हणून मान्यता दिली असली, तरी भारतासारखे अनेक देश ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस साजरा करतात. १९३० मध्ये हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक जॉयस हॉल यांनी ही कल्पना मांडली होती. हा दिवस मित्रांमध्ये भेटवस्तू आणि ग्रीटिंग कार्ड्सची देवाणघेवाण करून २ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात यावा, असा त्यांचा प्रस्ताव होता. त्यानंतर, नॅशनल असोसिएशन ऑफ ग्रीटिंग कार्ड्सने हॉलच्या प्रस्तावाला प्रोत्साहन दिले. पाच वर्षांनंतर, १९३५ मध्ये, पहिल्या महायुद्धाच्या आपत्तींनंतर, अमेरिकन काँग्रेसने मैत्रीचा दिवस साजरा करण्याचे ठरवले. देश आणि समुदायांमधील द्वेष, अविश्वास आणि शत्रुत्वाचे विचार कमी करण्याच्या प्रयत्नात अमेरिकेने हा उपक्रम हाती घेतला होता. २०११ मध्ये, शेवटी संयुक्त राष्ट्रांनी ३० जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून निश्चित केला.
मैत्री दिनाच्यामागे आणखी एक कथा प्रचलित आहे. असेही म्हटले जाते की, १९३५ मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकन सरकारने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला होता. ज्या व्यक्तीला मारलं त्याच्या मित्राने नंतर मित्राच्या आठवणीत आत्महत्या केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकी लोकांनी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मैत्री दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकार समोर ठेवला होता. त्या निर्दोष व्यक्तीचा जीव घेतल्याने जनता संतापली होती. त्यामुळे अमेरिकन सरकारने तब्बल २१ वर्षांनी १९५८ मध्ये तो प्रस्ताव मंजूर केला. यानंतर अमेरिकेच्या सरकारने हा दिवस मैत्री दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे घोषित केले.

हेही वाचा : विश्लेषण : ‘कलम ३७०’ची कूळकथा; हे कलम का आणि कोणासाठी ?

मैत्रीची भारतीय परंपरा

आजचा फ्रेंडशिप डे हा दिखाऊपणाकडे थोडा झुकतो. कार्डस, बँड्स, शुभेच्छा देणे असे या दिवसाचे प्रयोजन दिसते. फ्रेंडशिप डे च्या एका कथेनुसार कार्ड्सची विक्री अधिक व्हावी, यासाठी या दिवसाची निर्मिती झाली. मैत्री दिनाला आज अनेक राजकीय, सामाजिक रंग दिले जातात. पण भारताचा समृद्ध इतिहासही मैत्रीच्या कथा सांगतो. फ्रेंडशिप डे असा दिवस भारतीय इतिहासात आढळत नसला, तरी भारतामध्ये निखळ मैत्रीची परंपरा आहे. महाभारतापासून ही परंपरा आढळते. तसेच कौटिल्यानेही राजकीय मैत्रीसंबंधावर भाष्य केले आहे. केवळ ‘फ्रेंड्स’ या संकल्पनेपुरती त्या काळात मैत्री मर्यादित नव्हती. महाभारतानुसार, कृष्ण आणि द्रौपदी यांची निखळ मैत्री होती. द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी होती, तर कृष्ण हा पांडवांचा सखा होता. पांडवांसह त्याने द्रौपदीच्या उद्धाराचे काम केले. मुळात तिच्यावर जेव्हा वस्त्रहरणासारखा प्रसंग उद्भवला तेव्हा कृष्णाने तिचे रक्षण केले होते. तसेच कृष्ण आणि सुदामा यांचे सख्य प्रसिद्ध आहे. गुरुकुलापासून ते दोघे एकत्र होते. कालांतराने कृष्ण राजा झाला आणि परिस्थितीमुळे सुदामा गरीब राहिला. परंतु, कृष्ण मैत्री विसरला नाही. जेव्हा सुदामा कृष्णाला भेटायला जातो, तेव्हा कृष्ण त्याच्या पायातील काटे काढतो, त्याची सेवा करतो. आपण राजा आहोत, याचा कोणताही अभिनिवेश तो बाळगत नाही. कर्ण आणि दुर्योधन यांची मैत्री विश्वासावर आधारलेली होती. ते दोघे भाऊ असले तरी ते सख्ये नव्हते. विश्वास, योग्य निर्णयक्षमता त्यांच्यात होती. युद्ध आणि राजकीय गोष्टी ते एकमेकांना विचारून ठरवत असत. कृष्ण आणि अर्जुन यांची मैत्री ही इतिहासातील महत्त्वाची मैत्री आहे. संकटकाळी मित्राला योग्य मार्ग दाखवणे, त्याच्या सुख-दुःखात कायम सोबत राहणे, हे कृष्णाने केले. तो तत्त्वज्ञ असला तरी अर्जुनाला त्याने आधार दिला. त्यामुळे पांडवांमध्ये अर्जुन आणि कृष्णाचे नाते अधिक मैत्रीपूर्ण आणि दृढ होते. कृष्ण आणि राधा हे आध्यात्मिक मैत्रीचे प्रतीक आहे. कृष्ण आणि राधा यांना उत्तुंग प्रेमाची उपमा दिली जाते, परंतु, त्यांची मैत्री ही आध्यात्मिक होती. त्यात कोणत्याही विषयवासना नव्हता, निखळता होती. सीता आणि त्रिजाता यांची मैत्री ही रामायणातील अत्यंत महत्त्वाची मैत्री समजली जाते. त्रिजाता ही रावणाकडील एक स्त्री होती, तिला सीतेच्या रक्षणासाठी ठेवलेले होते ती रावणाच्या पक्षातील असली, तरीही सीतेची मैत्रीण होती. तिने सीतेला कधीच त्रास पोहोचवला नाही.
रामायण-महाभारतातील कथांप्रमाणे संस्कृत साहित्यामध्येही उत्तम मैत्रीची उदाहरणे दिसतात. हितोपदेश, पंचतंत्र अशा साहित्यात मैत्रीशी निगडित अनेक कथा सांगितलेल्या आहेत. खरा मित्र कसा ओळखावा, हेही सांगितले आहे. तेव्हा मैत्री सिद्ध करण्यासाठी किंवा मैत्री दाखवण्यासाठी कोणत्याही दिवसाची अथवा बँडची आवश्यकता नव्हती. त्यामुळे फ्रेंडशिप डे साजरा करताना किती मित्र आहेत यापेक्षा कोणत्या प्रकारचे आहेत आणि खरे आहेत का हे बघणे महत्त्वाचे ठरेल.