केंद्रातील मोदी सरकार १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प २०२४ जाहीर करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा हा सहावा अर्थसंकल्प असेल. मात्र, हे निवडणुकीचे वर्ष असल्याने त्यात राजकीय छाप पाहायला मिळणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यावेळी अंतरिम अर्थसंकल्प हा व्होट ऑन अकाऊंटच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.

Budget 2024 date and time : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे भाषण कधी पाहावे?

२०२४ चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार आहे. यापूर्वी फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी याची घोषणा केली जात होती, परंतु नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यात बदल केला.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? संजय शिरसाट यांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

हेही वाचाः Budget 2024 Live: आज निवडणुकांआधीचा शेवटचा अर्थसंकल्प; सामान्य मतदारांसाठी कोणती घोषणा होणार?

Budget 2024 : भाषण कुठे पाहता येणार?

१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण डीडी न्यूजवर पाहता येईल. लोकसत्ताच्या वेबसाइटवर देखील दाखवले जाणार आहे.

हेही वाचाः Budget 2024 : अर्थसंकल्पात वित्तीय संस्थांकडून ७० हजार कोटी मिळविण्याचे लक्ष्य

अंतरिम अर्थसंकल्प २०२४ मधून काय अपेक्षा?

आगामी अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा होणार नाही हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यापूर्वी सांगितले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कल्याणकारी योजनांशी संबंधित अर्थसंकल्पात काही घोषणा असू शकतात. यामध्ये पीएम किसान अंतर्गत वितरणात ६ हजार रुपयांवरून ९ हजार रुपयांपर्यंत वाढ, MGNREGS योजनेसाठी वाढीव निधीचे वाटप आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वाढलेली व्याप्ती यांचा समावेश असू शकतो. भांडवली खर्चाला (capex) देखील धक्का लागू शकतो. ” केंद्रीय अर्थसंकल्पात कर सवलतीच्या अपेक्षा असून, कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला समर्थन देण्यासाठी घोषणांचा समावेश असू शकतो. देश सध्या हवामान बदलाचा प्रभाव आणि महागाईचा दबाव यांसारख्या तात्काळ आव्हानांना तोंड देत आहे,” असेही मास्टर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक गुरमीत सिंह चावला म्हणालेत.

Story img Loader