Congress On Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. कररचनेतील बदलापासून महिला, शेतकरी आणि युवकांसाठी अनेक योजना आणल्याचं या अर्थसंकल्पातून स्पष्ट झालं आहे. दरम्यान, हा अर्थसंकल्प म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा असल्याची टीका काँग्रेसचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे.

ते एक्स पोस्टवर म्हणाले, “मला हे जाणून आनंद झाला की माननीय अर्थमंत्रीने निवडणूक निकालानंतर काँग्रेसचा जाहीरनामा वाचला आहे. मला आनंद आहे की त्यांनी रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन अक्षरशः स्वीकारले आहे. (ELI) काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पृष्ठ 30 वर त्याचे वर्णन केले आहे.” (Congress On Budget 2024)

Aditi Tatkare OnLadki Bahin Yojana January Installment Date in Marathi
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Image Of Ramesh Bidhuri.
आधी मंत्रिपद हुकले आता उमेदवारी रद्द होण्याची शक्यता; प्रियांका गांधी, अतिशींविरोधातील वादग्रस्त विधाने रमेश बिधुरींना भोवणार?

हेही वाचा >> Budget 2024 : ‘मध्यमवर्गाचे सशक्तीकरण करणारा अर्थसंकल्प’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया

“काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पृष्ठ ११ वर नमूद केलेल्या प्रत्येक शिकाऊ उमेदवाराला भत्त्यासह शिकाऊ योजना सुरू केल्याचा मला आनंद आहे. अर्थमंत्र्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील इतर काही कल्पनाही कॉपी केल्या असत्या, तर मला अजून आवडलं असतं. मी लवकरच गमावलेल्या संधींची यादी करेनॉ”,असंही चिदंबरम म्हणाले.

बेरोजगारीच्या संकटाची जाणीव

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही मोदी सरकारवर टीकास्र सोडले. ते म्हणाले, “दहा वर्षांच्या नकारानंतर – जिथे नॉन-बायोलॉजिकल पीएम किंवा त्यांच्या पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नोकऱ्यांचाही उल्लेख नव्हता. बेरोजगारी हे एक राष्ट्रीय संकट आहे ज्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे स्पष्टपणे कबूल केले असल्याचं यातून स्पष्ट होतंय.”

दरम्यान, अर्थमंत्र्यांचं अर्थसंकल्पाचं सादरीकरण संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. सरकारचा निषेध करत अर्थसंकल्पावर टीका केली.

Story img Loader