मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचा चेहरा म्हणून ओळख असलेले, सेना-भाजपांना धारेवर धरणारे आक्रमक काँग्रेस नगरसेवक रवी राजा यांना वॉर्ड शोधण्याची कसरत करावी लागणार आहे. याआधी जीटीबी नगर – वॉर्ड नंबर १७६ मधून निवडुन आलेले रवी राजा यांनी पाच वर्षात सभागृहात शिवसेना-भाजपाचे वर्चस्व अशतांना भुमिका चोख बजावत काँग्रेसचे पुरेपुर अस्तित्व दाखवून दिले होते. २०१७ ची निवडणुक जिंकतांना शिवसेना-भाजपा एकमेकांच्या विरधात लढण्याचा फायदाही झाला होता. त्यामुळे यावेळी त्यांच्यापुढील आव्हान तेवढेच खडतर असल्याचं बोललं जात होतं.

पण मुंबई पालिकेत वाढलेली वॉर्डची संख्या, यामुळे वॉर्डची झालेली पुर्नरचना, त्यात पडलेले आरक्षण यामुळे नवीन वॉर्ड शोधण्याची वेळ रवी राजा यांच्यावर आलेली आहे. रवी राजा यांचा नवा वॉर्ड क्रमांक १८२ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. यापूर्वी ३१ मे रोजी काढण्यात आलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीतही हा प्रभाग आरक्षित झाला होता. त्यानंतर पुन्हा काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये त्यांना दिलासा मिळू शकला नाही.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader