रेल्वेशी संबंधित इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी नागपुरात एक बहुविभागीय प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी केली. त्याचबरोबर देशातील रेल नीर बॉटलिंग संयंत्राची स्थापना करण्यासाठी देशातील सहा शहरांमध्ये त्यांनी नागपूरची निवड केली. बन्सल यांनी जाहीर केलेल्या ६७ नव्या एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये महाराष्ट्रातून १६ गाडय़ा धावणार आहेत. महाराष्ट्राच्या वाटय़ाला सहा गाडय़ांचा विस्तार आला आहे.
मलकापूर-चिखली, मंगळवेढा मार्गे पंढरपूर-विजापूर, नायगाव आणि दिवा (जुचंद्र) दरम्यान वसई रोड बायपास लाइन आणि वाशीम-माहूर-आदिलाबाद रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण प्रस्तावित केले आहे. दौंड-मनमाड, परभणी-मनमाड, कल्याण-कर्जत तिसरी लाइन यांच्या दुहेरीकरणाचे सर्वेक्षण सुरू करण्यात येईल.
नव्या एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये अजनी (नागपूर)-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (िहगोलीमार्गे), बांद्रा टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेस, बांद्रा टर्मिनस-जैसलमेर एक्स्प्रेस, बांद्रा टर्मिनस-हिस्सार एक्स्प्रेस, बिकानेर-चेन्नई एसी एक्स्प्रेस (नागपूरमार्गे), चेन्नई-नागरकोल एक्स्प्रेस (साईनगर शिर्डीसाठी), गांधीधाम-विशाखापट्टणम एक्स्प्रेस (वर्धामार्गे), हजरत निझामुद्दीन-मुंबई एसी एक्स्प्रेस (भुसावळमार्गे), हुबळी-मुंबई एक्स्प्रेस (मिरज, पुणेमार्गे), जबलपूर-यशवंतपूर एक्सप्रेस (नागपूरमार्गे) (सर्व साप्ताहिक), कालका-शिर्डी एक्स्प्रेस (आठवडय़ातून दोनवेळा) या एक्स्प्रेस गाडय़ा महाराष्ट्राच्या वाटय़ाला आल्या आहेत.
२६ नव्या पॅसेंजर गाडय़ांमध्ये मडगाव-रत्नागिरी, न्यू अमरावती-नरखेड, पूर्णा-परळी अशा दररोज धावणाऱ्या तीन पॅसेंजर गाडय़ा महाराष्ट्राच्या वाटय़ाला आल्या आहेत.
५७ गाडय़ांच्या विस्तारामध्ये महाराष्ट्रातील दुर्ग-छपरा एक्स्प्रेस मुजफ्फरपूर आणि गोंदियापर्यंत, लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर एक्स्प्रेस पुरीपर्यंत, लोकमान्य टिळक टर्मिनस-दरभंगा एक्स्प्रेस रक्सौलपर्यंत (गेज परिवर्तनानंतर), मडगाव-हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस चंदीगढपर्यंत, मुंबई सीएसटी-लातूर एक्स्प्रेस हजूरसाहेब नांदेडपर्यंत, सोलापूर-यशवंतपूर एक्स्प्रेस म्हैसूपर्यंत, यशवंतपूर-हजरत निझामुद्दीन संपर्क क्रांती दोन दिवस चंदीगढपर्यंत, भुसावळ-अमरावती पॅसेंजर नरखेडपर्यंत, अशा गाडय़ांचा समावेश आहे.
फेऱ्या वाढविण्यात आलेल्या ३४ गाडय़ांमध्ये महाराष्ट्रातील सात गाडय़ांचा समावेश असून अहमदाबाद-नागपूर एक्स्प्रेस २ ऐवजी ३ दिवस, जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस ३ ऐवजी ७ दिवस, झांशी-बांद्रा टर्मिनस एक्स्प्रेस एकऐवजी २ दिवस, नरसापूर-नागरकोल एक्स्प्रेस (शिर्डीपाशी) २ ऐवजी ७ दिवस, विशाखापट्टणम-हजूरसाहेब नांदेड एक्स्प्रेस २ ऐवजी ७ दिवस धावेल.
२०१२-१३ मध्ये पूर्ण करावयाच्या दुहेरीकरणाच्या प्रकल्पात आपटा-जिते रेल्वेमार्गाचा समावेश आहे. बेलापूर-दौंड या भागाचे विद्युतीकरण करण्यात येईल.
राज्याच्या वाटय़ाला १६ नव्या एक्स्प्रेस
रेल्वेशी संबंधित इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी नागपुरात एक बहुविभागीय प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी केली. त्याचबरोबर देशातील रेल नीर बॉटलिंग संयंत्राची स्थापना करण्यासाठी देशातील सहा शहरांमध्ये त्यांनी नागपूरची निवड केली. बन्सल यांनी जाहीर केलेल्या ६७ नव्या एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये महाराष्ट्रातून १६ गाडय़ा धावणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-02-2013 at 05:53 IST
मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16 new trains announced for maharashtra state in railway budget