Finance Minister Nirmala Sitharaman on Health Care : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प २०२५ सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. याचबरोबर या वर्षीच्या अर्थसंकल्पात १० क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. यामध्ये रोजगार, सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग, शेती, उत्पादन, ग्रामीण भागाचा विकास आणि संशोधन या क्षेत्रावर भर देण्यात आला आहे. याचबरोबर कर्करोग आजाराच्या रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा देत कॅन्सरच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची घोषणा केली आहे. ३६ औषधांवरील करात सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता ३६ औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे ही औषधे स्वस्त होणार आहेत. तसेच सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी केली. याबरोबरच सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये पुढच्या तीन वर्षांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहेत.

औषधे होणार स्वस्त

आता ३६ जीवरक्षक औषधे स्वस्त होणार आहेत. ३६ औषधांवरील कस्टम ड्यूटी हटवण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. तसेच ६ जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी ५ टक्क्यापर्यंत कमी करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात जागा वाढवण्यात येणार?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच आता वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १० हजार अतिरिक्त जागा वाढवण्यात येणार आहेत. तसेच ५ वर्षांत ७५ हजार जागा वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी घोषणाही करण्यात आली आहे. याबरोबरच . देशभरातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. त्यामध्ये २०२५-२६ या वर्षामध्ये जवळपास २०० डे केअर कॅन्सर सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.