मुंबईत राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली जाणार नाही, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केले असले तरी शिवसेना व भाजपला शह देण्याकरिता मुंबईतही आघाडी व्हावी, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मांडली आहे.
नगरपालिका निवडणुकांचा कौल लक्षात घेता भाजपशी लढा देण्याकरिता आघाडी व्हावी, असा दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांचा प्रस्ताव आहे. काँग्रेसमध्ये मात्र आघाडीवरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत. नारायण राणे यांनी आघाडीच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही आघाडी व्हावी, अशी भूमिका आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र आघाडीबाबत गुगली टाकली आहे. राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी करणार नाही, असे जाहीर करावे, अशी त्यांची मागणी आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे आघाडीला अनुकूल आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मात्र आघाडीच्या विरोधात भूमिका मांडली. मुंबईत आघाडी केली जाणार नाही, असे निरुपम यांनी आधीच जाहीर केले आहे.
निरुपम यांच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका राणे यांनी मांडली आहे. मुंबईत शिवसेना व भाजपची युती झाली वा झाली नाही तरी या पक्षांशी सामना करण्याकरिता दोन्ही काँग्रेसने एकत्र लढणे आवश्यक आहे, असे मत राणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडले. मुंबईतील काँग्रेसच्या अन्य काही नेत्यांनीही आघाडीबाबत अनकुलता दर्शविली आहे. पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही राणे यांचे म्हणणे आहे.
मुंबईत राष्ट्रवादीने प्रचाराला सुरुवात केली असून, खासदार सुप्रिया सुळे या गेले दोन दिवस शहरातील विविध भागांमध्ये दौरे करीत आहेत. आहेत. काही उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांची उद्घाटने सुळे यांच्या हस्ते झाली.
आघाडीला आमची तयारी -अहिर
काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची आमची सुरुवातीपासूनच तयारी होती, पण काँग्रेस नेत्यांची विधाने लक्षात घेता राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची तयारी केली. आघाडी होणार नाही, असे निरुपम यांनी वारंवार जाहीर केले आहे. यामुळेच राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची तयारी करून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, असे मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी स्पष्ट केले.