२०२४ साली देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मोदी २.० सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. ७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात येणार आहे. तसेच, गरीबांना १ वर्ष मोफत धान्य दिलं जाणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत दिली. पंतप्रधान आवास योजनेबद्दलही सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे.
निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, “पंतप्रधान आवास योजनेच्या तरतूदीत ६६ टक्क्यांची वाढ करण्याची आली आहे. आता पंतप्रधान आवास योजनेसाठी ७९ हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली,” अशी माहिती सीतारमण यांनी दिली. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद पंतप्रधान आवास योजनेसाठी केली होती.
हेही वाचा : इलेक्ट्रिक वाहने, स्मार्टफोन, टीव्ही; नेमकं काय स्वस्त होणार? अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा
कोणाला घेता येतो लाभ?
ज्या लोकांना पक्क घर नाही, त्या लोकांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो. त्यांच्याजवळ दुचाकी आणि तीनचाकी वाहन नसलं पाहिजे. तसेच, सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील कोणालाही याचा लाभ घेता येत नाही. कोणाच्या कुटुंबातील कोणीही १० हजार रुपये प्रति महिना कमवत असेल तर, त्यांनाही आवास योजनेचा लाभ मिळत नाही. फ्रीज, लँडलाईन, अडीच एकच शेती असलेल्यांनाही आवास योजनेचा लाभ घेता येत नाही.