Gold Rate Today : भारतीय महिला आणि सामान्य लोकांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सोनं. सोन्याचे दर वाढतात की कमी होतात? याकडे नेहमीच भारतीय सामान्य माणूस लक्ष ठेवून असतो. आज केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोन्याचे दर घसरले. एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला अर्थसंकल्प आज सादर झाला. यावेळी सोन्यावरील सीमाशुल्क (कस्टम ड्युटी) कमी करण्यात आले. सीमाशुल्क कमी करताच सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळे दर असले तरी १० ग्रॅममागे चार हजार रुपयांनी सोने स्वस्त झाल्याचे कळते आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूवरील सीमाशुल्क घटविण्याचा निर्णय घेतला. “देशातील सोने आणि मौल्यवान धातूंच्या दागिन्यांमध्ये देशांतर्गत मूल्यवर्धन वाढवण्यासाठी मी सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्के आणि प्लॅटिनमवरील ६.४ टक्के करण्याचा प्रस्ताव देते”, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.

Gold Silver News
Gold Silver Price Today : मकर संक्रांतीच्या दिवशी सोने खरेदी करताय? जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा सोने चांदीचा भाव
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
gold silver rate today, Gold Silver Price 11 january 2025
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरातील वाढ सुरूच, आज २२, २४ कॅरेट सोन्याचा दर काय? जाणून घ्या
Gold imports down by 5 billion print eco news
सोन्याची आयात ५ अब्ज डॉलरने कमी; सरकारची नोव्हेंबर महिन्याची सुधारित आकडेवारी समोर
Hallmark certification of silver purity made mandatory soon
चांदीच्या दागिन्यांची अस्सलता तपासणे होईल सोपे; सोन्याप्रमाणेच शुद्धतेच्या हॉलमार्क प्रमाणनाची सक्ती लवकरच 
January 6 price of gold and silver has decreased
नववर्षात प्रथमच सोने-चांदीच्या दरात घट… हे आहेत आजचे दर…

मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्स आज सकाळी सोन्याचा दर प्रति तोळा ७२,८३८ रुपये होता. अर्थसंकल्पात सीमाशुल्क ६ टक्क्यांवर आल्याचे कळताच बाजारात सोन्याची विक्री वाढली. एमसीएक्सवर सोन्याच्या विक्रीचा प्रति तोळा दर आता ६८,५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

हे वाचा >> बजेटमध्ये महाराष्ट्राच्या ताटात काय? फडणवीसांनी वाचली यादी

महाराष्ट्रात जळगाव ही सुवर्ण नगरी मानली जाते. बाहेरच्या राज्यातूनही लोक याठिकाणी सोने विकत घेण्यासाठी येत असतात. जळगावमध्ये अर्थसंकल्प जाहीर होताच. सोन्याच्या दरात प्रतितोळा ३ हजार रुपयांची घट झाली. यामुळे आता ग्राहकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. जळगावमधील सराफा व्यावसायिकांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, सकाळी सोन्याचा दर ७३ हजार रुपये होता. मात्र अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन तासांत सोन्याचा दर ७१ हजारावर आला. जळगाव मधील सराफा बाजारात दोन ते तीन हजार रुपयांची तात्काळ घसरण पाहायला मिळाली असली तरी कालांतराने देशभरात घसरण ४ हजारापर्यंत असल्याचे कळले.

Story img Loader