गेल्या तीन दिवसांमध्ये १० टक्क्यांची वाढ; दररोज एक कोटी रुपयांची अतिरिक्त उलाढाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महापालिका निवडणुकांच्या प्रचारसाहित्याच्या विक्रीमुळे बाजारपेठेत चैतन्य असताना गेल्या १५ दिवसांपासून चाललेल्या प्रचारामुळे पेट्रोल पंपचालकही सुखावले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी आपापल्या भागांमध्ये बाइक रॅली आणि प्रचार मिरवणुका यांचा धडाका लावला असून त्यामुळे शहर आणि उपनगरांमधील पेट्रोल पंपांवरील वाहनांच्या रांगा वाढल्या आहेत. या तीन-चार दिवसांमध्ये मुंबईतील पेट्रोलविक्रीत तब्बल १० टक्क्य़ांची वाढ झाली आहे. हा आकडा सुमारे दीड लाख लिटर असून त्यामुळे पेट्रोलविक्रीतून दर दिवशी एक कोटी रुपयांची उलाढाल वाढली आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारातील शेवटचे तीन-चार दिवस शहर आणि उपनगरांमध्ये उमेदवारांनी बाइक रॅली काढण्यावर भर दिला. विविध पक्षांचे झेंडे घेऊन निघालेल्या  दुचाकींच्या रांगा दर दिवशी पेट्रोल पंपांबाहेर पाहायला मिळत होत्या. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी तर शंभर-शंभर दुचाकीस्वार एकाच वेळी पेट्रोल पंपांबाहेर रांगा लावून उभे होते. या दुचाकी रॅलीमुळे तसेच उमेदवारांच्या प्रचारांसाठी फिरणाऱ्या चारचाकी गाडय़ांच्या ताफ्यामुळे शहरातील पेट्रोलच्या विक्रीत वाढ झाल्याचे निरीक्षण मुंबईतील पेट्रोल पंपमालक संघटनेचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी नोंदवले. मुंबईत २२३ पेट्रोल पंप असून प्रत्येक पेट्रोल पंपावर दर दिवशी सरासरी साडेसहा हजार लिटर पेट्रोलची विक्री होते. म्हणजेच मुंबईतील वाहने दर दिवशी १५ लाख लिटरच्या आसपास पेट्रोल पितात. गेल्या तीन दिवसांपासून या विक्रीत अंदाजे १० टक्क्य़ांची वाढ झाली असून सध्या मुंबईत दर दिवशी साडेसोळा लाख लिटर पेट्रोल विकले जात आहे. म्हणजेच नेहमीपेक्षा एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पेट्रोल जादा विकले जात आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. या पेट्रोलविक्रीत सर्वच पक्षांचा हातभार असल्याचेही शिंदे म्हणाले.