Parliament Budget Session : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज (दि.३ फेब्रुवारी) या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. मात्र, आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरु होताच सभागृहात गदारोळ झाला. यामध्ये राज्यसभेच्या सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत चर्चेची मागणी केली. मात्र, विरोधी खासदारांची ही मागणी मान्य न केल्यामुळे खासदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच उत्तर प्रदेश सरकार या घटनेतील मृतांची माहिती उघड का करत नाही? असे सवाल विरोधकांनी विचारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचे पडसाद राज्यसभेतही पाहायला मिळाले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची यादीही मागितली होती. दरम्यान, महाकुंभचे डीआयजी वैभव कृष्णा यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झालेले आहेत. या मुद्यावरून खासदारांनी सभागृहात तात्काळ चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली.

यानंतर राज्यसभेचे सभापती असलेले जगदीप धनखड यांनी चर्चा सदस्यांनी सभागृह सुरळीत चालू द्यावे अशी विनंती केली. पण तरीही विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. प्रमोद तिवारी आणि दिग्विजय सिंग (काँग्रेस), सागरिका घोष (टीएमसी), जावेद अली आणि रामजी लाल सुमन (समाजवादी पक्ष), आणि जॉन ब्रिटास (सीपीआय) यांनी महाकुंभ प्रकरणावर चर्चेची मागणी करणाऱ्यासंदर्भात पत्र दिलं आहे. मात्र, महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत सकाळच्या सत्रात चर्चा नाकाल्यानंतर काँग्रेस, सपा, द्रमुक, आप, आरजेडी, सीपीआय आणि सीपीएम या विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार निदर्शने केली.

खासदार राम गोपाल यादव काय म्हणाले?

राज्यसभेत विरोधी खासदारांनी महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सभात्याग केला. यावेळी समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांनी म्हटलं की, “उत्तर प्रदेशच्या प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शी सांगतात की चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचा मृत्यू झाला. अजूनही कुटुंबीयांना मृतदेह मिळत नाहीत. अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. आम्ही येथे नोटिसा दिल्या आहेत पण त्या नाकारल्या गेल्या आहेत”, असं खासदार राम गोपाल यादव यांनी म्हटलं.

खासदार प्रमोद तिवारी काय म्हणाले?

राज्यसभेत विरोधी खासदारांनी महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशच्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला. यानंतर काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी म्हटलं की, “आम्ही तासाभरासाठी सभागृहातून बाहेर पडलो. आम्ही पुन्हा जाऊन हा मुद्दे मांडणार आहोत. आम्हाला फोन येत आहेत, लोक रडत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटता येत नाही. आम्हाला हवे आहे. ३० मृत व्यक्तींची यादी का जाहीर करण्यात आली नाही? आमच्या नोटिसा सतत नाकारल्या जात आहेत आणि त्याचे कारणही कळू शकलेले नाही”, असं खासदार प्रमोद तिवारी यांनी म्हटलं आहे.