भारतीय रेल्वेतील सुधारणांच्या झुकझुक गाडीलाही रुळावर आणू न शकणारा, सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षा, सोयीसुविधा आणि स्वच्छतेचे केवळ स्वप्नच दाखविणारा आणि छुपी प्रवासी भाडेवाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला अप्रत्यक्षपणे हात घालणारा सन २०१३-१४ चा रेल्वे अर्थसंकल्प मंगळवारी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी लोकसभेत मांडला. प्रवाशांवर भाडेवाढीचे ओझे लादणार नसल्याचे सांगताना बन्सल यांनी मोठय़ा चलाखीने अप्रत्यक्षपणे प्रवासी भाडेवाढ केली. त्याचबरोबर मालवाहतुकीच्या दरात सरासरी ५.८ टक्के वाढ करून त्यांनी महागाईची गाडीही जलद मार्गावरून पुढे काढली.
महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात १२ नव्या गाडय़ा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मुंबई-ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचा ‘उपक्रम’ या अर्थसंकल्पातही राबविण्यात आला आहे. लोकलला एसी डबा, ७५ नवीन फेऱ्या, एलिव्हेटेड रेल्वे, कल्याण-कर्जत तिसरा रेल्वेमार्ग अशा घोषणा बन्सल यांनी केल्या. मात्र आधीच्या कटू अनुभवामुळे या भूलथापाच ठरतील, अशी शंका मुंबईकरांना भेडसावत आहे. एकंदरच कोणत्याही कल्पक, नावीन्यपूर्ण घोषणा वा संकल्पांचा अभाव असलेल्या या सरधोपट अर्थसंकल्पाने सर्वाचीच निराशा केल्याचे दिसत आहे.
‘फेल’गाडी!
भारतीय रेल्वेतील सुधारणांच्या झुकझुक गाडीलाही रुळावर आणू न शकणारा, सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षा, सोयीसुविधा आणि स्वच्छतेचे केवळ स्वप्नच दाखविणारा आणि छुपी प्रवासी भाडेवाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला अप्रत्यक्षपणे हात घालणारा सन २०१३-१४ चा रेल्वे अर्थसंकल्प मंगळवारी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी लोकसभेत मांडला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-02-2013 at 06:03 IST
TOPICSपवन बन्सल
मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disappointing railway budget presented in parliament by pawan bansal