सोन्याच्या मागणीस आळा घालण्यासाठी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी चलनवाढीच्या निर्देशांकाशी निगडित असलेल्या कर्जरोख्यांची घोषणा केली आहे. याखेरीज गुंतवणुकीस अधिक उत्तेजन मिळावे म्हणून ‘राजीव गांधी इक्विटी’ बचत योजनेत काही सुधारणा करण्याचीही घोषणा चिदम्बरम यांनी केली.
सर्वसामान्यांनी सोन्यापेक्षा आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करावी. त्यायोगे बचत वाढीस लागून त्यामधील निधी उत्पादनवाढीसाठी उपयोगात आणता येईल आणि अंतिमत: आर्थिक वाढीसाठीही ही बाब उपयुक्त ठरेल, असे अर्थमंत्री म्हणाले.
१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत मालमत्तेत गुंतवणूक करून पहिल्यांदाच घरे खरेदी करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना एक लाख रुपयांपर्यंतची करसवलत देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. ‘राजीव गांधी इक्विटी’ बचत योजनेत पहिल्यांदा गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची मर्यादा आता १० लाख रुपयांवरून १२ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे चिदम्बरम यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा