Budget 2024 for Nitish Kumar – Chandrababu Naidu : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं असून या नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (२३ जुलै) सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शेतकरी, महिला, युवा व नोकरदार वर्गासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. केंद्राने टॅक्स स्लॅबमध्येही बदल केला आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पाद्वारे केंद्र सरकारने बिहार आणि आंध्र प्रदेश राज्यासाठी केलेल्या घोषणा पाहून केंद्राने आंध्र प्रदेश व बिहारवर पैशांचा पाऊस पाडल्याची टीका केली जात आहे. केंद्रातलं मोदींचं सरकार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षांच्या पाठिंब्यावर उभं असल्यामुळेच केंद्र सरकारने या दोन राज्यांना रिटर्न गिफ्ट दिल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना बहुमत मिळवता आलेलं नाही. भाजपाने २४० जागा जिंकल्या असून त्यांना बहुमताचा २७२ जागांचा टप्पा ओलांडता आला नाही. एनडीएतील पक्षांच्या साथीने भाजपाने देशात सरकार स्थापन केलं आहे. प्रामुख्याने बिहारमधील नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडूंच्या पक्षांच्या पाठिंब्यावर मोदींचं स्थिर सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे या दोन नेत्यांच्या राज्यांचा अर्थसंकल्पात बोलबाला दिसत असल्याची टीका विरोधक करत आहेत.

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Ajit Pawar, sugar factory, Amit Shah allegation,
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा, अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका

“चंद्राबाबू नायडू-नितीश कुमारांना रिटर्न गिफ्ट”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. आव्हाड यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी भाजपाला दिलेल्या पाठिंब्याचं त्यांना रिटर्न गिफ्ट मिळालंय.”

Union Budget 2024
अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठ्या घोषणा

हे ही वाचा >> हे ही वाचा >> Budget 2024 Cheaper and Costlier List : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महागलं? वाचा पूर्ण यादी; सोन्या-चांदीबाबत मोठा निर्णय

आव्हाड यांनी म्हटलं आहे, “देशाच्या आर्थिक विकासात मुंबई आणि महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनवण्याच्या घोषणा करतात, परंतु महाराष्ट्राला निधी देण्याची वेळ आल्यावर मात्र तोंडाला पाने पुसली जातात. महाराष्ट्रातील फुटीरवाद्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काय आणलं? तर त्याचं उत्तर ‘ठेंगा’ असं आहे. अर्थसंकल्प सुरू असतानाच आज शेअर बाजार कोसळला, ही एकच गोष्ट बजेटचा अर्थ काढण्यासाठी पुरेशी आहे.”