केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध क्षेत्रांच्या विकासासाठी योजनांची घोषणा केली. दरम्यान, या अर्थसंकल्पावर राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. अर्थसंकल्पावरून विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यावरून केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

एखाद्या राज्याला विशेष मदत करायची आणि इतर राज्यांकडे बघायचंसुद्धा नाही. हा चुकीचा पायंडा मोदी सरकार पाडत आहेत. आज केवळ दोन राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्वच खासदारांनी केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पाचा निषेध केला पाहिजे. महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्याचं काम केंद्रातल्या भाजपाच्या सरकारने केलं आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
loksatta readers feedback
लोकमानस: साम्राज्य उभे करण्यासाठी निधीचा वापर
Radhakrishna Vikhe Patil On Sujay Vikhe
Vikhe Patil : “भावना दुखावल्या हे मान्य, पण वक्तव्याचा विपर्यास…”, राधाकृष्ण विखेंकडून सुजय विखेंच्या विधानानंतर सारवासारव
Bajrang Sonawane On Amol Mitkari
Bajrang Sonawane : “अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल”, खासदार बजरंग सोनवणेंचा थेट इशारा
Image Of Gautam Adani And Narendra Modi
Modi-Adani : “मोदींनी प्रत्येक नियम मोडत अदाणींना मोठे केले, पण आता…” अमेरिकेतील खटल्यांवरून माजी केंद्रीय मंत्र्याची टीका
PM Modi Speaking In Delhi.
PM Modi : “अण्णा हजारेंना पुढे करत बेईमान लोकांनी दिल्लीला आपत्तीत ढकलले”, विधानसभेच्या तोंडावर पंतप्रधानांकडून ‘आप’वर टीका

हेही वाचा- Budget 2024 : निर्मला सीतारमण यांना धन्यवाद देत अजित पवारांनी समजावला अर्थसंकल्प, म्हणाले; “मनं जिंकणारा…”

मोदी सरकारच्या घोषणा म्हणजे वाऱ्यावरची वरती

आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणतीही विशेष घोषणा केलेली नाही. महाराष्ट्रातल्या कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सरकारने केलं आहे. या अर्थसंकल्पात सरकारने तीन कोटी नवीन घरं बांधण्याचं जाहीर केलं आहे. मात्र, आधीच जी घरं बांधली जात आहेत. त्याचे पेसै जनतेला मिळालेले नाहीत. त्यामुळे मोदी सरकारच्या या घोषणा म्हणजे वाऱ्याची वरात आहे, त्यांच्या घोषणांवर देशातील जनता विश्वास ठेवणार नाही, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

मोदी सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा द्वेष करते

केंद्रातलं मोदी सरकार हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा द्वेष करते आहे. आधी कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली, त्यातही गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीची परवानगी दिली. त्यानंतर दंगा झाल्यानंतर ही परवानगी वाढवण्यात आली. मात्र, यादरम्यान त्याचा भूर्दंड शेतकरांना बसला. आजही अर्थसंकल्पात या शेतकऱ्यांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा – Budget 2024 : ‘मध्यमवर्गाचे सशक्तीकरण करणारा अर्थसंकल्प’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया

सरकार टीकावं यासाठी दोन राज्यांना मदत

आपलं सरकार टीकावं यासाठी केंद्र सरकारने आंध्रा आणि बिहार या राज्यांना भरभरून मदत दिली आहे. तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची भाषा मोदी सरकार आता करत आहेत. जेव्हा मागच्या १० वर्षात देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. आता या गोष्टींसाठी खूप उशीर झाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Story img Loader