मनसेची जोरदार टीका; थापेबाजी उघडी पाडण्याचा इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावेल, याचा पत्ता नाही, पण नागपूरच्या गाजरवाले फडणवीसांच्या आश्वासनरूपी गाजरहलव्याची बुलेट ट्रेन सध्या सुसाट आहे. मुख्यमंत्री बनल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या गाजरापासून मुंबईकरांवर घरांसाठी चटई क्षेत्राच्या खैरातीपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या गाजरहलव्याची विक्री जोरात सुरू असल्याची टीका मनसेने केली आहे.

मुख्यमंत्री बनल्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या शासकीय आदेशांची छाननी केली असता निम्म्याहून अधिक शासकीय निर्णयांची केवळ कागदावरच अंमलबजावणी झालेली दिसेल. आदिवासी आश्रमशाळांमधील लाखो विद्यार्थ्यांना सकस आहार मिळत नाही. आश्रमशाळांमधील विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत. आदिवासी बालमृत्यू आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत झोपडय़ांना संरक्षण देण्यापासून जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींसाठी क्लस्टर योजना, वाढीव चटई क्षेत्र, पोलिसांसाठी एक लाख घरे, उपनगरासाठी गृहनिर्माण योजना अशा एकापाठोपाठ एक घोषणांची गाजरे वाटण्याचा सपाटा मुख्यमंत्री फडणवीस यांनी लावला आहे, अशी टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.

मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसनाच्या १४०४ योजनांपैकी गेल्या दोन वर्षांत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ाच योजनांना मंजुरी मिळाली आहे. मुंबईत ५२ लाख लोक झोपडपट्टीमध्ये राहत असून त्यांना आश्वासनांच्या गाजरहलव्याशिवाय आजपर्यंत काहीही हाती लागलेले नाही. हीच परिस्थिती धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाची असून दोन वेळा निविदा काढूनही पुनर्विकासाचे काम एक इंचानेही पुढे सरकलेले नाही. वरळीच्या बीडीडी चाळीचे पुनर्वसनही कुर्मगतीने सुरू असून पाच वर्षांत २२ लाख घरे उभारण्याच्या बाता मुख्यमंत्री जोरात मारत असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. पोलिसांसाठी एक लाख घरे आणि गिरणी कामगारांसाठी एक लाख घरे कधी बांधणार याचे वेळापत्रक मुख्यमंत्री देऊ शकतील का, असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलारही आश्वासनांची गाजरे वाटू लागले आहेत. आगामी निवडणुकीत भाजपच्या हलव्यातील हवा काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही नांदगावकर यांनी दिला.

  • सिंचन गैरव्यवहारप्रकरणी अजित पवार व सुनील तटकरे यांच्यावर साधे आरोपपत्रही हे सरकार ठेवू शकलेले नाही. कोटय़वधींची अवैध मालमत्ता असलेले कृपाशंकर हेही सुखेनैवपणे बाहेर आहेत, याकडेही बाळा नांदगावकर यांनी लक्ष वेधले.