Union Budget 2025 Stock Market Trend: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा पूर्ण अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी त्याचे सकारात्मक पडसाद बाजारावर दिसून आले होते. सकाळी ९ वाजता बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये १००० अंकाची उसळी दिसली. मात्र शनिवारी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाल्यानंतर बाजारात अनिश्चितता दिसून आली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये २०० अंकाची घसरण दिसली. तर निफ्टीमध्ये ३५ अंकांची घसरण झालेली पाहायला मिळाली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प आहे. सकाळी बाजार उघडताच बीएसई निर्देशांक ७७,७०० च्या पुढे आणि निफ्टी निर्देशांक २३,५०० च्या पुढे गेलेला पाहायला मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील निर्देशांकात सतत घसरण पाहायला मिळत असताना अर्थसंकल्पाच्या दिवशी त्यात किंचित वाढ झालेली दिसली. मात्र ती फार काही वेळ टीकली नाही.
सकाळी बाजारा उघडताच बीएसई निर्देशांक ७७,७०० च्या पुढे आणि निफ्टी निर्देशांक २३,५०० च्या पुढे गेलेला पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील निर्देशांकात सतत घसरण पाहायला मिळत असताना अर्थसंकल्पाच्या दिवशी त्यात किंचित वाढ झालेली दिसली.
विशेष करून अदाणी समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स तेजीत दिसत होते. अक्षयक्षम उर्जेशी (Renewable Energy) निगडित स्टॉक जसे की, आयनॉक्स विंड, आयनॉक्स विंड एनर्जी, केपीआय ग्रीन, सुझलॉन या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसली. संरक्षण क्षेत्राशी निगडित बीईएमएल आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स या शेअरमध्येही वाढ दिसून आली.
मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर २३ जुलै रोजी अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला गेला होता. त्यावेळी निफ्टीमध्ये ४ टक्क्यांची घसरण दिसून आली होती. तर मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये अनुक्रमे ४.६ आणि ८.१ टक्के घसरण दिसून आली होती. आर्थिक वाढीत आलेल्या मंदीचा परिणाम बाजार आणि परकीय गुंतवणुकीवर दिसून आला होता.