निश्चलनीकरणाच्या धाडसी निर्णयानंतर पहिल्यांदाच सादर होणा-या २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ च्या वर्षअखेरीस देशवासियांशी संवाद साधताना केलेल्या विविध घोषणांनंतर अर्थमंत्री अरूण जेटलींच्या सुटकेसमधून नवीन काय बाहेर पडणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. कर, तुटीचे गणित, काय स्वस्त आणि काय महाग होणार, प्रत्येक क्षेत्रासाठी केली जाणारी आर्थिक तरतूद, पहिल्यांदाच स्वतंत्रपणे सादर न होणा-या रेल्वेच्या वाट्याला काय येणार हे थोड्याच वेळात सादर होणा-या अर्थसंल्पानंतर निश्चित होणार आहे. नोटाबंदीने विकास मंदावल्याचे सूतोवाच अर्थसंकल्पपूर्व सर्वेक्षण अहवालात करण्यात आल्यामुळे आगामी आर्थिक वर्षात विकासदरालाही खीळ बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, देशात आर्थिक सुधारणा वेगात घडाव्यात असा आग्रहसुध्दा सर्वेक्षणात धरण्यात आल्याने जेटलींच्या घोषणांकडे सर्वांचे लक्ष असेल हे निश्चित.
Union Budget 2017 LIVE Updates
Live Updates
२०१९ पर्यंत ५० हजार ग्रामपंचायती गरिबीमुक्त करणार. – अरूण जेटली
३ वर्षात नाबार्डसाठी २० हजार कोटींची तरतूद. – अरूण जेटली
पुढील ५ वर्षात शेतक-यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी प्रयत्न करणार. – अरूण जेटली
शेतक-यांना कर्जवाटप करण्यासाठी अर्थसंल्पात १० लाख कोटींची तरतूद. – अरूण देणार
आगामी आर्थिक वर्षात तरूणांना रोजगार देण्याला प्राधान्य. – अरूण जेटली
देशाच्या परदेशी चलनसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. – अरूण जेटली
रेल्वे अर्थसंकल्प बंद झाला असला तरी त्याची स्वायत्तता कायम असेल. – अरूण जेटली
गरिबी निर्मुलन आणि पायाभूत सुविधा या दोन क्षेत्रांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणार. – अरूण जेटली
नोटाबंदीचा सरकारी महसूल वसुलीला सर्वात मोठा फायदा. – अरूण जेटली
‘हम आहे आगे चलते है, आइए आप..’ म्हणत देशाला पुढे नेण्यासाठी विरोधकांना सोबत येण्याचं अरूण जेटलींचं आवाहन.
नोटाबंदी हा देशासाठी अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच धाडसी निर्णय. – अरूण जेटली
जीएसटी संमत झाल्याबद्दल अरूण जेटली यांनी मानले जीएसटी समितीचे आभार.
उत्पादन क्षेत्रामध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक. – अरूण जेटली
‘आयएमएफ’च्या मते भारत ही २०१७ मधील सर्वात वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था. – अरूण जेटली
मंदावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न. – अरूण जेटली
जागतिक अर्थव्यवस्था मोठ्य़ा संकटातून जात आहे. – अरूण जेटली
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडून लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरूवात.
अर्थमंत्री अरूण जेटलींच्या भाषणाच्या आधी विरोधकांचा गोंधळ. गोंधळातच भाषण सुरू.
ई अहमद हे लोकसभेत उपस्थित असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि नंतर त्यांचे निधन झाले. त्यामुळे आज अर्थसंकल्प सादर करणे योग्य नाही. – मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते
खासदार ई अहमद यांना लोकसभेत श्रध्दांजली.
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी खासदार ई अहमद यांना सभागृहातर्फे श्रध्दांजली.
थोड्याच वेळात संसदेत अर्थसंकल्प सादर होणार.
खासदार ई अहमद यांच्या निधनाबद्दल लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी शोक व्यक्त केला. मात्र, अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे सांगितले.
अर्थमंत्री अरूण जेटली, राज्यमंत्री अर्जुन राममेघवाल, राज्यमंत्री संतोष गंगवार आणि अर्थमंत्रालयातील वरिष्ठ सदस्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यापुढे ‘अर्थसकल्प २०१७’ सादर केला.
माजी केंद्रीय मंत्री ई. अहमद यांच्या निधनानंतर आमच्या मते आणि केरळ तसेच जदयूच्या काही नेत्यांच्या मते केंद्रीय अर्थसंकल्प एक दिवस पुढे ढकलण्यात यावा. – मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते
लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अर्थसंकल्पातील तरतूदींबाबत अर्थमंत्री अरूण जेटली टि्वटरकरांच्या प्रश्नांना उत्तरं देणार.
अर्थमंत्री अरूण जेटली संसदेकडे रवाना.
अर्थमंत्री अरूण जेटली आणि इतर मंत्री नॉर्थ ब्लॉकवरून अर्थसंकल्प सादर करण्यासाठी रवाना. (छाया सौजन्य – वी. सुदर्शंन)
सकाळी ११ वाजता अर्थमंत्री अरूण जेटली २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा