निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवार, २९ मे रोजी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये इतर मागासवर्गासाठी ६३ प्रभागांतील आरक्षण जाहीर होणार असून महिला आरक्षित प्रभागांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या आरक्षणावर २ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येणार आहे.

इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता –

महाराष्ट्रात इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता नव्याने प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात इतर मागासवर्गीयांसाठी २७ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने पुन्हा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.

Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
thane vidhan sabha campaign
निवडणूक प्रचारासाठी ठाण्यात ९४ रथांना परवानगी
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
Rajan Vikhare, demands CCTV system
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची मागणी
ajit pawar meet Prakash Ambedkar
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, तब्येतीची केली विचारपूस
Chandrapur marathi news
एकदाच मतदान करण्याचा अधिकार…पण, या गावात मात्र दोन वर्षांत चौथ्यांदा…
Belapur, Airoli, voters, society Belapur,
१५ हजार मतदारांचे सोसायटीतच मतदान, बेलापूरमध्ये १२ तर ऐरोलीत २ गृहसंकुलांत केंद्रे

मागासवर्गासाठी ६३ जागा आरक्षित होणार –

मुंबई महानगरपालिकेच्या २३६ जागांपैकी इतर मागासवर्गासाठी ६३ जागा आरक्षित होणार आहेत. यापैकी ३२ जागा इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित होणार आहेत. तर १५५ जागा खुल्या गटासाठी असतील. अनुसूचित जाती व जमातींचे आरक्षण लोकसंख्येच्या आधारे असल्यामुळे ३१ मे रोजी काढलेल्या सोडतीप्रमाणेच ते कायम राहील. मात्र ३१ मे रोजी महिलांच्या आरक्षित जागा निश्चित करण्यात आल्या होत्या, त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ओबीसीचे आरक्षण ठरवाताना प्राधान्यक्रम ठरवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. २००७, २०१२ व २०१७ मध्ये ओबीसी आरक्षण नसलेल्या प्रभागांची प्राधान्याने निवड करण्याचे आदेश दिले आहेत. अशा पद्धतीने ६३ जागा निवडून त्यातून महिलांसाठी सोडत काढली जाणार आहे.

१३ जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध करण्या येणार –

प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आल्यानंतर ३० जुलै रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर आरक्षण सोडतीवर ३० जुलै ते २ ऑगस्टपर्यंत हरकती, सूचना स्वीकारण्यात येतील व १३ जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध करण्या येणार आहे. नागरिकांना मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयात आपल्या हरकती व सूचना सादर करता येतील.

आकडेवारी –

मुंबईची एकूण लोकसंख्या – १ कोटी २४ लाख ४२ हजार ३७३

अनुसूचित जातींची लोकसंख्या – ८ लाख ३ हजार २३६

अनुसूचित जमातींची लोकसंख्या – १ लाख २९ हजार ६५३

प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या सरासरी ५२ हजार ७२२

एकूण प्रभाग – २३६, महिलांसाठी राखीव -११८

अनुसूचित जातींसाठी राखीव –१५ जागा, महिलांसाठी – ८

अनुसूचित जमातींसाठी राखीव – २ जागा, महिलांसाठी – १

इतर मागासवर्गासाठी – ६३ जागा, महिलांसाठी -३२

सर्वसाधारण वर्गासाठी – १५६ जागा, महिलासाठी – ७७