शिवसेनेची ताठर भूमिका; २३ व २६ जानेवारीला शक्तिप्रदर्शन
सत्तेच्या दबावापुढे न झुकता शिवसेना भाजपमागे फरफटत जाणार नाही, असे परखड प्रतिपादन करीत मुंबईत पाच वर्षे महापौर शिवसेनेचाच राहील, त्यात कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘पारदर्शी’पेक्षा ‘आरपार’च्या लढाईवर शिवसेनेचा विशास असून निवडणुकीच्या रणमैदानात महाभारत सुरू होईल, तेव्हाच आरपार काय असते, ते सर्वाना दिसेल, असा सणसणीत टोला राऊत यांनी लगावला. स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी शिवसेनेनेही सुरू केली असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी रोजी जन्मदिनानिमित्ताने आणि २६ जानेवारीला गटप्रमुखांच्या मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार, खासदार किरीट सोमय्या आदी भाजप नेत्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावर शिवसेनेला ‘लक्ष्य’ करून ‘पारदर्शी’ कारभाराचा आग्रह धरला आहे. भाजपच्याच अटींवर युती होईल, असे फडणवीस यांनी ठणकावल्याने राऊत यांनी भाजपमागे फरपटत जाणार नाही, असे स्पष्ट केले.
मात्र ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याच्या मूळ उद्दिष्टासाठी युतीची चर्चा करण्याची फडणवीस यांची भूमिका सकारात्मक असल्याचे राऊत यांनी सांगितले. युती होऊ नये, असे मत असलेला गट जसा भाजप नेत्यांमध्ये आहे, तसा तो शिवसेनेतही असू शकतो. पण मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीसंदर्भात अंतिम निर्णय घेतील, असे राऊत यांनी सांगितले.
सत्तेचा तराजू कायम वरखाली होत असतो, हे भाजपने लक्षात घ्यावे. निकाल काहीही लागले असले तरी शिवसेनेने आपल्या अटीशर्तीवरच राजकारण केल्याने आमच्याच अटींवर युती होईल, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला.
भाजप व शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून ताठर भूमिका असल्याने युतीची चर्चेतून फारसे निष्पन्न होण्याची शक्यता नाही.
- युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या २३ जानेवारीला असलेल्या जन्मदिनानिमित्ताने शिवसेनेने वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात समारंभाचे आयोजन केले आहे. ल्ल राज्यभरातील पदाधिकारी ठाकरे यांना आदरांजली वाहतील. त्याचबरोबर शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रुजविणाऱ्या मुंबईतील २२७ गटप्रमुखांसह अन्य पदाधिकाऱ्यांचा मेळावा गोरेगाव येथील एनएससी मैदानावर २६ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे.
- स्वबळावर लढायचे की युती करणार, याबाबत चर्चेचा निर्णय तोपर्यंत न झाल्यास ठाकरे आपली भूमिका २३च्या समारंभात किंवा या मेळाव्यात जाहीर करण्याची शक्यता आहे.
- उद्धव व आदित्य ठाकरे हे या मेळाव्यात गटप्रमुखांपुढे लोटांगण घालून भावनिक आवाहन करतील, त्याचवेळी प्रचाराचे रणशिंग फुकले जाईल, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.
- शिवसेनेला स्वबळावर १००हून अधिक जागा मिळतील, असे पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे शिवसेनेचा उत्साह दुणावला असून मुंबईत सर्वाधिक जागा शिवसेनेलाच मिळतील, असा नेत्यांना विश्वास वाटत आहे.