Budget 2024 Updates: देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचं स्वरूप जरी अंतरिम असलं, तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य मतदारांसाठी अर्थसंकल्पात काही नव्या घोषणा होणार का? याची चर्चा पाहायला मिळत होती. त्याशिवाय गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जाहीर केलेल्या योजनांसाठी अर्थसंकल्पात नव्याने कोणती तरतूद केली जाते? याकडेही अर्थजगताचं लक्ष होतं. या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इथे पाहा अर्थसंकल्पाचं लाईव्ह कव्हरेज!

अर्थसंकल्पाबाबत तुम्हाला या भन्नाट गोष्टी माहिती आहेत का?

  • पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता सादर व्हायचा. १९९९ सालापासून तो सकाळी ११ वाजता सादर व्हायला लागला!
  • २०१७ साली रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पातच समाविष्ट करण्याची पद्धत सुरू झाली.
  • २०१९मध्ये विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री बनल्या.
  • निर्मला सीतारमण यांच्याव्यतिरिक्त याआधी फक्त माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच केंद्रीय महिला अर्थमंत्री म्हणून १९७० साली अर्थसंकल्प सादर केला होता.
  • यंदाच्या सहाव्या अर्थसंकल्पानंतर निर्मला सीतारमण माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सलग ६ अर्थसंकल्प मांडण्याच्या विक्रमाशी बरोबरी करतील.
  • मोरारजी देसाईंनी आपल्या कारकिर्दीत एकूण १० अर्थसंकल्प मांडले!
  • त्याखालोखाल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी. चिदम्बरम, यशवंत सिन्हा यांनी प्रत्येकी ५ केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले.
Live Updates

Budget 2024 Updates, Finance Minister Nirmala Sitharaman Speech: मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प; निवडणुकांआधी कोणत्या घोषणा होणार?

18:28 (IST) 1 Feb 2024
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

17:09 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं अर्थसंकल्पाचं स्वागत

वर्तमानाचा अभिमान आणि भविष्याबद्दल आशा व आत्मविश्वास, असा हा अंतरीम अर्थसंकल्प आहे. आजवर या देशाने ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान…’ हा नारा प्रबळ केला ; मोदी सरकारचा यापुढचा नारा आहे.. ‘जय अनुसंधान..!!’ हा नारा भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकेल असा दुर्दम्य आत्मविश्वास देणारा आहे. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या गरजा,आकांक्षा आणि कल्याण हे मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.. आणि तोच आजच्या सर्वांगीण विकास साधणाऱ्या आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्पाचा गाभा आहे. मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन करतो. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी म्हटल्याप्रमाणे, मोदी सरकारचा जुलै महिन्यातील अर्थसंकल्प विकसित भारताचा नवा रोडमॅप घेऊन येईल, असा विश्वास वाटतो – चंद्रशेखर बावनकुळे

16:37 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: अजित पवारांची सविस्तर पोस्ट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचं हित जपणारा, देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, विकसित भारताची पायाभरणी करुन देशवासियांची मनं जिंकणारा आहे. या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पाचं मी स्वागत करतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, आज लोकसभेत वर्ष २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प निवडणूक अर्थसंकल्प असेल अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षांवर हा अर्थसंकल्प खरा उतरला आहे. या अर्थसंकल्पानं २०४७ पर्यंतच्या विकसित भारताची पायाभरणी केली आहे. गरीब, महिला, युवक आणि अन्नदाता शेतकरी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी कॉर्पस फंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संशोधन व विकास या क्षेत्रांत नवीन उद्योग यावेत यासाठी ५० वर्षे कालावधीचे व्याजमुक्त अर्थसाह्य, त्यासाठी सरकार एक लाख कोटी रुपयांचा निधी तयार करणार तसंच राज्य सरकारांना आर्थिक सुधारणांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचं ५० वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणा, या सगळ्या बाबी राज्यांच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहेत. प्रधानमंत्री किसान योजनेतून ११ कोटी ८० लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत, ४ कोटी शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेचा लाभ, आत्मनिर्भर तेलबिया अभियानांतर्गत मोहरी, तीळ, सूर्यफुल, शेंगदाणा, सोयाबीन या तेलबिया देशातच तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न, दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष योजना, राष्ट्रीय गोकुल मिशनसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना बळ मिळणार आहे. देशात ३ हजार नवीन आयटीआय, ७ आयआयटी, १६ आयआयआयटी, ७ आयआयएम तसंच १५ एम्स आणि ३९० विद्यापीठांची घोषणा उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणारी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणारी, त्यांना संधी देणारी आहे – अजित पवार, उपमुख्यमंत्री

16:36 (IST) 1 Feb 2024
Budget 2024: कररचनेत कोणताही बदल नाही, पण नियमित करदात्यांसाठी ‘ही’ दिलासादायक घोषणा; काय म्हणाल्या निर्मला सीतारमण?

Budget 2024 Latest Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात नियमित कररचनेत कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत.

वाचा सविस्तर

15:45 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: महाराष्ट्रावर अन्याय का? – आदित्य ठाकरे

फक्त महाराष्ट्रावर अन्याय का? आम्हाला समानतेनं आणि न्याय्य पद्धतीने का वागवलं जात नाही? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशभरातील विमानतळांच्या विस्ताराविषयीचा मुद्दा मांडला. पण मग महाराष्ट्राला या योजनेतील समान हिस्सेदार का मानलं जात नाही? पुण्यातील प्रस्तावित नवीन विमानतळाबाबत एक शब्दही अर्थसंकल्पात का नाही? मविआ सरकारनं प्रस्तावित केलेलं विमानतळ विद्यमान सरकारनं रद्द ठरवलं. सध्याच्या विमानतळातल्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनासाठीही या सरकारला वेळ नाही. गेल्या ५ महिन्यांपासून हे टर्मिनल बांधून तयार आहे – आदित्य ठाकरे

15:26 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

गेल्या ६० वर्षांत जे निर्णय झाले नाहीत, ते गेल्या १० वर्षांत झाले. गरीब, शेतकरी, महिला व तरुण या चार प्रमुख घटकांना त्यांनी न्याय दिला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करावं, हे त्यांनी दाखवून दिलं. आजच्या अर्थसंकल्पात महिला व मुलींना प्राधान्य दिलं आहे. पंतप्रधान आवास योजनेत २ कोटी घरं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकप्रकारे रोटी, कपडा, मकान देणारा हा अर्थसंकल्प व हे केंद्र सरकार आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

14:37 (IST) 1 Feb 2024
”आम्ही चार जातींवर लक्ष केंद्रित केलंय,” निर्मला सीतारमण म्हणाल्या, ”गरीब, महिला…”

प्रत्येक घराला पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडून देण्यासाठी काम करण्यात आले आहे. अन्ना संबंधीची समस्या दूर केली आहे.

सविस्तर वृत्त

14:36 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 ”एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ करण्यात आले,” निर्मला सीतारमण म्हणाल्या, ”९ कोटी महिलांच्या…”

Budget 2024 Latest Updates आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात आले आहे, असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्यात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करीत आहेत.

सविस्तर वृत्त

14:35 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 : ”कर रचनेत कोणताही बदल नाही”, निर्मला सीतारमण म्हणाल्या…”जीएसटी संकलन…”

Budget 2024 Latest Updates : जीएसटी संकलन दुपटीने वाढले आहे. जीएसटीने अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला.

सविस्तर वृत्त

14:33 (IST) 1 Feb 2024
Railway Budget 2024 : ४० हजार वंदे भारत बोगी मिळणार; मोदी सरकारचं रेल्वेला गिफ्ट, अर्थसंकल्पातही ‘या’ मोठ्या घोषणा

Budget 2024 Latest Updates सुमारे ४० हजार रेल्वे बोगींचे वंदे भारत बोगीत रूपांतर केले जाणार आहे. याबरोबरच सरकारने ३ नवीन रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा केली असून, फ्रेट कॉरिडॉरचे कामही सुरू आहे.

सविस्तर वृत्त

13:58 (IST) 1 Feb 2024
“सामान्य माणसाच्या डोक्यावरील टांगती तलवार…”, अंतरिम अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

“आजच्या अर्थसंकल्पात प्राप्तीकर सूट योजनेची (Income tax remission scheme) घोषणा करण्यात आली आहे. या योजनेमुळे मध्यमवर्गातील एक कोटी लोकांना दिलासा मिळणार आहे. आमच्या आधीच्या सरकारने अनेक दशकांपासून सामान्य माणसाच्या डोक्यावर ही एक मोठी टांगती तलवार ठेवली होती. ती आम्ही बाजूला केली”, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक अर्थसंकल्पाच्या शुभेच्छा देशातील सर्व नागरिकांना दिल्या.

सविस्तर बातमी वाचा

13:24 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: लखपती दीदीचं ध्येय वाढवलं – नरेंद्र मोदी

आम्ही २ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं ध्येय ठरवलं होतं. आता हे ध्येय ३ कोटींपर्यंत वाढवलं आहे. आयुष्मान भारत योजनेनं गरिबांना मोठी मदत केली आहे. आता अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना याची मदत होईल. गरीब वर्गाची उत्पन्नाची साधने वाढवण्यावर जोर देण्यात आला आहे – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

13:23 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates:

अर्थसंकल्पात वंदे भारत दर्जाच्या ४० हजार आधुनिक कोचेसची निर्मिती करून ते सामान्य प्रवासी रेल्वेमध्ये जोडण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे कोट्यवधी प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. आम्ही एक मोठं ध्येय ठरवतो, ते पूर्ण करतो आणि त्यानंतर त्याहून मोठं ध्येय ठरवतो – नरेंद्र मोदी</p>

13:18 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: अर्थसंकल्पात दोन महत्त्वाच्या घोषणा – मोदींनी केला उल्लेख

अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. संशोधनावर १ लाख कोटींचा निधी तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्टार्टअप्सला मिळणाऱ्या करसूटीचा विस्तार करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. वित्तीय तुटीला नियंत्रणात ठेवतानाच भांडवली खर्चाला ११ लाख ११ हजार १११ कोटींपर्यंतच्या ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवण्यात आलं आहे. अर्थतज्ज्ञांच्या भाषेत सांगायचं तर हा एकप्रकारे स्वीट स्पॉट आहे. यामुळे भारतात २१व्या शतकासाठी आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीबरोबरच युवकांसाठी अगणित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील – पंतप्रधान नरेंद्र मोदी

13:14 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: हा सकारात्मक अर्थसंकल्प – स्पाईसजेटचे सीईओ अजय सिंह

मला वाटतं हा खूपच सकारात्मक अर्थसंकल्प आहे. केंद्र सरकार २०४७पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मला वाटतं आज जी काही पावलं उचलली जात आहेत, ती सगळी एक मोठं लक्ष्य गाठण्यासाठी आहेत – अजय सिंह, स्पाईसजेटचे सीईओ

13:09 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: आज मांडलं त्यात बजेट आहेच कुठे? – दानिश अली

यात अर्थसंकल्प आहे कुठे? कोणतीही नवीन गोष्ट त्यांनी सांगितलेली नाही. जी कॅसेट चार वर्षांपासून वाजवत होते, तीच आज पुन्हा एकदा वाजवली. या अर्थसंकल्पात काहीच नाहीये – दानिश अली, खासदार

13:05 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: “२०१४ च्या पूर्वीच्या गैरकारभारावर श्वेतपत्रिका काढणार”

“२०१४ पूर्वी अर्थव्यवस्था ज्या संकटांचा सामना करत होती, त्यावर मात करून सर्वांगीण प्रगती करत शाश्वत विकासाच्या मार्गावर अर्थव्यवस्थेला आणण्याचे काम आमच्या सरकारने केले. २०१४ पूर्वी आपण कुठे होतो आणि आत्ता आपण कुठे आहोत याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. त्या वर्षांमध्ये किती गैरकारभार झाला, हे पाहून यातून धडा घेण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकार सभागृहात श्वेतपत्रिका सादर करणार”, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.

सविस्तर बातमी वाचा

13:03 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: यही समय है, सही समय है – ज्योतिरादित्य सिंदिया

हा एक ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. भारत आता एक पाऊल पुढे चालला आहे. यही समय है, सही समय है- ज्योतिरादित्य सिंदिया

12:54 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा ‘शेवटचा’ अर्थसंकल्प मांडला. त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी यापुढे देशात चार जातींसाठी काम करणार असं सांगितलं. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी. त्यांनी हे मोठं धाडस केलंय. पंतप्रधानांसमोर बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलंय. कारण निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की सुटाबुटातल्या मित्रांच्या पलीकडेही हा देश आहे. १० वर्षं झाली, दहाव्या वर्षी तुम्हाला या चार जाती कळल्या. तुमच्याबरोबरचे अडाणी म्हणजे देश नाही हे तुम्हाला आता कळलं. मग सीतारमणजी, महिलांकडे तुम्हा लक्ष देत आहात, तर मणिपूरमध्ये का जात नाहीत हो? – उद्धव ठाकरे

12:49 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: आनंद महिंद्रांची अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया

उद्योगपती आनंद महिंद्रांची अंतरिम अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “…म्हणून मला आजचा अर्थसंकल्प आवडला!”

12:46 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: FICCI कडून अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया…

मला या अर्थसंकल्पात सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे कोणत्या घटकांच्या उत्थानासाठी काम करायचंय, याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. ते घटक म्हणजे गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी. हरित व सर्वसमावेशक विकासावर भर असल्याचं अर्थसंकल्पातून स्पष्ट होत आहे – सुभ्रकांत पांडा, फिक्की

12:44 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: अर्थमंत्र्यांनी केला ‘भाई-भतीजावाद’चा उल्लेख!

पूर्वी सामाजिक न्याय ही राजकीय संकल्पना होती. पण आमच्या सरकारसाठी सामाजिक न्याय ही एक परिणामकारक आणि आवश्यक प्रशासकीय व्यवस्था आहे. इथे धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात अंमलात येते, भ्रष्टाचार कमी होतो आणि घराणेशाहीला आवर घातला जातो. सर्व पात्र लोकांना योजनांचा लाभ मिळतो याविषयी इथे पारदर्शी व्यवस्था आहे – निर्मला सीतारमण

12:37 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: अर्थसंकल्पात ४७.६६ लाख कोटींच्या खर्चाचा अंदाज!

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वर्तवला ४७.६६ लाख कोटींच्या खर्चाचा अंदाज, जवळपास १८ लाख कोटींची तूट!

12:33 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: निर्मला सीतारमण यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली

12:29 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: हे इतिहासातलं सर्वात कमी वेळेचं भाषण – शशी थरूर

हे आजपर्यंत दिलेलं सर्वात कमी वेळेचं अर्थसंकल्पीय भाषण होतं (५७ मिनिटे). यातून फार काही मिळालेलं नाही. नेहमीप्रमाणे खूप सारी विशेषणं, अलंकारिक भाषा आणि अंमलबजावणीच्या पातळीवर अत्यंत कमी उल्लेख. निर्मला सीतारमण यांनी विदेशी गुंतवणुकीचा उल्लेख केला, पण त्यात कमालीची घट झाल्याचं मात्र त्यांनी सांगितलेलं नाही. आकडेवारीबाबत बोलायचं झाल्यास त्यांनी खूपच कमी आकडे सादर केले. – काँग्रेस खासदार शशी थरूर</p>

12:25 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: असं आहे अंतरिम अर्थसंकल्पातील विभागवार निधीवाटप..

असं आहे अंतरिम अर्थसंकल्पातील विभागवार निधीवाटप..

12:23 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: अर्थसंकल्पावर काँग्रेसनं व्यक्त केली चिंता

“या अंतरिमक अर्थसंकल्पाचा एकच हेतू आहे तो म्हणजे या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सरकारच्या खर्चांना मंजुरी घेणे. पण त्यातली चिंता वाढवणारी बाब म्हणजे या अर्थसंकल्पात तब्बल १८ लाख कोटींची तूट दाखवण्यात आली आहे. याचा अर्थ केंद्र सरकार त्यांच्या खर्चासाठी उधार पैसे घेत आहे. पुढच्या वर्षी या खर्चात आणखी भरच पडणार आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनी दिली आहे.

12:14 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: अर्थमंत्र्यांनी केला लक्षद्वीपच्या पर्यटनाचा उल्लेख!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात केला लक्षद्वीपमधील पर्यटन व्यवसायाचा उल्लेख! अर्थमंत्री म्हणाल्या, “देशांतर्गत पर्यटन , बंदरांना एकमेकांशी जोडण्यासाठीचे प्रकल्प, पर्यटनासंदर्भातील पायाभूत सुविधा, इतर सुविधा या सर्व गोष्टींचा लक्षद्वीपसह इतर भारतीय बेटांवर विकास करण्यासाठी प्रकल्प हाती घेतले जातील”!

12:11 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: पायाभूत सुविधांसाठी भरघोस तरतूद

आर्थिक वर्ष २०२५ मध्ये पायाभूत सोयीसुविधांसाठी ११.११ लाख कोटींच्या तरतुदीचं नियोजन – – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

12:04 (IST) 1 Feb 2024
Budget 2024 live updates: प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कररचनेत कोणताही बदल नाही

कररचनेत कोणताही बदल नाही – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

Interim Budget 2024 Streaming : अर्थसंकल्प समजून घेताना…

Budget 2024 Updates, Finance Minister Nirmala Sitharaman Speech: अर्थसंकल्पविषयक सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर!