Budget 2024 : २२ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनातच अर्थसंकल्पाचा उर्वरित भाग सादर केला जाणार आहे. याआधी फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणुकीपूर्व अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. या अर्थसंकल्पात कर रचनेत कोणताही बदल सूचवला नव्हता. मात्र आज पूर्ण अर्थसंकल्प २०२४ मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाच्या कररचनेत काही सकारात्मक बदल होऊन सूट मिळेल का? असा प्रश्न विचारला जातो आहे. तसेच केंद्र सरकारने पर्यावरणपूरक वस्तूंना प्राधान्यक्रम दिल्यामुळे विजेवर चालणारी वाहने (इलेक्ट्रिकल वाहने EV) स्वस्त होणार का? याचीही उत्सुकता लागली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

हे वाचा >> विश्लेषण: अर्थसंकल्पात सामान्य करदात्यांसाठी नेमकं काय? करपात्र उत्पन्नाची मर्यादा बदलली, पण त्याचा फायदा कुणाला होणार?

Aditi Tatkare OnLadki Bahin Yojana January Installment Date in Marathi
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
Union Budget 2025 Date Expectations in Marath
Union Budget 2025 : १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प, टॅक्स रिजीममध्ये बदल होणार? निवृत्ती वेतन वाढणार? काय आहेत अपेक्षा?
Central government decision farming Relief
दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या, केंद्र सरकारने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणता निर्णय घेतला?
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
Economy Growth rate likely to fall to 6 4 percent
अर्थव्यवस्थेची वाढ मंदावणार! विकासदर ६.४ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता

वैयक्तिक करदात्यांना नव्या कर रचनेत अधिक चांगले फायदे मिळवून देण्यासाठी सरकार करमर्यादा ५० हजाराहून वाढवून एक लाखापर्यंत करू शकते. यामध्ये आरोग्य विम्याचा हप्ताही (कलम ८० डी नुसार) सामील केला जाऊ शकतो. ज्यामुळे आरोग्य विमा घेण्यासाठी आणखी करदाते पुढे येतील.

हेही वाचा >> Union Budget 2024 Live Updates : केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार?

एवढेच नाही तर कलम ८० सीसीडी (२) च्या अंतर्गत राष्ट्रीय पेन्शन योजनेत मूळ वेतनात १० टक्क्यांऐवजी १४ टक्क्यांचे योगदान नोकरी देणाऱ्यांना देण्यासाठी नियम केला जाऊ शकतो. नोकरदारांसाठी हे स्वागतार्ह पाऊल असेल. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रणालीमध्ये समानता येऊ शकते. तसेच नव्या कर प्रणालीत कराची बचत करण्यात करदात्यांना एक पर्याय उपलब्ध होईल.

राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत होऊ शकतो मोठा निर्णय

हे ही वाचा >> Budget 2024 Expectations : मोबाइल स्वस्त होणार का? अर्थसंकल्पाआधी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दरासंबंधी माहिती घ्या

HRA मध्ये वाढ केल्याने मेट्रो शहरातील लोकांना फायदा

दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा कोलकाता येथे भाड्याने घेतलेले निवासस्थान असले तर एचआरएसाठी मूळ वेतनाच्या ५० टक्क्यांपर्यंतची सूट दिली जाते. तसेच इतर शहरांमध्ये ही सूट ४० टक्क्यांपर्यंत आहे. बंगळुरू हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर असूनही बंगळुरूला मेट्रो शहर म्हणून अद्याप मान्यता मिळालेली नाही. आता एआरए सवलतीसाठी मेट्रो शहरांच्या यादीत बंगळुरू, एनसीआर, पुणे आणि हैदराबाद शहरांचा समावेश झाल्यास, यातून कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येला लाभ मिळेल.

यावेळच्या अर्थसंकल्पातील आणखी एक बाब म्हणजे इलेक्ट्रिकल वाहनांचे दर कमी होणार का? सरकारने दिलेले प्रोत्साहन आणि सुविधांच्या उपलब्धतेत वाढ झाल्यामुळे आता विजेवर चालणाऱ्या वाहनांची लोकप्रियता वाढली आहे. इलेक्ट्रिकल वाहन विकत घेताना रोड टॅक्स, रजिस्ट्रेशन शूल्क यामध्ये सूट दिली जाते.

Story img Loader