CM Devendra Fadnavis On Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रासांठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्याबरोबर शिक्षण, शेती, रोजगार, उत्पादन, लघू उद्योगासह विविध क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यादरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांनी मात्र या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. काँग्रेसचे नेत्यांनी अर्थसंकल्पात महाराष्ट्राची निराशा करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी का देण्याच आलं? याची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याल अर्थसंकल्पात काय आलं याची माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र!

(टिप :ही केवळ प्राथमिक माहिती. विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल.)

  • मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी
  • पुणे मेट्रो : 699.13 कोटी
  • एमयुटीपी : 511.48 कोटी
  • एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
  • मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी
  • सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी
  • महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी
  • महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी
  • नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी
  • मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी
  • ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी

पृथ्वीराज चव्हाणांची टीका

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. “लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. यामध्ये केंद्र सरकारने एक गोष्ट मान्य केली आहे की भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर हा मंदावत आहे. विकासदर मंदावत असल्यामुळे त्याचे अनेक परिणाम होत आहेत. रोजगार निर्माण होत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. कृषी अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. या अर्थसंकल्पात महागाईवर काहीही उपाययोजना केलेली नाही. आम्हाला अपेक्षा होती की अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे अश्रू पुसण्याचं काम हे सरकार करेल. मात्र, असं काहीही झालं नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पामुळे आमची घोर निराशा झालेली आहे”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

“बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर ही मलमपट्टी करण्यात आली आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी एक आदर्श बदल करणं आवश्यक होतं. पण हे सरकार विचारांनी दिवाळखोर आहे”, अशी टीका सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्‍टमध्ये केली आहे.