Finance Minister Nirmala Sitharaman Speech, India Budget 2024 ”लखपती दीदींना प्रोत्साहन दिला जाणार असून, लखपती दीदी योजनेचा आवाका दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे. लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जात आहे. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात आले आहे”, असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्यात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करीत आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी लसीकरण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मिशन इंद्रधनुषमध्ये लसीकरण वाढवण्यात येणार आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जाणार असून, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण केले जाणार आहे. नॅनो डीएपीचा वापर पिकांवर केला जाईल. दुग्धविकास क्षेत्रात चांगले काम होणार असून, दुग्ध उत्पादकांना प्रोत्साहन दिले जाईल. १३६१ मंडई eName शी जोडल्या जाणार आहेत. येत्या ५ वर्षांत विकासाची नवी व्याख्या तयार करू. आशा भगिनींनाही आयुष्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तेलबियांवरील संशोधनाला चालना मिळेल. दर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाणार असल्याच्याही निर्मला सीतारमण यांनी घोषणा केल्या आहेत.

Aditi Tatkare OnLadki Bahin Yojana January Installment Date in Marathi
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
India aims to be FMD free by 2030
पाच वर्षांत देश ‘एफएमडी’ मुक्त करण्याचा संंकल्प, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांची माहिती
Union Budget 2025 Date Expectations in Marath
Union Budget 2025 : १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प, टॅक्स रिजीममध्ये बदल होणार? निवृत्ती वेतन वाढणार? काय आहेत अपेक्षा?
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’

हेही वाचाः ”आम्ही चार जातींवर लक्ष केंद्रित केलंय,” निर्मला सीतारमण म्हणाल्या, ”गरीब, महिला…”

देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे. आमच्या सरकारचे लक्ष पारदर्शक कारभारावर आहे. अर्थमंत्र्यांनी २० मिनिटे केंद्र सरकारच्या योजनांची गणना केली आणि भारताच्या विकासाच्या गतीवर चर्चा केली. निर्मला म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील ५ वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जाणार आहेत, असंही त्या म्हणाल्यात.

हेही वाचाः Budget 2024 Live: “आमच्या सरकारचा भर चार प्रमुख जातींवर, त्या जाती म्हणजे…”, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण याचंं मोठं विधान!

पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचायचे आहे. खास जमातींसाठी खास योजना आणली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सरकार गरिबी हटवण्याचे काम करीत आहे. सरकारने आव्हानांचा धैर्याने सामना केला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. पाणी योजनेतून प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा केला जात आहे. ७८ लाख पथारी व्यावसायिकांना मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. ४ कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पंतप्रधान किसान योजनेतून ११.८ कोटी लोकांना आर्थिक मदत मिळाली आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरुणांच्या सक्षमीकरणावरही काम केले जात आहे. तीन हजार नवीन आयटीआय उघडण्यात आल्या आहेत. ५४ लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी अधोरेखित केलंय.

Story img Loader