Union Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याचं हातमागाच्या साड्यांवरच प्रेम नेहमीच दिसून येत. प्रेमासाठी ओळखले जाते. त्या नेहमीच गडद रंगात आणि थ्रेडवर्क केलेल्या साड्यांमध्ये दिसतात. यावर्षी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ साठी अर्थमंत्र्यांनी पुन्हा एकदा हातमागवर विणलेल्या साडीची निवड केलेली दिसून येत आहे.
गेल्या वर्षी, त्यांनी बॉर्डरवर इक्कत वर्कसह चमकदार लाल पोचमपल्ली साडी नेसली होती. या वर्षी, त्यांनी जास्त गडद लाल रंगाची शेड असलेली साडी निवडली आहे. काही दिवसांपासून अशी चर्चा होती की यंदा अर्थमंत्री बनारसी साडी नेसू शकतात परंतु, अर्थ मंत्रालयाच्या बाहेरील सकाळच्या व्हिज्युअल्समध्ये सीतारामन खूपच साध्या लाल रंगाच्या साडीत दिसल्या.
अर्थमंत्री सीतारामन या अनेकदा साडीमध्ये दिसल्या आहेत. गेल्या वर्षी मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एका शक्तिशाली भाषणादरम्यान, सीतारामन म्हणाल्या होत्या की कोणी साडी नेसली आहे आणि कोणी पँट सूट घातला आहे म्हणून, प्रतिबद्धतेच्या अटी वेगळ्या असू शकत नाहीत. ब्राईट पिवळ्या ते अगदी निळ्या रंगापर्यंत, सीतारामन यांनी नेहमीच पारंपारिक पॅटर्न निवडले आहेत आणि नेहमीच त्यांच्या लुकची चर्चा झाली आहे.
लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलवर पहा अर्थसंकल्प
निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. दरम्यान यावेळीदेखील अर्थमंत्री पेपरविना अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेल्यावर्षीदेखील निर्मला सीतारामन यांनी टॅबच्या सहाय्याने अर्थसंकल्प मांडला होता.