उद्यानाच्या कार्यक्रमावरून माजी महापौरांवर नगरसेवकाची टीका
सामाजिक संस्थांनी दहिसरमधील एका उद्यानात आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनावरून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष शिगेला पोहोचला असून आचारसंहिता जारी झाली असताना उद्यानाचे उद्घाटन केल्याची तक्रार माजी महापौरांसह तिघांविरुद्ध करण्याचा इशारा शिवसेनेच्या एका नगरसेवकाने दिला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर दहिसर परिसरात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
दहिसर येथील एल.आय.सी. कॉलनीमधील एक खासगी उद्यान पालिकेने ताब्यात घेतले असून माजी महापौर, नगरसेविका शुभा राऊळ, शिवसेनेचे नामनिर्देशित नगरसेवक अवकाश जाधव यांचा नगरसेवक निधी, तर आमदार रामदास कदम यांचा आमदार निधी वापरून या उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले. कर्मयोग उद्यान नावाने सर्वश्रुत असलेल्या या उद्यानाचे १० जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले होते.
आचारसंहिता जारी झाल्यानंतर काही दिवसांनी, १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून या परिसरातील सामाजिक संस्था आणि स्थानिक रहिवाशांनी कर्मयोग उद्यानात स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास शुभा राऊळ यांच्याबरोबर नगरसेविका शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांना आमंत्रित करण्यात आले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा या कार्यक्रमात सत्कारही करण्यात आला.
आचारसंहिता लागू असताना या कार्यक्रमात कर्मयोग उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले, असा दावा शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी केला आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर उद्यानाचे उद्घाटन झाल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी घोसाळकर यांनी केली आहे.
कर्मयोग उद्यानाच्या उद्घाटनामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. या प्रकरणी कार्यक्रमास उपस्थित असलेल्यांविरुद्ध निवडणूक आयोगाने कारवाई करावी. याबाबत आपण निवडणूक आयोग, निर्वाचन अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे.
– अभिषेक घोसाळकर, शिवसेना नगरसेवक
कर्मयोग उद्यानाचे उद्घाटन आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच, १० जानेवारी रोजी करण्यात आले आहे. सामाजिक संस्था आणि स्थानिक रहिवाशांनी केवळ स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आग्रहाचे आमंत्रण दिल्यामुळे शुभा राऊळ, अवकाश जाधव आणि आपण या कार्यक्रमास उपस्थित होतो. या कार्यक्रमामुळे आचारसंहितेचा भंग झालेला नाही.
– शीतल म्हात्रे, शिवसेना नगरसेविका