“Photography is a way of feeling, of touching, of loving. What you have caught on film is captured forever… It remembers little things, long after you have forgotten everything.”
– Aaron Siskind
अर्थ: “छायाचित्रण हे भावना, स्पर्श आणि प्रेम व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. ज्या वेळेस तुम्ही फोटो फिल्म मध्ये एखादा प्रसंग टिपता त्यावेळेस तो कायमचा बंदिस्त केला जातो … कालांतराने तुम्ही सर्व काही विसरलात तरी (या छयाचित्रांद्वारे) छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहतात.” – आरोन सिस्किंड (आरोन सिस्किंड हे अमेरिकेतील प्रसिद्ध छायाचित्रकार होते. सिस्किंड हे शिकागोच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये फोटोग्राफीचे प्रशिक्षक होते आणि त्यांनी १९६२ ते १९७१ या काळात तेथील विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. १९४० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९५० च्या दशकाच्या सुरुवातीतील सिस्किंडची अमूर्त छायाचित्रांनी अमेरिकेतील अवांत-गार्डे कलेच्या (Avant-Garde art) विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती.)
दरवर्षी, १९ ऑगस्ट रोजी, जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे छायाचित्र आणि त्याच्या इतिहासाचा जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर जागतिक छायाचित्रण दिन म्हणजे काय आणि याच तारखेला तो का साजरा केला जातो हे जाणून घेणे नक्कीच समयोचित ठरणारे आहे.
१८३७ मध्ये फ्रेंच कलाकार आणि छायाचित्रकार लुईस-जॅक-मँडे दागैर यांनी सर्व प्रथम डग्युरोटाइपचा शोध याच दिवशी लावला होता. डग्युरोटाइप म्हणजे आयोडीन-संवेदनशील सिल्व्हर प्लेट आणि पारा वाष्प वापरून सुरुवातीच्या फोटोग्राफिक प्रक्रियेद्वारे घेतलेले छायाचित्र. या शोधाची तारीख १९ ऑगस्ट आहे. लुईस-जॅक-मँडे दागैर यांची छायाचित्रणाची ही कल्पना फ्रेंच अकादमी ऑफ सायन्सेस यांनी विकत घेतली, जी जगासाठी महत्त्वाची ठरली, तो दिवस १९ ऑगस्ट १८३९ हा होता. त्यामुळेच या दिवशी जगातीक छायाचित्रणाचा दिवस साजरा करण्यात येतो. असे असले तरी जागतिक छायाचित्रण दिवस साजरा करण्यात यावा अशी कल्पना १९९१ पर्यंत कुठेही अस्तित्त्वात नव्हती, याचे श्रेय भारतीय छायाचित्रकार ओपी शर्मा यांच्याकडे जाते. त्यामुळे जगभरातील छायाचित्रकार त्यांचे ऋणी असल्याचे सांगतात.
अधिक वाचा : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी काश्मीरमध्ये नेमके काय घडत होते?
भारतीय छायाचित्रकार ओपी शर्मा
मला ही कल्पना १९८८ मध्येच आली जेव्हा, वेगवेगळ्या प्रकाशनांनी फोटोग्राफीच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करण्यास सुरुवात केली त्या सर्वांमध्ये एकच तारीख सामान होती ती म्हणजे १९ ऑगस्ट १८३९, असे ओपी शर्मा यांनी हार्मोनी सेलेब्रेटेड एज मॅगझीनला सांगितले. या तारखेला तत्कालीन फ्रेंच सरकारने दागेरोतीप या शोधाची घोषणा केली आणि जगासाठी ही मोफत भेटवस्तू असल्याचे जाहीर केले. “मी जगभरातील अनेक मास्टर्स आणि फोटोग्राफर्स समोर ही कल्पना मांडली, त्यापैकी सुमारे १५०, ज्यात RPS आणि फोटोग्राफिक सोसायटी ऑफ अमेरिका (PSA) यातील फोटोग्राफर्सचा समावेश होता. त्यांनी १९९१ च्या सुरूवातीस, एकमताने निर्णय घेतला आणि आम्ही त्या वर्षांपासून जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्यास सुरुवात केली.
दागेरोतीप म्हणजे काय?
लुईस-जॅक-मँडे दागैर हे एक कलाकार आणि भौतिकशास्त्रज्ञ होते, त्याच बरोबरीने ते एक प्रसिद्ध थिएटर डिझायनर देखील होते. जोसेफ निसेफोर निपसे यांचे ते व्यावसायिक भागीदार होते, ज्यांनी हेलियोग्राफी पद्धत ही छायाचित्रण प्रक्रियेची पूर्ववर्ती प्रक्रिया शोधली. १८२६ मध्ये निपेस यांची खिडकीतून चांदीचा मुलामा असलेल्या पॉलिश्ड शीटवर घेतलेली प्रकाश-संवेदनशील बिटुमेनसह अस्तित्त्वात असलेली प्रतिमा सर्वात जुनी आहे. १९३३ मध्ये निपसेच्या मृत्यूनंतर डग्युरेने स्वतःची अनोखी प्रक्रिया विकसित केली. त्यांनी १८३७ मध्ये दागैर ओटाइपचा शोध लावला, जी चांदीच्या आयोडाइडने लेपित तांब्याच्या प्लेटवर नोंदलेली प्रतिमा (पॉझिटिव्ह) होती.
इन-कॅमेरा तयार केलेल्या सुप्त प्रतिमा पारा बाष्पाच्या संपर्कात आल्याने विकसित केल्या गेल्या आणि नंतर मीठाच्या द्रावणाद्वारे उमटवल्या गेल्या. दागैर यांनी आपला प्रयोग फ्रेंच अकादमी ऑफ सायन्सेसला ६००० फ्रँकच्या वार्षिक पेन्शन, शिवाय निपेस इस्टेटला वार्षिक ४,००० फ्रँकचे वेतन या बदल्यात विकला. ७ जानेवारी १८३९ रोजी या प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आणि त्यावर्षी १९ ऑगस्ट रोजी संपूर्ण तपशील ‘जगाला मोफत’ देण्यात आला.
अधिक वाचा : हिंदू राजांनी प्राचीन भारतातील बौद्ध वास्तू नष्ट केल्या होत्या का?
एखाद्या व्यक्तीचे पहिले छायाचित्र कधी घेतले गेले?
दागेरोतीप प्रक्रिया ही अद्वितीय होती. यात प्रतिमेचे किंवा दृश्याचे पुन्हा छायाचित्रण केल्याशिवाय त्याचे पुनरुत्पादन केले जाऊ शकत नव्हते. तरीही ही प्रक्रिया खूप लोकप्रिय झाली. १८३८ मध्ये पॅरिसमधील दागैर यांच्या अपार्टमेंटच्या खिडकीतून काढलेले ‘बुलेवर्ड डू टेंपलचे दृश्य’, सुरुवातीच्या स्ट्रीट फोटोग्राफीचे एक अद्वितीय उदाहरण आहे. ज्यामध्ये माणसाची पहिली ज्ञात प्रतिमा टिपली गेली. या प्रतिमेत एक व्यग्र पॅरिसियन रस्ता दिसतो, हा रस्ता गर्दी आणि गाड्यांचा आहे. यात १०-१५ मिनिटांच्या एक्सपोजरचा वेळ लागत होता. परंतु, रस्ता असल्याने कोणीही तेथे स्थिर इतका काळ उभे राहत नव्हते, त्यामुळे मानवी प्रतिमा टिपली जाण्याची शक्यता फार कमी होती. तरीही एक अपवाद म्हणजे खालच्या-डाव्या कोपर्यात शूज चमकवणारा माणूस टिपला गेला आहे. तो अपघाताने दिसला का, की दागैरने त्याला पोझ देण्यास सांगितले? या प्रश्नाचे उत्तर आजही अनुत्तरित आहे. १८३९ मध्ये हे चित्र पाहून सॅम्युअल मोर्स यांनी नमूद केले: “हलणाऱ्या वस्तू प्रभावित होत नाहीत… परिणामी, त्याचे बूट आणि पाय चांगल्या प्रकारे दिसत आहेत, परंतु तो शरीर किंवा डोके नसलेला आहे कारण ते गतिमान होते.”
यानंतर पहिले टिकाऊ रंगीत छायाचित्र १८६१ मध्ये घेतले गेले होते आणि पहिल्या डिजिटल कॅमेऱ्याच्या शोधाच्या २० वर्ष आधी, १९५७ मध्ये पहिल्या डिजिटल छायाचित्राचा शोध लावला गेला होता.