नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला छेडछाडीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. गांधीनगर भागात राहणाऱ्या १५वर्षीय मुलीने छेडछाड होते म्हणून २२ डिसेंबरपासून शाळेत जाणेच सोडून दिले आहे.
खाराकुँआ भागातील शाळेत शिकणाऱ्या या मुलीच्या आईच्या मोबाइलवर छेड काढणाऱ्या मुलाचा दूरध्वनी आला. तिने ही बाब पालकांना सांगितली. मुलीच्या वडिलांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत छेडछाड प्रकरणाबाबत शाळेच्या व्यवस्थापनाला काही प्रश्न विचारले.
शहरातील सर्वात जुन्या शाळेत नववीत शिकणाऱ्या मुलीची सनी नावाचा मुलगा छेड काढत होता. त्याचे पूर्ण समजू शकले नाही. काही दिवसांपूर्वी वर्गाबाहेर उभे राहून एक मुलगा टपोरीगिरी करीत होता. एके दिवशी वर्गात येऊनही त्याने या मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरून जाऊन २२ डिसेंबरपासून मुलीने शाळेत जाणे सोडून दिले. पालकांनी विचारल्यानंतर तिने शाळेत न जाण्याची वेगवेगळी कारणे सांगितली. पोलीस निरीक्षक एन. एस. कोळे यांनी, या तक्रारीच्या अनुषंगाने शालेय व्यवस्थापनाला काही प्रश्न विचारले आहेत आणि लवकरच संशयित तरुणाला ताब्यात घेतले जाईल, असे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा