ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड अशा भागात भाजप शिवसेनेचे बहुतेक सर्व भागात वर्चस्व आहे… मग ते आमदार असो किंवा नगरसेवक. या ठिकाणी होणाऱ्या विधानसभा आणि पालिका निवडणुकीत गेल्या १० वर्षात शिवसेना विरुद्ध भाजपा असाच संघर्ष बघायला मिळाला आहे. एवढंच नाही तर अनेकदा निवडणुका नसतांना जे राजकीय सुरु असतं ते प्रामुख्याने या दोन पक्षात. काही काळ काही भागात मनसेचे अस्तित्व या भागात होतं खरं, मात्र ते आता पुर्णपणे लयास गेलं आहे. हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात येण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळे पर्यंत या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद दिसली होती. २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर राष्ट्रवादीचे अस्तित्व पुसले गेले.
BMC Election 2022 : समाजवादी पार्टी, काँग्रेससाठी अनुकुल असलेला मानखुर्द-शिवाजीनगर परिसर
BMC Election 2022 : या भागात वॉर्डमधील लढती या प्रामुख्याने समाजवादी पार्टी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच होणे अपेक्षित आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-07-2022 at 21:29 IST
मराठीतील सर्व ईशान्य मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc election 2022 in mankhurd shivajinagar constituency wards are favorable for samajwadi party congress for pkd