Budget 2024 Updates: देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचं स्वरूप जरी अंतरिम असलं, तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य मतदारांसाठी अर्थसंकल्पात काही नव्या घोषणा होणार का? याची चर्चा पाहायला मिळत होती. त्याशिवाय गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जाहीर केलेल्या योजनांसाठी अर्थसंकल्पात नव्याने कोणती तरतूद केली जाते? याकडेही अर्थजगताचं लक्ष होतं. या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इथे पाहा अर्थसंकल्पाचं लाईव्ह कव्हरेज!

अर्थसंकल्पाबाबत तुम्हाला या भन्नाट गोष्टी माहिती आहेत का?

  • पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता सादर व्हायचा. १९९९ सालापासून तो सकाळी ११ वाजता सादर व्हायला लागला!
  • २०१७ साली रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पातच समाविष्ट करण्याची पद्धत सुरू झाली.
  • २०१९मध्ये विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री बनल्या.
  • निर्मला सीतारमण यांच्याव्यतिरिक्त याआधी फक्त माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच केंद्रीय महिला अर्थमंत्री म्हणून १९७० साली अर्थसंकल्प सादर केला होता.
  • यंदाच्या सहाव्या अर्थसंकल्पानंतर निर्मला सीतारमण माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सलग ६ अर्थसंकल्प मांडण्याच्या विक्रमाशी बरोबरी करतील.
  • मोरारजी देसाईंनी आपल्या कारकिर्दीत एकूण १० अर्थसंकल्प मांडले!
  • त्याखालोखाल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी. चिदम्बरम, यशवंत सिन्हा यांनी प्रत्येकी ५ केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले.
Live Updates

Budget 2024 Updates, Finance Minister Nirmala Sitharaman Speech: मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प; निवडणुकांआधी कोणत्या घोषणा होणार?

12:01 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: ५८ मिनिटांत अंतरिम अर्थसंकल्पाचं भाषण आटोपलं

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अवघ्या ५८ मिनिटांत अंतरिम अर्थसंकल्पाचं भाषण पूर्ण केलं असून ५.८ टक्के तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात कररचनेत कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत.

11:59 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: केंद्र सरकार श्वेतपत्रिका सादर करणार

आम्ही देश प्रथम या भूमिकेवर विश्वास ठेवून वाटचाल करत आहोत. शाश्वत विकासासाठी सर्वांगीण विकासाचा मार्ग आम्ही स्वीकारला आहे. २०१४ पूर्वी आपण कुठे होतो आणि आत्ता आपण कुठे आहोत याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. त्या वर्षांमध्ये किती गैरकारभार झाला, हे पाहून यातून धडा घेण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकार सभागृहात श्वेतपत्रिका सादर करणार – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:56 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करू – निर्मला सीतारमण

जुलै महिन्यात आमचं सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. त्या अर्थसंकल्पात विकसित भारतासाठीचा निश्चित रोडमॅप सादर केला जाईल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:51 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: ५.८ टक्के वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प सादर!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला ५.८ टक्के वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प

11:50 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या २.४ टक्क्यांनी वाढली आहे. मी करदात्यांच्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानते. नव्या कररचनेत ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. करपात्र उत्पन्नात ३ टक्क्यांची वाढ – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:46 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

देशातील तरुणांसाठी हा सुवर्णकाळ असेल. ५० वर्षांसाठीच्या बिनव्याजी कर्जाच्या योजनेसाठी १ लाख कोटींचं नियोजन करण्यात आलं आहे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:45 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि विकास यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करावा, यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:44 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

हवाई वाहतूक क्षेत्रासाठी १ हजार नवीन विमानांची तरतूद करण्यात आली असून ५०० हून अधिक नव्या हवाई मार्गांचे प्रस्ताव विचाराधीन आहेत – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:43 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: सरकारचा GDP वर समान भर – निर्मला सीतारमण

केंद्र सरकार गव्हर्नन्स, डेव्हलपमेंट आणि परफॉर्मन्स, अर्थात GDP वर समान भर देत आहे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:42 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

घरांवरील सोलर पॅनल्सच्या मदतीने येत्या काळीत १ कोटी घरांना महिन्याला ३०० युनिटपर्यंतची वीज मोफत पुरवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावेळी सोडलेला ऐतिहासिक संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने कार्यवाही केली जाईल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:38 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

१४ हजार सामान्य रेल्वेच्या बोगी वंदे भारतच्या दर्जानुसार विकसित केल्या जातील. यातून प्रवाशांना चांगल्या सुविधा व सुरक्षित प्रवास मिळेल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:37 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

तीन मोठे रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प राबवले जातील. पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत हे प्रकल्प राबवले जातील. – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:33 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

आशा सेविकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:31 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

भारत जगातला सर्वात मोठा दुग्धउत्पादन करणारा देश आहे. पण दुभत्या जनावरांचं उत्पादन मात्र अत्यंत संथ गतीने होत आहे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:30 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

क्रीडा क्षेत्रात आपल्या तरुण खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचा देशाला सार्थ अभिमान आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा व एशियन पॅरा गेम्स २०२३ मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक पदकं भारतीय खेळाडूंनी देशासाठी जिंकून आणली आहेत – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:28 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: अर्थव्यवस्थेची चांगली कामगिरी, महागाई सामान्य – निर्मला सीतारमण

भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असून महागाईचा दर सामान्य आहे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:27 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: २०४७ सालापर्यंत ‘विकसित भारत’चं लक्ष्य – निर्मला सीतारमण

२०४७ पर्यंत भारताला विकसित बनवण्यासाठी आमचं सरकार काम करत आहे – – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:25 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

उच्च शिक्षणात महिलांचा समावेश १० वर्षांत २८ टक्क्यांनी वाढला आहे. एसटीईएम अभ्यासक्रमांमध्ये मुली व महिलांचा सहभाग ४३ टक्के आहे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:24 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: हा फक्त अंतरिम अर्थसंकल्प – रावसाहेब दानवे

हा फक्त अंतरिम अर्थसंकल्प असेल, निवडणुकांनंतर पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल. त्यामध्ये लोकांसाठी काय काय केलं जाणार आहे, त्याच्या घोषणांचा समावेश असेल – रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री

11:22 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

अमृतकालसाठी धोरण काय? – शाश्वत विकास, सर्वसमावेशक विकास, उत्पादकता वाढवणे, संसाधनांमध्ये गुंतवणूक या गोष्टींचा समावेश असेल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:22 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

स्किल इंडिया मिशनअंतर्गत १.४ कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आला. तसेच, ५४ लाख तरुणांमध्ये कौशल्य विकास घडवून आणण्यात आला. ३ हजार नवीन आयटीआयची स्थापना करण्यात आली. ७ आयआयटी, १६ आयआयआयटी, ७ आयआयएम, १५ एम्स आणि ३९० विद्यापीठांची स्थापना करण्यात आली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:19 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: नागरिक आमच्या सरकारला बहुमत देतील अशी अपेक्षा – – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

आमच्या सरकारनं केलेल्या कामाच्या जोरावर देशाचे नागरिक पुन्हा एकदा आम्हाला घवघवीत बहुमत देतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:17 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार व ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी संसद भवनात दाखल झाल्या.

11:16 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: निर्मला सीतारमण यांनी केला तिहेरी तलाकचा उल्लेख!

ट्रिपल तलाक अवैध ठरवणं, संसद व स्थानिक सभागृहांमध्ये एकतृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवणं या निर्णयांमधून महिला सबलीकरणावर सरकारनं भर असल्याचं दाखवून दिलं आहे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:11 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

शेतकरी हे आपले अन्नदाता आहेत. पीएम केअर रिफॉर्म योजनेतीन दरवर्षी ८ कोटी शेतकऱ्यांना फायदा होतो. ४ कोटी शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेचा फायदा होतो – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:08 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: आमच्या सरकारचा ४ जातींवर भर – निर्मला सीतारमण

चार जातींवर आम्ही लक्ष ठेवायला हवं. त्या म्हणजे गरीब, महिला, तरुण व अन्नदाता. त्यांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास ही आमच्यासाठी प्राधान्याची बाब आहे. देशाचा विकास त्यांच्या विकासात दडलेला आहे. त्यांच्या विकासातून देशाचा विकास साध्य होणार आहे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:06 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

आमच्या सरकारने सर्वांगीण, सर्वस्पर्शी व सर्वसमावेशी विकासाचं धोरण ठेवलं आहे. २०४७ पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याचं धोरण आमच्या सरकारनं ठेवलं आहे. या विकासात सर्व जातींचा समावेश आहे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:05 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात गेल्या १० वर्षांत देशात सकारात्मक विकास झाला आहे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

10:29 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पाला मंजुरी

प्रथेप्रमाणे अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पावर केंद्रीय मंत्रिमंडळात औपचारिक चर्चा झाली. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानं अर्थसंकल्पाला मंजुरी दिली.

10:27 (IST) 1 Feb 2024
budget 2024 live updates: अर्थसंकल्पाबाबत तुम्हाला या भन्नाट गोष्टी माहिती आहेत का?

– पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता सादर व्हायचा. १९९९ सालापासून तो सकाळी ११ वाजता सादर व्हायला लागला!

– २०१७ साली रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पातच समाविष्ट करण्याची पद्धत सुरू झाली.

-२०१९मध्ये विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री बनल्या.

– निर्मला सीतारमण यांच्याव्यतिरिक्त याआधी फक्त माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच केंद्रीय महिला अर्थमंत्री म्हणून १९७० साली अर्थसंकल्प सादर केला होता.

– यंदाच्या सहाव्या अर्थसंकल्पानंतर निर्मला सीतारमण माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सलग ६ अर्थसंकल्प मांडण्याच्या विक्रमाशी बरोबरी करतील.

– मोरारजी देसाईंनी आपल्या कारकिर्दीत एकूण १० अर्थसंकल्प मांडले!

– त्याखालोखाल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी. चिदम्बरम, यशवंत सिन्हा यांनी प्रत्येकी ५ केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले.

Interim Budget 2024 Streaming : अर्थसंकल्प समजून घेताना…

Budget 2024 Updates, Finance Minister Nirmala Sitharaman Speech: अर्थसंकल्पविषयक सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर!