लोकसभेत आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. तसंच अधिवेशन सुरु होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना हे आवाहन केलं की संसदेत गदारोळ घालून खासदारांचा वेळ वाया घालवू नका. आज लोकसभेत मात्र देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी Rahul Gandhi यांच्यात नीट परीक्षेतील गोंधळावरुन आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्याचं पाहण्यास मिळालं.

बी मणिकॉम टागोर यांनी उपस्थित केला मुद्दा

प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे खासदार बी. मणिकॉम टागोर उभे राहिले, त्यांनी भारतातल्या परीक्षा पद्धतीवर आणि खासकरुन NEET च्या घोळाकडे लक्ष वेधलं. सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे, तसंच ७ वर्षांमध्ये सत्तरवेळा पेपरफुटी प्रकरण झालं आहे असाही आरोप केला. त्यावर धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “आत्ता काँग्रेस खासदार टागोर यांनी सात वर्षांत सत्तरवेळा पेपर फुटल्याचा मुद्दा उपस्थित केला. मी जबाबदारी हे सांगू इच्छितो की मागच्या सात वर्षात इतक्या वेळा पेपरफुटी झाल्याचा कुठलाही ठोस पुरावा नाही. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर गेलं आहे, ज्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडायच्या आहेत त्या मांडू. २४० परीक्षा झाल्या आहेत, पाच कोटी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे हे मी सांगू इच्छितो. आम्हाला काहीही लपवायचं नाही, जे काही घडलं आहे ते आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सांगणार आहे.” असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. यानंतर अखिलेश यादव बोलायला उभे राहिले.

Prime Minister Narendra Modi assertion of support for developmental policy in Brunei
विकासात्मक धोरणाला पाठिंबा; ब्रुनेई येथील भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
Extension of time to Ravindra Waikar to clarify his position on Amol Kirtikar petition print politics news
कीर्तिकरांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी वायकर यांना मुदतवाढ
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
Karnataka Chief Minister Siddaramaiah addresses the Legislative Party meeting
कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांकडून गुरुवारी विधिमंडळ पक्ष बैठक; राज्यपालांच्या भूमिकेने वाद
Malegaon, Deputy Chief Minister Ajit Pawar, NCP, Ajit Pawar met Aasif Shaikh, Jan samman Yatra, Asif Shaikh, Sharad Pawar group, Congress, Sheikh family, defections, conciliatory relationship, BJP alliance, Malegaon Central Constituency, independent elections, Maha vikas Aghadi
अजित पवार यांच्याकडून मालेगावात अल्पसंख्यांकांना आपलेसे करण्याची खेळी
Advice from Chief Minister Eknath Shinde on opposition criticism of Chief Minister Majhi Ladki Bahin scheme print politics news
योजनेवर टीका करणाऱ्या सत्ताधारी आमदारांना तंबी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कानउघाडणी

अखिलेश यादव काय म्हणाले?

प्रश्नोत्तराच्या तासात मला बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छितो या सरकारने इतर कसलाही रेकॉर्ड केला नाही तरीही ते पेपरफुटीचा रेकॉर्ड नक्की करतील. संपूर्ण देशात विद्यार्थी आंदोलन करत होते, सीबीआयच्या चौकशीनंतर काहींना अटक करण्यात आली. माझा मंत्र्यांना सवाल आहे की सेंटर प्रमाणे किती मुलांना किती गुण मिळाले ते जाहीर करणार का? ज्या ठिकाणी पेपर लिकच्या घटना घडल्या तिथल्या पायाभूत सुविधांची माहिती मंत्रिमहोदयांनी घेतली होती का? धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण ते मंत्री असतील तर विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही असं अखिलेश यादव यांनी म्हटलं.

अखिलेश यादव यांना प्रधान यांचं उत्तर

अखिलेश यादव यांनी जे प्रश्न विचारले त्यावर धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं की विद्यार्थ्यांची यादी वेबसाईटवर अपलोड करा. मागच्या तीन दिवसांपासून देशभरातल्या विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध आहेत. सगळ्या गोष्टी उघड केल्या आहेत. केरळचे विद्यार्थ्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला आहे. एस.टी. एस. सी. या सगळ्याच वर्गाने उत्तम कामगिरी केली आहे. पेपरफुटीचं राजकारण करु नका, पण जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा उत्तर प्रदेशातही या घटना घडल्या आहेत.” असाही आरोप प्रधान यांनी केला. यानंतर राहुल गांधी Rahul Gandhi उभे राहिले. त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीका केली.

हे पण वाचा- ‘पराभवानंतरही अहंकार कसा येतो?’, अमित शाहांचा राहुल गांधींना प्रश्न

राहुल गांधी यांनी काय म्हटलं आहे? (What Rahul Gandhi Said?)

“संपूर्ण देशाला ही कल्पना आहे फक्त नीट नाही तर संपूर्ण परीक्षा पद्धतीच अपयशी आणि कमकुवत आहे. (What Rahul Gandhi Said in Loksabha? ) आता धर्मेंद्र प्रधान हे प्रत्येकाला दोष देत आहेत पण ते स्वतःला दोष देत नाहीयेत. बहुदा त्यांना इथे काय चाललं आहे याची कल्पना येत नसावी. लाखो विद्यार्थी आहेत ज्यांना हा प्रश्न पडला आहे की नेमकं काय चाललं आहे? तसंच त्यांना आता हे वाटू लागलं आहे की भारतीय परीक्षा पद्धती हा एक मोठा घोटाळा आहे. लाखो मुलांना वाटतं आहे की तुम्ही श्रीमंत आहात तर तुम्ही ही परीक्षा पद्धती विकत घेऊ शकता. विरोधी पक्षाचीही हीच भावना आहे. त्यामुळे आम्हीही काही साधे-सोपे प्रश्न उपस्थित करत आहोत. तांत्रिक बिघाड होतो असं सरकारने सांगितलं, त्यावर माझा प्रश्न आहे की तो सोडवण्यासाठी तुम्ही नेमकं काय करत आहात? ” असा प्रश्न राहुल गांधींनी Rahul Gandhi उपस्थित केला.

congress leader rahul gandhi
राहुल गांधी यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावरुन सरकारवर आरोप केले आहेत, धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचं राहुल गांधींना उत्तर (Dharmendra Pradhan Answer to Rahul Gandhi )

“मला जे शिक्षण मिळालं आहे आणि माझ्यावर जे संस्कार आहेत, मला माझ्या राज्याची, जनतेची ताकद मिळाली आहे. मला माझ्या बुद्धीबाबतचं प्रमाणपत्र या सभागृहात कुणाकडूनही नको. देशाच्या लोकशाहीत मी निवडून आलो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला या पदावर नियुक्त केलं आहे. विरोधक गदारोळ करत आहेत, गदारोळ म्हणजे सत्य नाही. देशाची परीक्षा पद्धती घोटाळा आहे असं म्हणणं हे वक्तव्य दुर्दैवी आहे. विरोधी पक्षनेत्याने असं म्हटल्याचा मी निषेध नोंदवतो. ज्यांनी रिमोटने सरकारं चालवली आहेत आज ते आम्हाला विचारत आहेत. २०१० मध्ये तीन विधेयकं आली होती. त्यातलं एक विधेयक शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या पेपरफुटींसारख्या घटनांबाबत होतं. आमच्या सरकारच्या हिंमत आहे की आम्ही कायदा केला. काँग्रेसचा नेमका काय नाईलाज होता की त्यांनी त्यावेळी विधेयक येऊन कायदा संमत केला नाही? खासगी महाविद्यालयांच्या दबावाखाली ज्यांनी कायदा होऊ दिला नाही ते (Dharmendra Pradhan Answer to Rahul Gandhi ) आता आम्हाला प्रश्न विचारत आहेत.” असं जोरदार प्रत्युत्तर धर्मेंद्र प्रधान यांनी दिलं.