या आठवड्यात संसदेत सादर होणाऱया केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वांचेच लक्ष लागलंय. आधीच महागाई, दरवाढ, भाडेवाढ याचा चटका सहन करीत असलेला सामान्य माणूस अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे दिलासा मिळतो का, याचीच वाट बघतोय. करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढेल का, नवीन कोणत्या कराचा बोजा वाढणार नाही ना, कोणत्या नव्या योजनांचा आपल्याला फायदा होईल या आणि यासारख्या इतर प्रश्नांची उत्तरे येत्या गुरुवारी मिळतीलच. पण त्याआधी सध्याचे ग्रह-तारे काय सांगताहेत. कोणत्या ग्रहाच्या कोणाबरोबर होणाऱया योगामुळे, युतीमुळे अर्थसंकल्पात सामान्यांना दिलासा मिळेल. व्यापाऱयांसाठी, नोकरदारांसाठी, छोट्या व्यावसायिकांसाठी, कॉर्पोरेट जगासाठी, गुंतवणूकदारांसाठी येणारा अर्थसंकल्प आणि आगामी आर्थिक वर्ष कसे असेल, याचा भविष्यकारांनी घेतलेला वेध. या भविष्यकारांनी आपापल्या पद्धतीने ग्रह-ताऱयांच्या योगांचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला आहे. खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही तो वाचू शकता.

Story img Loader