Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी ११ वाजता मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प Union Budget सादर करतील. आज सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आपल्या निवासस्थानातून बाहेर पडतील आणि त्यानंतर अर्थमंत्रालयात पोहचतील. सकाळी ९ वाजता अर्थसंकल्प तयार करण्यासाठी जी टीम होती त्या टीमसह फोटोसेशन केलं जाईल. त्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची मंजुरी घेण्यासाठी निर्मला सीतारमण या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवासस्थानी पोहचतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता संसदेत भारताचा अर्थसंकल्प सादर होईल. अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही Loksatta.com वर वाचू शकता. तसंच Loksattalive या आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही अर्थसंकल्प Union Budget लाईव्ह पाहू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

[quiziframe id=55 dheight=282px mheight=417px

अर्थसंकल्पात काय महत्त्वाच्या तरतुदी असू शकतात?

१) निर्मला सीतारमण या नव्या सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी कररचनांमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. तसंच रोजगार निर्मितीच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या तरतुदी करतील अशी आशा आहे. मध्यमवर्गाला प्राप्तीकरात सूट देणार का? या गोष्टीकडेही देशाचं लक्ष असेल.

२) अर्थसंकल्पीय तूट ४.५ टक्के आहे. ही तूट मागच्या वर्षी ५.८ टक्के होती. या दृष्टीने अर्थसंकल्पात काय तरतूद केली जाईल याकडे ही देशाचं लक्ष लागलं आहे.

३) मोदी सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. यासाठीचा संभाव्य खर्च हा ११.१ लाख कोटी रुपयांचा आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत हा खर्च वाढला आहे. यावेळी कोणत्या पायाभूत सुविधांसाठी निधी दिला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हे पण वाचा- Union Budget 2024 Live Updates : केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार?

निर्मला सीतारमण यांनी काय संकेत दिले आहेत?

४) निर्मला सीतारमण यांनी हे संकेत दिले आहेत की सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात Union Budget तरतूद आहे. ती नेमकी काय? याकडेही देशाचं लक्ष लागलं आहे.

५) केंद्रीय अर्थसंकल्प ३० जुलै रोजी मंजूर होईल त्यानंतर २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेला बळ मिळेल या दृष्टीने पावलं उचलली जातील.

मूडीजने अर्थसंकल्पाबाबत काय म्हटलं आहे?

६) मूडीज अॅनलेटिक्सने वर्तवलेल्या अंदाजानुसार केंद्रीय अर्थसंकल्पात Union Budget खर्चात वाढ होण्याची चिन्हं आहेत. तसंच कर प्रणालीबाबत काही घोषणा होऊ शकतात.

24 Expectations on Taxation: आर्थिक वर्ष २०२४-२५ चा संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प २३ जुलै रोजी लोकसभेत सादर केला जाईल. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

७) मूडीज अॅनॅलेटिक्सच्या अर्थतज्ज्ञ आदिती रमण यांनी हे म्हटलं आहे की भाजपाला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालेलं नाही. सध्याचं सरकार हे एनडीए सरकार आहे. अशात अर्थसंकल्प लोकांमध्ये विश्वास निर्माण करणारा असेल. भारताच्या आर्थिक धोरणात फारसा बदल होईल असं वाटत नाही. मात्र निवडणूक निकालानंतर हा पहिला अर्थसंकल्प आहे त्यामुळे आधीपासून ज्या घोषणा केल्या गेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठीच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात तरतुदी असणार आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.