Union Budget 2024 for Nitish-Naidu : केंद्र सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकरी, महिला, नोकरदार वर्ग यांच्यासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र त्यांना २७२ चा टप्पा ओलांडता आलेला नाही. एनडीएच्या साथीने तिसऱ्यांदा मोदी सरकार केंद्रात आलं आहे. याचीच झलक अर्थसंकल्पातही पाहण्यास मिळाली. कारण बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना अर्थसंकल्पात मोदी सरकानरे ‘रिटर्न गिफ्ट’ दिल्याची चर्चा आता रंगली आहे.

Nirmala Sitharaman Fashion
2019 मध्ये निर्मला सीतारामन यांनी त्यांचे पहिले अर्थसंकल्पीय भाषण सादर केले. या दिवसासाठी तिने गुलाबी रंगाची सिल्क साडी निवडली होती. हा रंग स्थिरता आणि गंभीरतेचे प्रतीक मानला जातो. (फोटो: एक्सप्रेस संग्रह)
(हे देखील वाचा: निर्मला सीतारामन सलग 7 व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्यांना मागे टाकून त्यांनी एक विक्रम केला आहे )

बिहारसाठी खास योजना

निर्मला सीतारमण यांनी देशाच्या अर्थमंत्री म्हणून मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला पहिला अर्थसंकल्प Budget सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये औद्योगिक विकास करण्यावर आमचा भर असणार आहे. त्यामुळे पूर्वेकडील राज्यात विकासाला गती मिळेल. बिहारमध्ये रस्ते बांधणीवर भर देण्यात येणार आहे. पाटणा-पूर्णिया एक्सप्रेसवे, बक्सर-भागलपूर राजमार्ग, बुद्धगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर पूल बांधण्यासाठी २६ हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे, अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी Budget मध्ये केली.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

हे पण वाचा- Health Care Budget 2024 : कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा, जाणून घ्या यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी काय होते खास?

१० वर्षांत पहिल्यांदाच आंध्र प्रदेशवर विशेष लक्ष

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने Budget मध्ये १५ हजार कोटींची तरतूद केली आहे. अमरावतीला आधुनिक आणि विकसित शहर बनवण्यासाठी केंद्र सरकारने या प्रकल्पाला प्राधान्य दिलं आहे. १० वर्षात पहिल्यांदाच आंध्र प्रदेश या राज्याला अर्थसंकल्पात महत्त्वाचं स्थान मिळालं आहे.

आंध्र प्रदेशबाबत नेमकी घोषणा काय?

“आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आमच्या सरकारनं मोठे प्रयत्न केले आहेत. या राज्याची भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही विशेष आर्थिक मदतीची तरतूद करत आहोत. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून दिला जाईल. चालू आर्थिक वर्षात १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून अतिरिक्त निधी पुढील काही वर्षांत दिला जाईल” असं आज निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं. नितीश कुमार यांचा जदयू आणि चंद्राबाबू नायडूंचा तेलगू देसम हे दोन पक्ष एनडीएतले महत्त्वाचे घटक पक्ष आहेत. त्यांच्याशी जी जवळीक झाली ती पंतप्रधान मोदींच्या शपथविधीच्या वेळीच दिसली होती. आता पहिल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून दोन मित्रांना ‘रिटर्न गिफ्ट’ मिळालं आहे आहे अशी चर्चा सुरु झाली आहे.