Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प (Budget) सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पात अनेक तरतुदीही करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांनी २.५ लाख रुपयांपर्यंत भरलेल्या प्रॉव्हिडंट फंडावरील व्याज करमुक्त आहे. मात्र त्यापेक्षा जास्त रक्कमेवरील व्याजावर कर लावला आहे.

निर्मला सीतारमण यांनी काय म्हटलं आहे? (What is in the budget )

प्रॉव्हिडंट फंडावर कर लावण्यात आला आहे. अर्थसंकल्पात त्याविषयीची तरतूद करण्यात आल्याचं निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता मोदी सरकारवर टीका करण्यात येते आहे.

Reddit युजरची पोस्ट चर्चेत

यानंतर Reddit च्या एका युजरने एक इमेज पोस्ट केली आहे. ज्यामध्ये कोण कोणत्या गोष्टींवर टॅक्स लावला आहे तेच दाखवण्यात आलं आहे. यात डिव्हिडंट, एफडी, शेअर्स या सगळ्याचे फोटो आहेत. त्याचप्रमाणे प्रॉव्हिडंट फंडाचाही फोटो दाखवला आहे. तसंच अजून काही राहिलं आहे का? ज्यावर कर लावायचा राहिला आहे? असा प्रश्न या युजरने विचारला आहे. ज्यानंतर त्याला एकाहून एक भन्नाट उत्तरं नेटकऱ्यांनी दिली आहे.

हे पण वाचा- Union Budget 2024 : बजेटमध्ये सगळ्यात जास्त निधी कोणत्या खात्याला मिळाला? तब्बल ६.२१ लाख कोटींची तरतूद

रेडइट युजरच्या पोस्टवर नेटकऱ्यांची भन्नाट उत्तरं

या युजरने लिहिलेल्या पोस्टवर आणि विचारलेल्या प्रश्नावर दुसरा युजर म्हणाला अरे आपण श्वास घेतो त्यावर टॅक्स राहिला आहे, तर दुसरा म्हणतो आपण सलून माध्ये जातो तिथेही बहुदा दाढीच्या आणि डोक्याच्या वाढलेल्या केसांवर टॅक्स लावला जाईल. तर आणखी एक युजर म्हणाला काही दिवसांनी तुम्ही किती टॅक्स भरता त्यावरही एक वेगळा टॅक्स लावला जाईल.

आज कररचनेतले बदल जाहीर करण्यात आले. ज्यानुसार अशी कररचना असणार आहे.

पडलेल्या पुलांवरही टॅक्स लावा

नेटकरी या पोस्टवर भन्नाट उत्तरं देत व्यक्त होत आहेत. एक युजर म्हणाला पडलेल्या पुलांवरही टॅक्स लावला पाहिजे. तर आणखी एक युजर म्हणतो, लग्नावर कर, मृत्यूवर कर, जन्मावर कर, नोकरी बदलल्यावर कर, घटस्फोट घेतल्यावर कर हे सगळे कर Budget मध्ये येणं बाकी आहेत. जर कुणाचा घटस्फोट झाला तर नवरा आणि बायको दोघांच्या खात्यातूनही सरकारला Budget मध्ये कर वसूल करता येईल असंही उत्तर एकाने दिलं आहे. कुठल्या जिल्ह्यात राहता?, कुठल्या राज्यात राहता? कोणत्या विभागात राहता? या सगळ्यावर टॅक्स लावता येऊ शकतो. तर दुसरा एक युजर म्हणतो रेड इटच्या नोटिफिकेशनवरही टॅक्स लागला तर मला आश्चर्य वाटणार नाही.