मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी १५,५५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्पांना वेग मिळण्याची शक्यता आहे. २००९ ते २०१४ या काळात रेल्वे प्रकल्पांसाठी १ हजार १७१ कोटी रुपये मिळाले होते. त्यात २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात १३ पटीने वाढ झाल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

वैष्णव म्हणाले, तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर मंजूर केले आहेत. त्यात ४० हजार किमीचे नवीन रेल्वे मार्ग तयार होतील. तसेच जेथे दुहेरी रेल्वे मार्गिका आहे, तेथे चौपदीकरण होईल. चौपदरी रेल्वे मार्गिका असलेल्या ठिकाणी सहापदरीकरण होईल. सध्या ७०० कोटी प्रवासी प्रवास करत असून प्रकल्प पूर्ण झाल्यास १ हजार कोटी प्रवासी प्रवास करतील. येत्या ६ ते ७ वर्षांत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी १,१७१ कोटी मिळाले होते. यावर्षी राज्याला १५,५५४ कोटी रुपये मिळाले आहेत.

Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bmc fixed deposits reduce by 10 thousand crore in current financial year
मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर
Union Budget 2025 Date Expectations in Marath
Union Budget 2025 : १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प, टॅक्स रिजीममध्ये बदल होणार? निवृत्ती वेतन वाढणार? काय आहेत अपेक्षा?
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
capacity of 200 e-bus charging stations in the ST fleet will also increase in one year
एसटीच्या ताफ्यात वर्षभरात २०० ई-बस चार्जिंग स्टेशनची क्षमताही वाढणार
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती

हेही वाचा >>> Budget 2024 : सौरऊर्जेसाठी १० हजार कोटी

मध्य रेल्वेला तुटपुंजी मदत

मध्य रेल्वेला यंदा १०,६११.८२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मागील अर्थसंकल्पात १०,६०० कोटी देण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात तुटपुंजी वाढ मिळाली आहे. सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १०, ११, १२ आणि १३ वर २४ डब्यांची रेल्वेगाडी उभी करण्यासाठी फलाटांची लांबी वाढविण्याकरिता १० कोटी रुपये, पनवेल – कळबोली कोचिंग टर्मिनस फेज – १ टप्पा १ साठी १० कोटी, मार्गिकांचे नूतनीकरण करण्यासाठी १,३२० कोटी रुपये, पूल आणि बोगद्यांच्या कामासाठी १९२ कोटी रुपये, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशसाठी १८३ कोटी रुपये, रेल्वे मार्गिका विद्युतीकरणासाठी ३३८ कोटी रुपये, प्रवाशांच्या सुखसोयींसाठी १,०२२ कोटी रुपये दिले आहेत.

मुंबई महानगरातील रेल्वे प्रकल्पांसाठी ७८९ कोटी

मुंबई : ‘एमआरव्हीसी’मधील मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयुटीपी) अपेक्षित वेळेत पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात ७८९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यातील रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुंबई महानगरातील रेल्वे विभागाशी संबंधित प्रकल्पांसाठी अंतरिम अर्थसंकल्पात ७८९ कोटींची तरतूद केली. यात एमयुटीपी-२ प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये, एमयुटीपी-३ प्रकल्पासाठी ३०० कोटी आणि एमयुटीपी-३ अ प्रकल्पासाठी ३८९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्य सरकार एमयुटीपीच्या प्रकल्पांत समान आर्थिक योगदान देणार असल्याने एकूण आर्थिक तरतूद १,५९८ कोटींपर्यंत पोहोचली आहे, असे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. तथापि, एमयुटीपीच्या प्रकल्पांसाठी एमआरव्हीसीने १,४५० कोटींची मागणी केली होती. मात्र, नियमित अर्थसंकल्पात अतिरिक्त निधी मिळेल, असा आशावाद एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला.

नवीन रेल्वे मार्गिका

* कल्याण- मुरबाड उल्हासनगरमार्गे (२८ किमी) – १० कोटी रुपये

* अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ (२५० किमी)- २७५ कोटी रुपये

* वर्धा-नांदेड यवतमाळ-पुसदमार्गे (२७०किमी) – ७५० कोटी रुपये

* बारामती – लोणावळा (५४ किमी) – ३३० कोटी रुपये

* सोलापूर-उस्मानाबाद तुळजापूरमार्गे (८४.४४ किमी) – २२५ कोटी रुपये

* धुळे – नंदुरबार (५० किमी) – १०० कोटी रुपये

मार्गिकांचे दुहेरीकरण

* कल्याण-कसारा तिसरी रेल्वे मार्गिका (६८ किमी) – ८५ कोटी

* वर्धा-बल्लारशहा तिसरी रेल्वे मार्गिका (१३२ किमी) – २०० कोटी

* जळगाव-भुसावळ चौथी रेल्वे मार्गिका (२४ किमी) – ४० कोटी

* वर्धा-नागपूर तिसरी  मार्गिका (७६ किमी) – १२५ कोटी

* पुणे-मिरज-लोढा दुहेरीकरण (४६७ किमी) – २०० कोटी

* दौंड-मनमाड दुहेरीकरण (२४७ किमी) – ३०० कोटी

* मनमाड-जळगाव तिसरी रेल्वे मार्गिका  – १२० कोटी

हेही वाचा >>> Budget 2024 : करूया उद्याची बात! अंतरिम अर्थसंकल्पात भविष्याचे दिशादर्शन, मोठया घोषणा, कर सवलतींना बगल

मुंबई ते दिल्ली प्रवास १२ तासांत

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि राजधानी दिल्ली या दोन शहरांदरम्यानचा प्रवास कमी वेळेत व्हावा, यासाठी भारतीय रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी रेल्वेतर्फे ‘मिशन गतिमान’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी आता १५ तास लागत आहेत. मुंबई ते दिल्लीदरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसचा वेग मार्च २०२४ पासून ११० किमी वरून १६० ते २०० किमीपर्यंत वाढवण्याची योजना आहे. यामुळे मुंबई ते दिल्ली रेल्वे प्रवास १२ तासांत होईल. त्यामुळे तीन तासांची बचत होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

१६०-२०० किमी वेग

एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यासाठी ‘मिशन गतिमान’ प्रकल्प

सिग्नल यंत्रणा, रूळांची कामे

मिशन गतिमान प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २,६६२ कोटी रुपये देण्यात आले आहेत. मुंबई ते दिल्ली दरम्यानचे अंतर एकूण १,३७९ किमी असून हे अंतर १२ तासांत गाठता यावे, यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी रेल्वे मार्गातील सिग्नल यंत्रणा आणि इतर आधुनिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. रेल्वे रूळांची कामे, ओव्हरहेड वायर, पादचारी पुलांची कामे हाती घेतली आहेत.

पश्चिम रेल्वेसाठी १४,३३५ कोटी

पश्चिम रेल्वेसाठी १४,३३५ कोटींची तरतूद केली आहे. यामध्ये नवीन रेल्वे रूळ बांधणी, दुहेरीकरणांच्या कामांसाठी ५,०१५ कोटी, सिग्निलगच्या कामासाठी २,६६२ कोटी, पूल, बोगदा व इतर कामांसाठी ४२५ कोटी, प्रवाशांच्या सुखसोयींसाठी १,१३५ कोटी, उपमार्गिका, देखभाल-दुरुस्ती मार्गिका, यार्डमधील अतिरिक्त लूप मार्गिका व इतर कामांसाठी २,८८९ कोटींची तरतूद केली आहे.

पायाभूत सुविधांवर भर

बोरिवली येथील पादचारी पुलाच्या रुंदीकरणासाठी १३ लाख रुपयांची तरतूद केली आहे.पश्चिम रेल्वेवरील विविध सहा स्थानकांवर १८ सरकते जिने बसवण्यासाठी १३ लाखांची तरतूद  केली आहे. भाईंदर येथे पादचारी पुलाच्या कामासाठी ९ लाखांची तरतूद आहे. मरिन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, लोअर परळ आणि वांद्रे येथील पादचारी पुलाच्या पुनर्बाधणीसाठी २४ लाखांची तरतूद आहे. अंधेरी, वांद्रे, खार रोड आणि मालाड येथे पादचारी पुलाच्या पुनर्बाधणीसाठी २४ लाखांची तरतूद केली आहे.

विमानतळांचा विस्तार, विकास

गेल्या १० वर्षांत विमान वाहतूक क्षेत्राचा विकास झाला आहे, असे सांगून अर्थमंत्र्यांनी विमानतळांचा विस्तार आणि नवीन विमानतळांचा विकास वेगाने सुरू राहील, असे सांगितले. गेल्या १० वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट म्हणजेच १४९ वर पोहोचली आहे. भारतीय विमान कंपन्यांनी १००० हून अधिक नवीन विमानांसाठी मागणी केली आहे.  विमान प्रवास अधिक परवडणारा बनविण्यासाठी ‘उडे देश का आम नागरिक’ (उडान) किंवा ‘प्रादेशिक हवाई जोडणी’ या योजना लागू केल्या आहेत. एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअर या तीन देशांतर्गत विमान कंपन्यांनी मिळून एका वर्षांपेक्षा कमी कालावधीत एकूण १,१२० विमानांची खरेदीसाठी मागणी नोंदविली आहे.

१० वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट म्हणजेच १४९ वर पोहोचली आहे.

विरार-डहाणूदरम्यान चौपदरीकरण

१७ रेल्वे स्थानकांमध्ये विविध सुधारणा करण्यासाठी कंत्राटे दिली आहेत. पनवेल-कर्जत नवीन उपनगरी कॉरिडॉर प्रकल्पाचे काम आणि विरार-डहाणूदरम्यान चौपदरीकरण सुरू आहे. कल्याण-बदलापूर चौपदरीकरण प्रकल्प आणि बोरिवली-विरार पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू केले आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होईल, असे एमआरव्हीसीचे  मुख्य व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष सुभाषचंद्र गुप्ता यांनी सांगितले.

सुभाषचंद्र गुप्ता, मुख्य व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष, एमआरव्हीसी

दिव्यातील पुलासाठी १८ कोटी

विक्रोळी, निफाड, फुलगाव, नगरगाव येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर, दिवा येथील उड्डाणपुलासाठी १८ कोटींची तरतूद केली आहे. दिवा-वसई रेल्वे मार्गादरम्यान उड्डाणपुलासाठी ९ कोटी, दिवा-पनवेल रेल्वे मार्गादरम्यान उड्डाणपुलासाठी ३ कोटी रुपये, कल्याण-इगतपुरी रेल्वे मार्गादरम्यान उड्डाणपुलासाठी १६.१ कोटींचा निधी दिला आहे.

Story img Loader