नवी दिल्ली : जलशक्ती मंत्रालयाच्या निधीत गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्के वाढ करण्यात आली आहे. २०२१-२२ मध्ये ६९ हजार ५२ कोटी रुपयांची तरतूद या खात्यासाठी केली होती. ती यंदाच्या अर्थसंकल्पात ८६ हजार १८९ कोटी रुपयांवर नेली आहे. यापैकी ६७ हजार २२१ कोटी पाणीपुरवठा आणि मलनि:सारण योजनांसाठी तर १८ हजार ९६७ कोटी ८८ लाख रुपये हे जलस्रोत, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन योजनेसाठी वापरला जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरोघरी नळजोडणी..

’ २०२२-२३ या वर्षांत ३.८ कोटी घरांना नळजोडण्या देण्यासाठी ६० हजार कोटी.

’ जल जीवन मिशनअंतर्गत २०२१-२२ साठी ५० हजार कोटी. आतापर्यंत ग्रामीण भागातील ८.७ कोटी घरांत नळजोडण्या.

’ केंद्राच्या अखत्यारीतील योजनांसाठीचा निधी ५,६८८ कोटी ४९ लाखा रुपयांवरून १२,६०५ कोटी १२ लाखांवर.

’ नद्यांच्या जोडणी प्रकल्पासाठी १,४०० कोटी.

’ जलस्रोत व्यवस्थापन योजनांच्या निधीत गतवर्षीच्या ७२९ कोटींवरून यंदा २,११२ कोटी रुपयांपर्यंत वाढ.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 percent increase in water resources department funds home plumbing akp
Show comments