मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहरात आणखी ५०० नवीन वायफाय हॉटस्पॉट सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्यामुळे सध्या सत्तधारी शिवसेना आणि भाजपकडून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नव्या घोषणा आणि विकासकामांची उद्घाटने सुरू करण्याचा धडाका सुरू आहे. याच मालिकेतील आणखी एक घोषणा आज मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली. या घोषणेनुसार मुंबईत आणखी ५०० नव्या ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट सुरू करण्यात येतील. येत्या १ मे २०१७ पर्यंत मुंबईतील वायफाय हॉटस्पॉटची संख्या १२०० पर्यंत नेण्याचा मानसही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. या माध्यमातून तरूणांना खूष करून शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा हेतू आहे. त्यामुळेच भाजपने वायफाय जोडणी करण्यात पुढाकार घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली होती. कारण, मुंबईला वायफाय जोडणी देण्याचे आश्वासन सेनेने २०१२च्या महापालिका निवडणुकीच्या जाहिरनाम्यात दिले होते. परंतु, राज्य सरकारने पुढाकार घेऊन सेनेवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.
मुंबईत आणखी ५०० ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट; मुख्यमंत्र्यांची घोषणा
१ मे २०१७ पर्यंत मुंबईतील वायफाय हॉटस्पॉटची संख्या १२०० पर्यंत नेण्याचा मानस
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-01-2017 at 16:52 IST
मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha cm devendra fadnavis announces activation of 500 wifi hotspots at various locations in mumbai