उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सर्वात महत्वाचा आणि निर्णायक भाग म्हणजे गोरेगाव. गोरेगाव हा समजवाद्यांचा बालेकिल्ला होता. गोरेगावमधील समाजवाद्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत सुभाष देसाई यांनी गोरेगावात शिवसेनेचे वर्चस्व प्रस्तापीत केले. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष देसाई यांचा विद्या ठाकूर यांनी पराभव केला आणि गोरेगावात शिवसेनेला उतरती कळा लागली. २०१७ पूर्वी गोरेगावात महानगर पालिकेत एखादा अपवाद वगळता शत प्रतिशत शिवसेना होती.

२०१७ ला महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का लागला. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या नंतर क्रमांक दोनचे नेते आणि तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई हे गोरेगाव पश्चिमेला राहतात. पक्षाच्या बांधणीत त्यांची महत्वाची भूमिका असते. असं असूनसुध्दा गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या महापालिकेच्या सर्वच्या सर्व पाच जागा भाजपाने जिंकल्या. गोरेगाव पूर्वेला शिवसेचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. सात पैकी पाच जागा जिंकून भाजपाने अनेक वर्षे शिवसेनच्या ताब्यात असलेली प्रभाग समिती खेचून आणली. ही बाब सुभाष देसाई यांना त्यावेळी जिव्हारी लागली होती.

त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सर्व उमेदवार निवडून आणून पुन्हा प्रभागसमिती खेचून आणण्यासाठी सुभाष देसाई प्रचंड आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी गोरेगावमध्ये चांगली ताकद असणाऱ्या समीर देसाई यांना भाजपामधून शिवसेनेत आणले. मात्र समीर देसाई 6यांच्या येण्यामुळे गोरेगावच्या शिवसेनेत गटबाजी आणि नाराजी वाढली आहे. सुभाष देसाई यांच्यासमोर गोरगावतील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे खूप मोठे आव्हान आहे. जर हे शक्य झालं तर या सात महापालिका प्रभागांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवता येईल.

Story img Loader