मुख्यमंत्र्यांच्या आई सरिता फडणवीस यांचा पनवेलमधील शिक्षक व विद्यार्थ्यांना कानमंत्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोठय़ांना आई आणि लहानग्यांना आजी म्हणून सांगते ऐका..अशा मोजक्या शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ७३ वर्षांच्या आई सरिता फडणवीस यांनी येथील शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांना छोटेखानी भाषणात भविष्यातील वाटचालीबद्दल वाटचालीबाबत चार मौलीक शब्द सांगितले.
पनवेलमधील मोठा खांदा गावातील पालिकेच्या विद्यालयामध्ये सामाजिक काम करणाऱ्या डॉ. शोभना पालेकर यांनी केलेल्या आग्रहामुळे त्या कार्यक्रमात सामान्य नागरिकांप्रमाणे उपस्थित होत्या. कोणताही सूरक्षेचा व हारतुऱ्यांचा बडेजाव नाही अशापद्धतीने पुणे येथून आल्या होत्या.
मोठा खांदा गावामधील पालिकेच्या जीवन शिक्षा मंदीरासमोर हा सोहळा पार पडला. इनरव्हील क्लबचे हे ३७ वे वर्ष. त्याचे अध्यक्षपद डॉ. शोभना यांच्याकडे आल्यावर त्यांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमातून निधी जमवला त्यातूनच विद्यालयात साहित्य वाटप केले. या उपक्रमासाठी त्यांनी सरिता फडणवीस यांना निमंत्रित केले होते.