दादर पश्चिमेला असणाऱ्या अ‍ॅन्टोनी डिसिल्व्हा शाळेच्या मतमोजणी केंद्रावर दादर-माहीम विभागातील प्रभागांची मतमोजणी होणार होती. निकाल काय लागणार याची माहिती घेण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक यांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. यात शिवसनिकांची संख्या सर्वाधिक होती. दादर-माहीममधील ‘मनसे’च्या बालेकिल्याला भगदाड पाडले जावे अशी इच्छा शिवसनिकांकडून व्यक्त होत होती.

साडे दहा सुमारास निवडणूक अधिकाऱ्यांनी पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आणि शिवसनिकांनी ‘येऊन येऊन येणार कोण शिवसेनेशिवाय आहेच कोण’ च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. मतमोजणीच्या बारा फेऱ्यांनंतर निकाल कळणार होता. मात्र चौथ्या फेरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर माहिमच्या प्रभाग क्रमांक १८२ चे मिलिंद वैद्य यांच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशासह विजयाचा जल्लोष सुरु केला. अन्य उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक कायम होती. ‘मनसे’तून शिवसेनेत आलेले प्रकाश पाटणकर यांच्या चेहऱ्यावर पत्नी प्रिती पाटणकर (प्रभाग १९२) हिच्या निकालाबाबतचा तणाव दिसत होता. प्रिती विजयी झाल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली आणि शिवसनिकांनी प्रकाश पाटणकर यांना खांद्यावर उचलून घेतले. भगवा गुलाल उधळला आणि विजय साजरा केला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?

वैशाली पाटणकर (प्रभाग क्रमांक १९०) यांचे कार्यकत्रे सुरुवातीला उपस्थित नव्हते. भाजपच्या शितल देसाई यांचे तगडे आव्हान समोर असल्याने आपला उमेदवार पडणार या खात्रीनेच पाटणकर यांचे कार्यकत्रे याठिकाणी आले नसल्याची माहिती एका शिवसनिकाने दिली.

साडे बाराच्या सुमारास विशाखा राऊत आणि स्वप्ना देशपांडे (प्रभाग क्रमांक १९१)यांच्यातील चुरशीच्या लढतीचा निकाल जाहीर झाला. विशाखा राऊत विजयी झाल्याची घोषणा झाली आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ‘पसे पसरले, इंजिन घसरले’, अशी घोषणा शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिली.

Story img Loader