गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. मुंबईकर शिवसेनेला साथ देत भाजपला ‘औकात’ दाखवणार का भाजपच्या पारदर्शकतेच्या हाकेला प्रतिसाद देत ‘परिवर्तन’ घडवून आणणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. या लढतीत भाजपने शिवसेनेवर सरशी साधली. मुंबईतील एकुण २२७ वॉर्डांपैकी शिवसेनेला ८४, भाजप ८२, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी ९, मनसे ७ आणि इतर उमेदवारांना १४ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे ८४ जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबई पालिका निवडणुकीत भाजपने प्रथमच जोरदार मुसंडी मारली असून गेल्या निवडणुकीत अवघ्या ३१ जागा जिंकणाऱ्या भाजपने शिवसेनेला कडवी टक्कर देत ८१ जागा जिंकल्या आहेत. मुंबईत सत्तास्थापनेसाठी ११४ हा जादुई आकडा असून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही पक्ष युती करणार का आणि युती झाल्यास महापौरपदी कोणत्या पक्षाचा होणार, याची उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे.

mahavikas aghadi prakash ambedkar marathi news, prakash ambedkar latest marathi news, prakash ambedkar mahavikas aghadi marathi news
वंचितबरोबर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक
Chief Minister Eknath Shinde interacted with MLA Jitendra Awad
मुंबईवरून विधानसभेत खडाजंगी; वर्षा गायकवाड यांच्या पंतप्रधानांवरील टीकेवरून भाजप अस्वस्थ
electricity
कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…
Chahal, Bhide to be transferred after ECI orders
चहल, भिडे यांची बदली अटळ; राज्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

पुण्यात ‘कमळ’ फुलले; राष्ट्रवादीच्या घड्याळाची ‘टिकटिक’ बंद

शिवसेना व भाजप या तुल्यबळांच्या लढतीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे हे पक्ष काहीसे दुर्लक्षित ठरले असले तरी आजच्या निकालांनी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने हे पक्ष किंगमेकरच्या भूमिकेतही पाहायला मिळू शकतात.

..तर युतीसाठी सेनेने पुढे यावे!

 

 

दिवसभरातील ठळक घडामोडी

६.३०: मतदारांची नावं गायब होणं मोठा घोळ: उद्धव ठाकरे</p>

६.२०: मुंबईतील विजयाबद्दल मराठी आणि अन्य भाषिक मतदारांचे आभार: उद्धव ठाकरे

६.०५: वॉर्ड क्रमांक २२० मध्ये अतुल शहा आणि सुरेंद्र बागलकर यांच्यात दुसऱ्या मतमोजणीतही बरोबरी; चिठ्ठी उडवून निर्णय होणार

६.००: मुंबई महानगरपालिकेत युतीशिवाय मिळालेले यश लक्षणीय; सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करू- नितीन गडकरी

५.४५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शक आणि प्रामाणिकतेच्या राजकारणाला साथ देण्याचे काम मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेने केले आहे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

५.३०:  भाजपच्या मुंबईतील मुख्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष

५.१०: दुपारच्या निकालानंतर शिवसेना भवनासमोरील गर्दी ओसरली, शिवसैनिकांमध्ये निराशेचे वातावरण

५.०१: मुंबईत शिवसेना आणि भाजपने एकत्र यायला हवे: महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य.

५.००: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार

४.४५: शिवसेनेची अपक्षांशी बोलणी सुरू झाली आहेत: अनिल परब यांची माहिती.

४.३०: भाजपने ८१ जागा जिंकल्या असून ४ अपक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. यावरून भाजपाकडे एकूण ८५ जागांचे बळ आहे- आशीष शेलार यांचा दावा.

४.१५: मुंबईतील प्रभादेवी येथील प्रभाग क्र. १९४मधून शिवसेनेचे समाधान सरवणकर २०० मतांनी विजयी, सेनेचे बंडखोर उमेदवार महेश सावंत यांची कडवी लढत

४.००: संपूर्ण निकाल घोषित झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार

३.४५: विलेपार्ले येथील वॉर्ड क्र. ८५मधून भाजपच्या ज्योती अळवणी विजयी

३.३०: मुंबईतील वॉर्ड क्र. २१२ मधून अरुण गवळी याची कन्या गीता गवळी विजयी

३.००: दुपारच्या सत्रात भाजपची धक्कादायक वापसी; २२७ पैकी २२५ जागांचे निकाल जाहीर, भाजप ८०, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी काँग्रेस ९, मनसे ७, समाजवादी पक्ष ६,  एमआयएम २, इतर ५


३.००: शिवसेनेच्या घौडदौडीला लगाम: भाजपची वापसी

२.१५: मुंबईत शिवसेना ९३ जागांवर अडली; भाजपच्या जागांमध्ये वाढ होण्यास सुरूवात

२.१०: मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष

२.००: मुंबईतील प्रभाग क्र. १६३ मधून मनसेचे दिलीप लांडे तर, प्रभाग क्र. १६६ मधून मनसेच्याच संजय तुरडे यांचा विजय

१.५५: वॉर्ड क्रमांक २२३ मधून एमआयएमच्या नगरसेविका वकारुन्नीसा अन्सारी पराभूत, काँग्रेसच्या निकिता निकम विजयी

१.४५: वॉर्ड क्रमांक २२० मध्ये तणावपूर्ण परिस्थिती; फेर मोजणीनंतर अतुल शहा आणि सुरेंद्र बागलकरांना समसमान मते

१.४०: वॉर्ड क्रमांक १०६ मध्ये भाजपचे प्रभाकर शिंदे विजयी

१.३५: मुंबईत शिवसेना ५९, भाजप ३५, काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस ४, मनसे १ आणि अपक्ष उमेदवारांनी चार जागांवर विजय मिळवला आहे.

१.३०: गोरेगावमध्ये सुभाष देसाईंना धक्का; सातपैकी पाच जागांवर भाजप विजयी, भाजप आमदार विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक ठाकूर विजयी

१.२०: शिवसेनेच्या पालिकेतील सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव अवघ्या सात मतांनी पराभूत

१.१५: पराभवाची जबाबदारी स्विकारत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांचा राजीनामा

१.०८: मुंबईत शाहिस्तेखानाची बोटं छाटली- संजय राऊत

१.०७: मुंबईच्या वॉर्ड क्रमांक १९४ मध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार महेश सावंत आघाडीवर, समाधान सरवणकर पिछाडीवर

१.०५: मुंबईच्या वॉर्ड क्रमांक ११८ मध्ये मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या मंगेश सांगळे यांना पराभवाचा धक्का, शिवसेनेचे उपेंद्र सावंत विजयी

१.०३: शिवसेनेला धक्का , स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे पराभूत

१.०२: वॉर्ड क्रमांक २२६ मधून भाजपच्या हर्षदा नार्वेकर विजयी

१.०१: गिरगावामध्ये शिवसेनेला पराभवाचा धक्का, वॉर्ड क्रमांक २१८ मधून भाजपच्या अनुराधा पोतदार विजयी

१.००: वॉर्ड क्रमांक ८३ मधून काँग्रेसच्या विन्नी डिसोझा विजयी

१२.५८: वॉर्ड क्रमांक ८६ मधून काँग्रेसच्या सुषमा कमलेश राय विजयी

१२.५५: वॉर्ड क्रमांक ४५ मधून राम बारोट विजयी

१२.५०: वॉर्ड क्रमांक १०९ मध्ये शिवसेनेच्या दिपाली गोसावी विजयी

१२.४९: वॉर्ड क्रमांक २१५ मधून शिवसेनेच्या अरुंधती दुधवडकर विजयी 

१२.४७: मुंबईत शिवसेनेची बहुमताच्या दिशेने वाटचाल

१२.४५: मुंबईत शिवसेना ८९, भाजप ५४, काँग्रेस २०, राष्ट्रवादी ६ आणि मनसे १० जागांवर आघाडीवर

१२.४०: वॉर्ड क्रमांक १२७ मधून भाजपच्या रितू तावडे पराभूत; शिवसेनेचे सुरेश पाटील विजयी

१२.३९: वॉर्ड क्रमांक १९१ शिवसेनेच्या विशाखा राऊत विजयी; मनसेच्या स्वप्ना देशपांडे यांना पराभवाचा धक्का

१२.३८: वॉर्ड क्रमांक १६८ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. सईदा खान विजयी, शिवसेनेच्या अनुराधा पेडणेकर यांचा पराभव

१२.३४: वॉर्ड क्रमांक १२३ मध्ये शिवसेनेला धक्का, अपक्ष उमेदवार स्नेहल मोरे विजयी

१२.३३: वॉर्ड क्रमांक २२० मधून शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर विजयी

१२.३२: वॉर्ड क्रमांक १४४ मधून कामिनी शेवाळे यांना पराभव, भाजपच्या अनिता पांचाळ यांचा विजय

१२.३१: मुलुंडमधील सहा जागांवर भाजप विजयी

१२.३०: मुंबई भाजपचे अध्यक्ष यांचे बंधू विनोद शेलार यांना पराभवाचा धक्का; वॉर्ड क्रमांक ५१ मध्ये शिवसेनेचे स्वप्नील टेंबवलकर विजयी

१२.२५: वॉर्ड क्रमांक १२४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती हारून खान २८०० मतांनी विजयी

१२.२०: वॉर्ड क्रमांक २२३ मधून एमआयएमचा विजय, उकारउनीसा अन्सारी विजयी

१२.१९: घाटकोपरच्या वॉर्ड क्रमांक १३२ मधून भाजपच्या पराग शहा यांचा विजय, काँग्रेसच्या प्रवीण छेडा यांना पराभवाचा धक्का

१२.१५: मुंबईच्या वॉर्ड क्रमांक १०८ मधून भाजपच्या नील सोमय्या विजयी

१२.१२: मुंबईच्या वॉर्ड क्रमांक १३४ समाजवादी पक्षाच्या शायना खान विजयी

१२.१०: मुंबईच्या वॉर्ड क्रमांक ११० मध्ये काँग्रेसच्या आशा कोपरकर विजयी

१२.0५: मनसेने मुंबईत खातं उघडलं,  वॉर्ड क्रमांक १२६ मधून मनसेच्या अर्चना भालेराव विजयी

१२.0५: मुंबईत मनसेची अचानक मुसंडी, दहा जागांवर आघाडी

११.५७: वॉर्ड क्रमांक २०३ मधून भाजपच्या तेजस्विनी आंबोले यांचा पराभव; शिवसेनेच्या सिंधू मसूरकर विजयी

११.५६:  माहिम परिसरातून शिवसेनेच्या मिलिंद वैद्य यांचा विजय

११.५५:  वॉर्ड क्रमांक २०२ मधून माजी महापौर श्रद्धा जाधव विजयी

११.५४:  शिवसेनेचे अनिल कोकीळ विजयी

११.५३:  वॉर्ड क्रमांक १ मधून शिवसेनेच्या तेजस्विनी घोसाळकर विजयी; काँग्रेसच्या शीतल म्हात्रेंचा पराभव

११.५२:  वॉर्ड क्रमांक १८६ मधून शिवसेनेचे शिवराम नकाशे विजयी

११.५१:  मुंबईत मनसेचे दत्ता नरवणकर आघाडीवर

११.५०:  मुंबईतील २२७ वॉर्डमधील १३८  जागांचे कल हाती, शिवसेना ७०, भाजप ३८, मनसे ७ , काँग्रेस १४ जागांवर आघाडीवर

११.४९: मुंबईत मनसे ८ तर अपक्ष उमेदवारांची दोन जागांवर आघाडी

११.४५: मुंबईत शिवसेनेच्या राजूल पटेल आघाडीवर

११.४५: मुंबईच्या गुजरातीबहुल पट्ट्यातील ४२ पैकी २५ जागांवर भाजपची आघाडी

११.४०: मुंबईत काँग्रसेच्या ज्योत्सना दिघे आघाडीवर

११.३९: वॉर्ड क्रमांक २०० मध्ये तिसऱ्या फेरीत शिवसेनेच्या उर्मिला पांचाळ यांना १३८६ तर भाजपच्या ज्योत्सना पवार यांना ९९९ मते

११.३५: वॉर्ड क्रमांक १७२ मधून दहाव्या फेरीअखेर भाजपच्या राजेश्री शिरवाडकर २७६९ मतांनी आघाडीवर 

११.३४: शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नाना आंबोले यांना धक्का;  वॉर्ड क्रमांक २०३ मधून पत्नी तेजस्विनी आंबोले पिछाडीवर; सिंधूताई मसुरकर दोन हजार मतांनी आघाडीवर

११.३०: मुंबईत मनसेच्या भारती तांडेल आघाडीवर

११.२५: मुंबईतील १०० पेक्षा अधिक जागांचे कल हाती, शिवसेनेची ५५ जागांवर आघाडी

११.२०: वॉर्ड क्रमांक १७५ मध्ये शिवसेनेचे मंगेश सातमकर आणि काँग्रेसच्या ललिता यादव यांच्यात रस्सीखेच, सहाव्या फेरीअखेर समान मते

११.१४: लालबाग आणि वरळीत शिवसेनेची जोरदार मुसंडी

११.११: मुंबईत काँग्रेसचे अभयकुमार चौबे आघाडीवर

११.१०: वॉर्ड क्रमांक १९१ मध्ये शिवसेनेच्या विशाखा राऊत आणि मनसेच्या स्वप्ना देशपांडे पिछाडीवर; भाजपची अनपेक्षित आघाडी

११.१०: दादरच्या सातपैकी सहा जागांवर शिवसेनेची आघाडी; मनसेला मोठा धक्का

११.०५: किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या वॉर्ड क्रमांक १०८ मधून आघाडीवर

११.०४: वॉर्ड क्रमांक ५१ मध्ये विनोद शेलार आघाडीवर

१०.५५: शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आघाडीवर

१०.५५: घाटकोपर वॉर्ड क्रमांक १३२ पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये भाजप उमेदवार पराग शहा आघाडीवर , प्रवीण छेड़ा यांची पिछाड़ी , पराग शहा ८८४ मते , प्रवीण छेड़ा ७८९मते

१०.५४: मुंबईत भाजपच्या आशा मराठे आघाडीवर

१०.५४: मुंबईत शिवसेना २४ भाजप १३ जागांवर आघाडी

१०.५३: मुंबईत शिवसेनेच्या सेलिब्रेशनला सुरूवात, शिवसेना भवनाखाली फटाके फोडायला सुरूवात

१०.५३: शिवसेनेच्या महापौर स्नेहल आंबेकर आघाडीवर

१०.५२: वॉर्ड क्रमांक २०८ मधून मनसेचे किरण टाकळे आघाडीवर

१०.५०: मुंबईत शिवसेना १७, भाजप ११ , काँग्रेस ४ आणि राष्ट्रवादीची एका जागेवर आघाडी

१०.४८: मुंबईतील वॉर्ड क्रमांक १ ते वॉर्ड क्रमांक ७० मधील निकाल महत्त्वाचे

१०.४५: मुंबईच्या वॉर्ड क्रमांक १५० मध्ये गोंधळ, मतमोजणी थांबली

१०.४०: मुंबईत शिवसेना सहा जागांवर आघाडीवर, भाजपची तीन जागांवर आघाडी

१०.३९: मुंबईत भाजपचे महादेव शिगवण आघाडीवर 

१०.३८: वॉर्ड क्रमांक २२१ मधून भाजपचे आकाशा पुरोहित आघाडीवर

१०.३७: वॉर्ड क्रमांक १९४ मधून शिवसेनेचे समाधान सरवणकर आघाडीवर

१०.३६: मुंबईत वॉर्ड क्रमांक ४७ मधून काँग्रेसच्या उमेदवार पिंकी भाटिया आघाडीवर

१०.३५: मुंबईत काँग्रेसचे सुधीर भरडकर आघाडीवर

१०.३२: मुंबईत शिवसेना सहा तर भाजप दोन जागांवर आघाडीवर

१०.३२: भगवे झेंडे घेऊन शिवसैनिकांची सेनाभवनाबाहेर गर्दीला सुरुवात

१०.३१: परळमधून भाजपच्या तेजस्विनी नाना आंबोले आघाडीवर

१०.३०: मुंबईत शिवसेनेची ४ जागांवर आघाडी; भाजपची दोन जागांवर मुसंडी

१०.२७: वॉर्ड क्रमांक माजी महापौर श्रद्धा जाधव पहिल्या फेरीत १६२९ मतांसह आघाडीवर

१०.२७:  मुंबईत शिवसेना दोन जागांवर तर भाजपची एका जागेवर आघाडी

१०.२६: वॉर्ड क्रमांक भाजपचे अतुल शहा पिछाडीवर

१०.२५: मुंबईत सेनेचे सुरेंद्र बागुलकर आघाडीवर

१०.२४: वॉर्ड क्रमांक २१५ मध्ये अरूंधती दुधवडकर आघाडीवर

१०.२२: वॉर्ड क्रमांक २०० मध्ये पहिल्या फेरीत शिवसेनेच्या उर्मिला पांचाळ आघाडीवर

१०.२०: मुंबई महानगरपालिकेचा पहिला कल हाती; वॉर्ड क्र. २१८ मध्ये भाजपचा उमेदवार आघाडीवर

१०.१०: आशिष शेलार भाजपच्या मुंबईतील मुख्यालयात दाखल; मुख्यालयात भाजपकडून जय्यत तयारी

१०.०९: मुलुंड परिसरातील मतमोजणी केंद्रावर गोंधळ

१०.०७: टपाल मतमोजणी संपल्यानंतर ईव्हीएम यंत्रांतील मतमोजणीला सुरूवात

१०.०६: मतदानाची सांख्यिकी माहिती संकलित करण्यासाठी १३८ कर्मचारी आहेत

१०.०५: मुंबईत पोस्टल मतांची मोजणी संपली

१०.०१: सुरूवातीला पोस्टाने आलेल्या मतांची मोजणी होणार

१०.००: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात

९.४५: मतमोजणीसाठी उरली अवघी १५ मिनिटे; १५ मिनिटांत पहिला कल हाती येणार

९.३४: प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर असणार

९.३३: एका राऊंडसाठी सरासरी १५ मिनिटांचा वेळ लागणार 

९.३२:  मतमोजणीदरम्यान होणाऱ्या राऊंडची संख्या प्रभागातील एकूण मतदानावर अवलंबून असणार

९.३१: सुरुवातीला पोस्टल बॅलेट — पोस्टाने आलेल्या मतांची मोजणी होणार

९.३०: एका वॉर्डासाठी दोन टेबल, प्रत्येक टेबलवर दोन बॅलेट मशीन आणि काऊंटिंग मशिन

९.२८: प्रत्येक केंद्राच्या अंतर्गत असलेल्या सर्व वॉर्डांची मतमोजणी एकाच वेळी सुरु होणार

९.२५: मुंबईत एकूण २३ मतमोजणी केंद्रे, २३ निवडणूक निर्णय अधिकारी

९.२०: मुंबई महापालिका निवडणुकांच्या तुलनेत यंदा मतदानात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत तब्बल सहा लाख अधिक मतदारांनी मतदान केल्याची माहिती आहे.

९.१५: राज्यातील १० महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरासरी ५६.३० टक्के मतदानाची नोंद

९.१०: दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होण्याची शक्यता

९.०५: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी २८३ ठिकाणी तर महापलिकांसाठी १२३ ठिकाणी मतमोजणी होणार

९.००: मुंबईसह दहा महापालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांमधील २९ हजार ३२० उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला

८.५०: राजकीय पक्षांकडून मतमोजणी केंद्रांमध्ये मतमोजणीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आपल्या विश्वासातील कार्यकर्ते, समर्थकांची नियुक्ती

८.३५: सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी; यंत्रणा सज्ज

८.३०: मुंबईत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला

८.१५: दादरच्या हृदयातील प्रभाग म्हणून ओळख असलेल्या प्रभाग क्रमांक १९२ मध्ये शिवसेनेच्या विशाखा राऊत आणि मनसेच्या स्वप्ना देशपांडे यांच्यात बिग फाईट

८.१४: दादरच्या १९४ प्रभागात महेश सावंत, संतोष धुरी आणि समाधान सरवणकर यांच्यात बिग फाईट

८.१३: वॉर्ड क्रमांक १७८ मध्ये युवासेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले ,काँग्रेसचे जनार्दन किर्दत आणि काँग्रेसमधील बंडखोर रघुनाथ थवई यांच्यात लढत
८.१२: मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये पक्षनिहाय मराठी उमेदवारांची संख्या: शिवसेना-२०६, भाजप-१२०, काँग्रेस ११५, राष्ट्रवादी काँग्रेस-१०६, मनसे-१९१, रिपाइं (आठवले)-१८

८.१०: काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि एमआयएम हे पक्ष निवडणुकीत ताकदीने उतरल्याने मशीद बंदर, नागपाडा, भायखळा येथील मुस्लिमबहुल प्रभागांतील मतांचे विभाजन होण्याची शक्यता

८.०६: शिवसेना, मनसे आणि भाजपमुळे दक्षिण मुंबईतील माझगाव, लालबाग, परळ, भायखळा येथील मराठीबहुल प्रभागांतील मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता

८.०५: २०१२ मध्ये मराठी मतांच्या ताकदीवर मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले होते.

८.०४: पूर्व उपनगरातील भांडुप, विक्रोळी, मुलुंड पूर्व, घाटकोपर, दक्षिण मध्य मुंबईत लालबाग, परळ, वरळी, वडाळा, शिवडी, करी रोड, चिंचपोकळी, दादर; तर शहरी भागात गिरगाव, भायखळा, पश्चिम उपनगरात विलेपार्ले, गोरेगाव या ठिकाणी मराठी मतदारांचा टक्का चांगला

८.०३: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतांचे विभाजन कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडणार?

८.०२: मुंबई महानगपालिकेतील राजकीय पक्षांचे सध्याचे बलाबल (एकुण जागा २२७) : शिवसेना ७५, भाजप ३२, काँग्रेस ५२, राष्ट्रवादी काँग्रेस १३, मनसे २८, समाजवादी पक्ष ७, अखिल भारतीय सेना २, भारिप १, आरपीआय (आठवले गट) १, शेकाप १, अपक्ष १५

८.०१: मुंबईतील २२७ वॉर्डासाठी ५५ टक्के विक्रमी मतदान

८.००: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा आज निकाल