केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या असून महिला, शेतकरी तसंच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आहे. यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. देशाच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे.
देशातल्या कर आकारणीबद्दल बोलताना सीतारामन यांनी महाभारतातल्या एका श्लोकाचा संदर्भ दिला आहे. आपल्या भाषणात सीतारामन म्हणतात, महाभारतातल्या शांतिपर्व अध्यायात कर आकारणीबद्दल लिहिलेलं आहे. राजाला जर कल्याण साधायचं असेल, तर धर्माने सांगितल्याप्रमाणे जो कर आहे तो वसूल करायला हवा.
अर्थसंकल्याविषयीच्या लाईव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.
कर परताव्याची नवी संधी
यासोबतच यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा देणाऱ्या काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. आयकर रिटर्न फाईल केल्यानंतर अनेकदा करदात्यांना काही चुका केल्याचं लक्षात येतं. त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने रिटर्न फाईल करण्याची संधी दिली जात आहे. करदात्याकडून एखादा आकडा किंवा उत्पन्न टाकायचं राहिल्यास त्यांची चौकशी होते. पण त्यांच्यावर विश्वास ठेवत ते बदलण्याची संधी देण्यात येईल.
कर आकारणीबद्दल सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
सहकार क्षेत्राला मोठा दिलासा
सहकार क्षेत्राला १८ टक्क्यांनुसार कर भरावा लागतो. तो १५ टक्क्यावंर आणण्यात आला आहे. को-ऑपरेटिव्ह सोसीयटी ज्यांचं उत्पन्न १ ते १० कोटी आहे त्यांचा कर १२ टक्क्यांपासून ७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. स्टार्टअपसाठी २०२३ पर्यंत करसवलत दिली जाईल असं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.