तगडा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे वॉर्ड क्रमांक नंबर १७२ हा निवडणुकीसाठी सर्वात सुरक्षित वॉर्ड समजला जातो
दक्षिण मध्य मुंबईतील वॉर्ड क्रमांक १७२ हा भाजपा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघाचे आमदार आहेत भाजपाचे कॅप्टन तमील सेल्वन तर विद्यमान नगरसेविका आहेत भाजपाच्या राजेश्री शिरवाडकर. पूर्वीचा वॉर्ड क्रमांक १७२ आणि नवीन वॉर्ड रचनेनुसार रचनेनुसार १७८ नंबरचा वॉर्ड हा भाजपाच्या हमखास निवडून येणाऱ्या मतदारसंघांपैकी एक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाच्या राजेश्री शिरवाडकर यांनी गेली दोन टर्म हा मतदार संघ राखला आहे. यावेळी नवीन वॉर्ड रचनेतसुद्धा हा वॉर्ड महिला आरक्षित झाल्याने राजेश्री शिरवाडकर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.  या वॉर्डमध्ये सुमारे ४१ हजार मतदार आहेत. मतदार संघात भाजपासमोर प्रमुख आव्हान आहे ते काँग्रेसचे. मात्र आरक्षणामुळे या मतदारसंघातील समीकरणे पूर्णपणे बदलली. महापालिकेतील सुविधांबाबत तयार करण्यात आलेल्या तीन सदस्य असणाऱ्या श्वेत पत्रिका समितीमध्ये शिरवाडकर यांचा समावेश आहे. राजश्री शिवाडकर यांचे पती राजेश शिरवाडकर हे भाजपाचे दक्षिण मध्य जिल्ह्याचे प्रमुख आहेत. राजेश शिरवाडकर यांची ताकद आणि जनसंपर्क यामुळे भाजपाची बाजू मजबूत आहे.

मराठीतील सर्व दक्षिण मध्य मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In south central constituency ward no 172 is safest ward pkd