मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शुक्रवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीचा फटका अनेक दिग्गजांना बसला आहे. यामध्ये पालिकेत विविध पक्षांच्या नेत्यांचे वॉर्ड आरक्षित झाल्याने नव्या वॉर्डचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यातच वॉर्डची संख्या वाढल्याने अनेक वॉर्डच्या रचनेतही बदल झाला आहे. या सर्वांमुळे गेली पाच वर्षे वॉर्डमध्ये केलेल्या कामांवर पाणी सोडत नवा वॉर्ड शोधण्याची वेळ आली आहे.

शिवसेनेतून भाजपात आलेले आणि आता भाजपाचा पालिकेतील एक आक्रमक चेहरा म्हणून ओळख झालेले प्रभाकर शिंदे यांनी २०१७ च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १०६ मधून निवडणुक लढवली होती, विजयी झाले होते. बदललेल्या परिस्थितीत शिंदे १०९ वॉर्ड क्रमांकामधून निवणडणुक लढवण्याच्या तयारीत होते. असं असतांना नव्या आरक्षण सोडतीमध्ये १०९ हा सर्वसाधारण महिना आरक्षित झाला आहे. यामुळे प्रभाकर शिंदे यांना बाजुच्या उपलब्ध वॉर्डमधून निवडणुक लढवावी लागणार आहे.