आज २१ डिसेंबर म्हणजे जागतिक साडी दिन…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सचिन रिटायर झाला तेव्हा त्याच्या शेवटच्या भाषणातलं एक वाक्य होतं, ‘माझं २४ वर्षाचं आयुष्य या २२ यार्डात गेलं.’
याच ओळींवर एखाद्या साध्या भारतीय स्त्रीला डायलॉग मारायचा झाला तर ती म्हणेल, ‘माझं उभं आयुष्य या ४.५ यार्डाच्या साडीत गेलं.’

साडी (हार्ट डोळ्यातून बाहेर आलेला इमोन्जी) भारतीय पेहरावांपैकी सर्वात सुंदर पेहरावातली एक. भारतीय स्त्रीयांना साडी आवडते आणि पुरुषांना त्या साडीतल्या स्त्रीया. लहानपणापासून टिपीकल मराठी आणि त्यातही गावाची पार्श्वभूमी असलेल्या मराठी कुटुंबातून असल्याने आपल्यापैकी अनेकांना आई म्हणजे साडीतील बाई हे असं समीकरण डोक्यात पक्क बसलेलं असतं. म्हणजे लहानपणी आईच्या साडीच्या रंगावरून गर्दीत चालताना तिला शोधायच्या करामती जशा मी केल्यात तशा तुम्ही केल्याच असतील. आता माझ्यासारखे तुम्ही सेम रंगाच्या साडीच्या बाईचा पदर पकडून काही वेळानंतर ही ती नव्हेच असं रियलाइज झालेल्यांपैकी आहात की नाही हे
तुमचं तुम्हाला ठाऊक. पण अक्कल आल्यापासून आईला आणि गावी गेल्यावर आजी, काकी, मामी इन शॉर्ट ज्या विवाहित आहेत त्या सगळ्यांना कायमच साडी या एकमेव ड्रेस प्रकारात पाहिल्याने स्त्री म्हणजे साडी हे असं समीकरण लहानपणापासून डोक्यात.

आजीची साडी मात्र वेगळी असायची. मग सातवी आठवीत कळलं की त्या साडीला लुगडं असं गोंडस नाव आहे. मग नववीला कळलं की गोल साडी आणि लुगडं टाइपची अशा दोन प्रकारची साडी नेसतात. (साडी नेसतात घालत नाहीत हे तिने मला अनेकदा डोळे मोठे करून सांगतिलंय तरी मी हा ब्रॅकेट बाहेरचा नेसतात शब्द लिहीण्याआधी ‘साडी घालतात’ एवढं लिहून खोडलंय बरं का असो)

या दरम्यान साडीशी संबंध आला तो ‘माहेरची साडी’मुळे… अलका कुबल ही रडणारी बाई आहे यावर शिक्कामोर्तब करणारा या सिनेमाचे नाव प्रत्येक मराठी माणसाने कधी ना कधी नक्कीच ऐकले असणार… या सिनेमामुळे स्त्रीचा मृत्यू झाल्यावर तिच्या चितेवर माहेरची साडी लागते हे समजले. पण याच चित्रपटाच्या नावावरून आजही सासरचा शर्ट वगैरे टाइप जोक्स मारले जातात.

नंतर साडीचा थेट संबंध आला तो शाळेचे फेअरवेल. खरं तर तिथेही नाही इतका आला. कारण तेव्हा एका मित्राच्या भाषेत सांगायचे झाले तर नजर पक्की झाली नव्हती. तो नजरेला स्कॅनर म्हणतो पण कॉलेजमध्ये खास करुन ‘साडी डे’ला साडी नव्याने कळली. म्हणजे रोज असं काहीतरी मॉडर्न ड्रेसेस घालून येणाऱ्या मुली साडीत इतक्या छान दिसतात हे समजून घ्यायला कॉलेजमध्ये ‘साडी डे’ हवाच. म्हणजे अनेक कॉलेजेसमध्ये ‘साडी डे’बद्दल मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त उत्सुकता असते. कॉलेजमध्ये नक्की मुलं किती आहेत हे मोजायचं असलं तर साडी डे सारखा दिवसं नाही मी सांगतो. झाडून हजेरी असते या दिवशी कॉलेजला मुलांची साधारणत: मुलींच्या साडी डेला पोरांचा टाय डे असतो. अशा वेळेस होतं काय की परत मराठीपणा त्यातून मध्यम वर्गीयपणा आड येतो. अन् अनेकदा ही टाय ‘बॉरो’ करावी लागते. कधीतरी होतं असं की एकाच शहाण्याकडे बऱ्याच टाय असतात अनेकदा त्यातील एखादी आणायला सांगायची आणि तो कंठ लंगोट (टाय) गळ्यात लटकवून फिरायचं. दिवसभर एवढीच पोरांची काय ती त्या दिवसाची तयारी. थोड्या वेळाने अनेकजण कपाळावर बंडाना बांधतात तसा किंवा हातात रुमाल बांधतात त्या ठिकाणी येतो तो कंठलंगोट. तशा सगळ्याच नाही मनात भरायच्या पण लाल आणि काळी साडीतली मुलगी कायमच विशेष लक्षात राहायची. (आता काही जण किंवा जणी या लेखनामध्ये पोरींना ऑब्जेक्टीफाय केलंय वगैरे असा विचार करु शकतील मात्र इतर दिवशी पोरींकडे न पाहणाऱ्यांच्याही नजरा साडीच्या पदरावरून घसरत असतात त्यामुळे साडी डे कडे मुलांच्या नजरेत लस्ट म्हणजेच हवस असते अशा उद्देशाने न पाहता सौंदर्य दृष्टीने मुलं ते पाहतात असं समजावं, कमीत कमी या लेखा पुरतं तरी. बाकी तरी वाईट वाटलं असल्यास आत्ताच माफी)

मग साडी कळली तिच्यामुळे. आता या तीमध्ये ति (माझीवाली ति मुद्दाम पहिली कारण या मोजक्या तिंच्या लिस्टमध्ये ति कायमच पहिली असते म्हणून ‘ति’ बाकी सगळ्या दुसऱ्या ‘ती’) आणि ती दोघांचा समावेश आहे… तिच्या दादाच्या लग्नाच्या रिसेप्शनला तिला पाहिल्यांदा साडीमध्ये पाहिलं होतं मी. म्हणजे ती साडी डेलाही साडीतच आलेली पण ती लुगडं टाइप म्हणजे गावच्या टाइपमध्ये नेसून आलेली ती भगव्या आणि नारंगी रंगाची साडी (लाल नंतरची आणि भडक भगव्यामधला कोणताही रंग समजा हवा तर. मुलींसाठी
अनेक रंग असता मुलांसाठी बेसिक रंग असतात फक्त) तर तिच्या दादाच्या लग्नाच्या रिसेप्शनला तिला पाहिल्यांदा साडीमध्ये पाहिलं होतं. काय छान दिसत होती ती. बदामी आणि हिरव्या रंगाच्या साडीमध्ये आणि मी असा गबाळा गेलेलो. म्हणजे मी कितीही नटून गेलो पार चमकेश गेलो तरी ती साडीत असेल तर मलाच माझी लाज वाटते इतकी सुंदर दिसते ती. आमचीच नजर लागायची टाइप काहीतरी वाटतं मला. आता हा प्रवास दोन महिन्यापूर्वी साखरपुड्याच्या साडीपर्यंत आला. साडीतलं आपल्याला काही कळतं नाही यावर शिक्कामोर्तब करुन घ्यायचे असल्यास तिच्याबरोबर साडी खरेदीला जाच एकदा. बाकी तीमध्ये माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. कसल्या सुंदर दिसतात त्या साडीमध्ये. म्हणजे काय बोलणार आता त्यांच्या दिसण्याबद्दल. एक नंबर दिसतात असं कट्ट्यावरच्या भाषेत सांगता येईल. या इतक्या सुंदर दिसू शकतात का असा प्रश्न पडतो त्यांच्याकडे पाहिल्यावर.

आई आता थोडी मॉर्डन झाली आहे. म्हणजे ती आता पंजाबी ड्रेस वगैरे वापरू लागलीय पण ती जी काही साडीत दिसते ना त्याला तोड नाही. (मला फक्त साडी घ्यायला तिच्याबरोबर जायचा कंटाळा येतो अनेक साड्या पाहिल्यावर अनेकदा जगातील ९९ टक्के महिलांसारखी तिला पहिल्यांदा पाहिलेलीच साडी घ्यायची असते असचं होतं.) साडी कोणत्याही रंगाची असू देत आई ती साडी खूप छान प्रकारे कॅरी करते. म्हणजे वर म्हटलं त्यातील ति आणि इतर ती सगळ्यांना साडीची सवय नसल्याने गोंधळेल्या असतात साडीमध्ये पण आई काय कॅरी करते साडी एकदम ‘लाईक अ बॉस’ प्रकारेच म्हणा. काही मित्र-मैत्रिणींच्या आयांना विशेष प्रसंगी कोणाचं लग्न, कोणाचा वाढदिवस, सणवार असं वेगवेगळ्या वेळी मस्त मस्त साड्यांमध्ये नटलेलं बघून साडी वय लपवते यावर विश्वास बसतो. काय छान दिसतात त्या आया साडीमध्ये. म्हणजे आपलं मित्रमैत्रिणं नावाच्या सॅम्पलने त्या माऊलीकडून थोडा फॅशन सेन्स घेतला असता तर बरं झालं असतं असं
वाटतं. असो…

तरं अशी ही मानपानाची… लग्नानंतरची… भेट दिलेली… पहिल्या पगारातून घेतलेली… काही हजारांची…. सेलमध्ये मिळणारी… नऊवारी… सहावारी… मराठी… पंजाबी… दाक्षिणात्य… कांजीवरम… पैठणी… येवल्याची… बंगाली… तिला आवडलेली… काठ पदराची… प्लेन पदराची… अशा बऱ्याच विशेषणांनी ओळखी जाणारी साडी. सगळ्या महिलांनी (नाटकात आणि रंगमंचावर साडी नेसून काम करणाऱ्या पुरुषांनीही…) जागितक साडी दिनाच्या शुभेच्छा…

अशाच छान छान साड्या विकत घे राहा आणि छान छान दिसतं राहा… कारण साडी अच्छी है! शेवटी काय ना..

नारी इन साडी लुकींग लय लय भारी…

– स्वप्निल घंगाळे
swapnil.ghangale@loksatta.com