निश्चलनीकरणाच्या धाडसी निर्णयानंतर पहिल्यांदाच सादर होणा-या २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ च्या वर्षअखेरीस देशवासियांशी संवाद साधताना केलेल्या विविध घोषणांनंतर अर्थमंत्री अरूण जेटलींच्या सुटकेसमधून नवीन काय बाहेर पडणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. कर, तुटीचे गणित, काय स्वस्त आणि काय महाग होणार, प्रत्येक क्षेत्रासाठी केली जाणारी आर्थिक तरतूद, पहिल्यांदाच स्वतंत्रपणे सादर न होणा-या रेल्वेच्या वाट्याला काय येणार हे थोड्याच वेळात सादर होणा-या अर्थसंल्पानंतर निश्चित होणार आहे. नोटाबंदीने विकास मंदावल्याचे सूतोवाच अर्थसंकल्पपूर्व सर्वेक्षण अहवालात करण्यात आल्यामुळे आगामी आर्थिक वर्षात विकासदरालाही खीळ बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, देशात आर्थिक सुधारणा वेगात घडाव्यात असा आग्रहसुध्दा सर्वेक्षणात धरण्यात आल्याने जेटलींच्या घोषणांकडे सर्वांचे लक्ष असेल हे निश्चित. Union Budget 2017 LIVE Updates 
Live Updates
12:24 (IST) 1 Feb 2017
भीम अॅपच्या माद्यमातून कॅशलेस व्यवहारांची सुविधा, तसंच व्यापाऱ्यांसाठी कॅशबॅकची योजना. – अरुण जेटली
12:22 (IST) 1 Feb 2017
संरक्षण क्षेत्रासाठी २ लाख ७४ हजार कोटींची तरतूद. – अरुण जेटली
12:19 (IST) 1 Feb 2017
पुढील ५ वर्षासाठी रेल्वेच्या सुरक्षेसाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद. – अरूण जेटली
12:14 (IST) 1 Feb 2017
२०१९ पर्यंत रेल्वेतली सर्व शौचालयांचं रूपांतर बायोटॉयलेटमध्ये करण्यात येणार. – अरूण जेटली
12:13 (IST) 1 Feb 2017
अधारकार्डद्वारे आता खरेदी शक्य होणार. आधार कार्डाचा डेबिट कार्डप्रमाणे वापर करता येणार. – अरूण जेटली
12:08 (IST) 1 Feb 2017
वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी २५००० नवीन जागा. – अरूण जेटली
12:08 (IST) 1 Feb 2017
झारखंड आणि गुजरातमध्ये नवीन मेडिकल सेंटर्सची उभारणी केली जाणार. – अरूण जेटली
12:07 (IST) 1 Feb 2017
नवीन मेट्रो रेल धोरणामुळे युवकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. – अरूण जेटली
12:05 (IST) 1 Feb 2017
देशातील ७ हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार. – अरूण जेटली
12:04 (IST) 1 Feb 2017
देशात ३५०० किलोमीटर लांबीच्या नवीन लोहमार्गाची बांधणी करण्यात येणार. – अरूण जेटली
12:02 (IST) 1 Feb 2017
पीपीपी मॉडेलद्वारे छोट्या शहरांमध्ये विमानतळांची उभारणारणी करण्यात येणार. – अरूण जेटली
12:00 (IST) 1 Feb 2017
माध्यमिक शिक्षणासाठी कल्पकता निधी उभारणार आणि भारतभरात एकूण १०० स्किल सेंटर्सची निर्मिती करणार. – अरूण जेटली
11:58 (IST) 1 Feb 2017
रेल्वेचे ई-तिकिट खरेदी केल्यास सर्व्हिस चार्ज लागणार नाही. – अरूण जेटली
11:57 (IST) 1 Feb 2017
गर्भवती महिलांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा केले जाणार. – अरूण जेटली
11:56 (IST) 1 Feb 2017
तिर्थक्षेत्रे आणि पर्यटन यांच्यासाठी रेल्वेची स्वतंत्र योजना. – अरूण जेटली
11:55 (IST) 1 Feb 2017
ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारावर आधारीत हेल्थ कार्ड देणार. – अरूण जेटली
11:51 (IST) 1 Feb 2017
आगामी वर्षात रेल्वेसाठी १ लाख ३१ हजार कोटींची तरतूद. – अरूण जेटली
11:49 (IST) 1 Feb 2017
२०२५ पर्यंत देशातून टीबी रोगाचा पूर्णपणे नायनाट करू. – अरूण जेटली
11:48 (IST) 1 Feb 2017
ठिबक सिंचनासाठी अतिरिक्त ५००० कोटींची तरतूद – अरूण जेटली
11:47 (IST) 1 Feb 2017
मनरेगातून ५५ टक्के महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार. – अरूण जेटली
11:47 (IST) 1 Feb 2017
‘संकल्प’ प्रकल्पासाठी ४ हजार कोटी. ‘संकल्प’द्वारा तरूणांना रोजगार प्रशिक्षण देणार. – अरूण जेटली
11:45 (IST) 1 Feb 2017
तरूणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी ‘स्वयंम’ नावाची योजना सुरू करणार. – अरूण जेटली
11:44 (IST) 1 Feb 2017
सरकारचा तरूणांसाठी रोजगारभिमुख शिक्षणाचा संकल्प.
11:43 (IST) 1 Feb 2017
स्वच्छता अभियानाअंतर्गत देशातील ६० टक्के गावांमध्ये शौचालये उभारली गेली. – अरूण जेटली
11:42 (IST) 1 Feb 2017
ग्रामीण भागातील विजेसाठी ४५०० कोटी रूपयांची तरतूद.
11:41 (IST) 1 Feb 2017
२०१८ पर्यंत प्रत्येक गावापर्यंत वीज पोहचवण्याचा प्रयत्न. – अरूण जेटली
11:40 (IST) 1 Feb 2017
चलन तुटवडा लवकरच संपेल अशी अर्थमंत्री अरूण जेटली यांची ग्वाही.
11:37 (IST) 1 Feb 2017
ग्राम सडक योजनेसाठी १९ हजार कोटींची तरतूद. – अरूण जेटली
11:36 (IST) 1 Feb 2017
प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत दिवसाला १३३ किमीचे रस्ते तयार केले गेले. – अरूण जेटली
11:35 (IST) 1 Feb 2017
१ कोटी कुटुंब गरिबीमुक्त करणं हे सरकारचं लक्ष्य. – अरूण जेटली
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा